नवीन लेखन...

एक परीस स्पर्श – भाग १

ते स्वप्नही भंगल ! पण तेव्हा मुलींच्या लग्नच वय एकवीस असतं तर ती पदवीधर झाली असती…हा विचारही विजयच्या ही कथा आहे एका अशा पुरुषाची जो परिसासारखाच आहे . त्याच्या स्पर्शाने अनेकांच्या आयुष्याचे सोने झाले पण तो स्वतःच्या आयुष्याचे मात्र सोनें करू शकला नाही कारण त्याला शापच होता परीस असल्याचा…परीस स्पर्शाने लोखंडाचे सोने होते पण लोखंडाचे सोने करणारा परीस मात्र नेहमीच जगासाठी एक गूढ रहस्यच बनून राहतो, तो जगासमोर कधीच येत नाही.

आपल्या या कथेतील नायक विजय ! तो ही त्या परिसासारखाच आहे. त्याच्याही वाट्याला आले आहे परिसाचे जगणे ! कसे ? ते या कथेतून आपल्याला हळू हळू उलगडत जाईलच…तसं पाहिलं तर परीस हा एक दिसायला सामान्य दगडच असतो असं म्हणतात. तसाच आपला नायकही दिसायला एक सामान्य नव्हे अतिसामान्य माणूसच आहे….

त्याच्या आयुष्यात घडलेल्या, घडत असलेल्या घटना तशा सामान्यच ! पण त्या दखल घेण्यासारख्या आहेत कारण त्या घटनांकडे पाहण्याचा विजयचा दृष्टिकोन जगावेगळा आहे…

आता हेच पहा ! पूर्वी चहा पिताना पेपर वाचणारा विजय आज मोबाईलवर फेसबुकवरील पोस्ट वाचत होता.  ती पोस्ट ज्योतिष शास्त्रातील होती. ज्योतिष हे शास्त्र आहे का ? यावर वाद आहेत आणि ते कधीही न संपणारे आहेत. त्या पोस्ट मध्ये असं लिहिलं होतं ज्यांच्या जन्म पत्रिकेत पंचम स्थानावर राहू अथवा शनीची दृष्टी असते त्यांना प्रेमप्रकारणात यश मिळत नाही.

विजयला लगेच आठवले की त्याच्या पत्रिकेत पंचम स्थानावर राहू आणि शनी या दोघांचीही दृष्टी आहे. आता मात्र विजय विचारात पडला. ” माझं प्रेमविवाह करण्याचं स्वप्न या जन्मात पुरं होणार नाही बहुतेक ! अर्ध आयुष्य तिची वाट पाहण्यात गेलं. कदाचित आता उरलेलंही जाणार वाटतं ? उगाच मी ज्योतिष शास्त्राच्या भानगडीत पडलो ! जग जे म्हणत की अज्ञानात सुख आहे. ते काही अगदीच चुकीचं नाही. प्रत्येकवेळी मी हे असं काहीतरी वाचतो आणि माझ्या डोळ्यासमोर माझी जन्म कुंडली येते आणि प्रत्येक वेळी मला माझ्या डोळ्यासमोर भविष्याबद्दलची एक नवी चिंता उभी राहते. कधी मला वाटतं की माझा प्रेम विवाहच होणार ! कधी मला वाटतं माझा विवाहच होणार नाही , कधी कधी तर मला वाटतं माझ्या मागच्या जन्मातील ती या जन्मांतही माझ्या आयुष्यात येणार आहे आणि ती माझ्या आसपासच आहे….

या विचारात असतानाच विजयच्या नजरेत दुसरी बातमी आली ती म्हणजे मुलींच्या लग्नाच्या वयात वाढ करून ते अठरा वरून एकवीस करण्याबाबतची ! सरकार हे असं करण्याबाबत प्रयत्नशील आहे हे वाचून विजयला परमानंद झाला आणि तो जोरातच म्हणाला, ” हे झालं तर खूपच छान होईल ! अयशस्वी प्रेमप्रकरणांची संख्या थोडी कमी होईल आणि देशाच्या लोकसंख्येलाही आळा बसेल. खरं तर विजयला देशाच्या लोकसंख्येशी काही देणंघेणं नव्हतं पण त्याच्या मनात एक राग होता तो धगधगत होता. याला कारणीभूत होती विजयच्या आयुष्यात आलेली तिसरी स्त्री…विजयच तिच्यावर प्रचंड प्रेम होतं असं नाही म्हणता येणार पण त्यातल्यात्यात प्रेम होतं. म्हणजे लोकांना वाटायचं की त्यांच्यात काहीतरी सुरू आहे इतके ते एकमेकांच्या जवळ असत. त्याची ती मात्र फारच चंचल होती त्यात कहर म्हणजे तिचं नावच चंचला होतं.

चंचला जेव्हा अठरा वर्षाची झाली तेव्हा लगेच तिच्या आईवडिलांनी तिच्यासाठी वर शोधायला सुरुवात केली. आजूबाजूच्या अनेकांना विचारणा केली त्यात विजयचाही नंबर लागला. तेव्हा विजय वीस एकवीस वर्षाचा होता.  त्याला स्वतःला स्वतःच्या पायवर उभं करायचं होतं. पण त्याला ती आवडत होती. भले तिच्यात लाख दुर्गुण होते तरी ! काही वर्षांनी त्याने तिच्याशी लग्न केले असते. तेव्हा विजयच्या मनात विचार आला होता की मुलींच्याही लग्नच वय एकवीस असतं तर किती बरं झालं असतं ! आज विजयला तिच्यासोबत  लग्न करायला नकार दिल्याचा पश्चाताप होत नाही कारण त्यानंतर त्याच्या आयुष्यात बऱ्याच जणी आल्या. विजय एखाद्या फुलपाखराचे आयुष्य जगला असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही.

पण चंचलाही तिच्या नावाला जागली…ते कशी ?  हे नंतर कधीतरी…पण हे इतकंच कारण नाही विजयची बहीणही वयाच्या अठराव्या वर्षी एकाच्या प्रेमात पडली आणि तीच लग्न झालं ! विजयला स्वतःला प्रयत्न करूनही पदवीधर होता आलं नाही पण निदान आपली बहीण पदवीधर व्हावी हे त्याचं स्वप्न होतं. पण मनात येऊन गेला होता.

विजयच्या जन्मकुंडळीत पंचमात केतू असल्यामुळे विजय त्याचे भौतिक शिक्षण पूर्ण करू शकला नाही पण गूढ  विद्येचे त्याला फारच आकर्षण होते त्याच आकर्षणापोटी तो ज्योतिषशास्त्र शिकण्याच्या प्रयत्नात होता…

— निलेश बामणे

Avatar
About निलेश बामणे 417 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..