नवीन लेखन...

एक परीस स्पर्श ( भाग – ४४ )

मे महिना संपला की सर्वाना वेद लागतात ते पावसाचे ! पाऊस हा कवींसाठी थोडा विशेषच असतो कारण प्रत्येक कवीने पावसावर एकतरी कविता लिहिलेली असतेच ! विजयने पावसावर आतापर्यत दहा- बारा कविता तरी लिहिल्या होत्या. त्यात त्याची सर्वात आवडती कविता होती तर पावसात भिजताना ! ज्या कवितेत प्रियकर आपल्या प्रेयसीसोबत पावसात भिजण्याची कल्पना करत असतो. विजयासाठी ही खरोखरच कल्पना एक होती कारण प्रत्यक्षात विजय असा कधी कोणासोबत एका छत्रीत भर पावसात शिरल्याचे सध्यातरी त्याला आठवत नव्हते. पण  भरपावसात विजय भिजलाय मात्र बऱ्याच जणींसोबत ! छत्री जवळ असतानाही ! विजय लहान असताना त्याला पावसात भिजण्याची प्रचंड आवड होती. पावसाचे पाणी तळहातावर झेलत राहायला तर त्याला आजही आवडते. विजय  शाळेत असताना पावसात भिजता यावे म्हणून शाळेत कधीच छत्री घेऊन जात नसे त्याऐवजी वह्या – पुस्तके प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून घेत असते. जो माणूस पावसात आनंदाने भिजतो तो माणूस खऱ्या अर्थाने उत्साही आणि आनंदी असतो…भर पावसात भिजण्याची हुक्की आजही येते कधी कधी विजयला पण तो ते टाळतो ! प्रत्येक पावसात न चुकता तो एक छत्री हरवतोच ! प्रत्येक पावसाळ्यात हल्ली त्याच्याकडे नवी छत्री असते. काल हवेत प्रचंड उष्णता होती. आभाळही दाटून आले होते. आज दिवसभरात पाऊस पडेल अशी विजयला खात्री वाटत होती पण पाऊस पडला तो रात्री आठच्या सुमारास तेंव्हा विजय घरीच होता त्याची आवडती मालिका पाहत होता. पावसाचा आवाज ऐकून तो लगेच खिडकीजवळ गेला खिडकी उघडून त्याने आपला हात हळूच बाहेर काढला आणि तो पाऊस आपल्या तळहातावर झेलू लागला. खिडकीतून खाली पहिले तर खाली इमारतीच्या मोकळ्या जागेत लहान मुले खास पावसात भिजण्यासाठी इमारतीच्या खाली उतरली हाती. पण ! हा पाऊस थोडा गार होता त्यामुळे ते फारवेळ त्याच्यात नाही भिजू शकले. पण त्यांना पावसात भिजताना पाहून विजयला प्रचंड आनंद होत होता. आजही पावसात भिजण्याची संधी भेटल्यास तो बिनधास्त भिजतो म्हणजे ! अचानक पाऊस आला आणि जवळ छत्री नसेल तर… हल्ली लोक पावसात फार भिजत नाहीत त्याला कारणीभूत आहे मोबाईल… या मोबाईल नावाच्या गॅजेटने लोकांना सहज मिळणारा आनंदही हिरावून घेतलेला आहे. विजयला पूर्वी पावसात भिजून ओल्याचिंब झालेल्या तरुणी पाहायला खूप आवडायच्या ! हल्ली त्या फार दिसत नाही आणि दिसल्या तरी त्यांच्याकडे पाहत राहावंसं वाटत नाही कारण पावसात भिजल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर आणि देहबोलीत नसतो ! हल्ली तो दिसतो तो धबधब्यांखाली…विजय लहान असताना पावसात त्यांच्या झोपडी समोरून वाहणाऱ्या पाण्यात कागदाच्या बोटी बनवून सोडत असे. पावसात चिखलात खेळण्यात एक वेगळीच मजा असायची ! पण हल्ली मुंबईतील चिखल म्हणजे गटारातील घाण ! हल्ली  पहिला पाऊस पडला की मातीचा सुगंध येत नाही तर येतो गटाराचा दुर्गंध ! पूर्वी अजिबात छत्री जवळ न बाळगणारा विजय पावसाळा संपेपर्यत जवळ छत्री बाळगतो ! ती फक्त मोबाईल भिजू नये म्हणून ! पूर्वी विजय जास्त पाऊस पडायला लागला आणि बसला उशीर व्हायला लागला तर त्या निमित्ताने ओळखीच्या एखाद तरुणीला रिक्षाने घेऊन येत असे. त्या आठवणी आणि त्या आठवणीतील त्या तरुणी विजयला आजही प्रत्येक पावसात आनंदी करतात. विजयच्या आयुष्यात इतक्या सुंदर सुंदर तरुणी येऊनही ! तो एकटा का राहिला ? हे कोडे काही विजयला उलगडत नाही ! कदाचित ! अनामिकेसाठी… असेल.

अनामिकेला पावसात भिजायला खूप आवडते. फक्त पावसातच नाही तर एकूणच तिला पाण्यात भिजायला खूप आवडते. अनामिका आणि विजय एकत्र असे पावसात कधी भिजले नाही पण तिला पावसात भिजताना मात्र विजयने पाहिले होते. पावसात भिजल्यावर ती खूप सुंदर आणि आनंदी दिसते. पावसात भिजल्यावर ती जेंव्हा आपले काळेभोर लांबसडक केस मोकळ्या हवेत उडवते तेंव्हा ते दृश्य डोळ्यात साठवून घेण्यासारखे असते. मागच्या वर्षी ऐन पावसाळ्यात विजय जेंव्हा गावी गेला होता तेंव्हा त्याने मातीचा सुगंध, चिखल, नद्या –  नाले, हिरवळ आणि एकूणच  निसर्गातील आल्हाद त्याने मानत साठवून घेतला होता. अनामिका तिचे आयुष्य आता भरभरून जगत आहे आणि विजयचे ते आयुष्य जगून झालेले आहे. आता व विजयच्या जगण्याला एक स्थिरता प्राप्त झालेली आहे म्हणण्यापेक्षा त्याच्या जगण्यावर आता बंधने आली आहेत. खरे तर विजयने स्वतःच स्वतःच्या आयुष्याला अनेक बंधनात गुरफटवून घेतलेले आहे. विजयला आता पूर्वीसारखा कोणत्याच गोष्टीचा मनमुराद आनंद घेता येत नाही कारण कधी मनाची तर कधी शरीराची बंधने आडवी येतात. या पावसात एकदातरी मनभरून पावसात भिजण्याचा निर्णय विजयने घेतला होता… विजयच प्रत्येक गोष्टीकडे खूप अभ्यासू वृत्तीने पाहण्याची वृत्तीच त्याला खऱ्या अर्थाने कोणत्याच गोष्टीचा आनंद उपभोगू देत नाही. नुकताच बारावीचा रिझल्ट लागला ! एक बातमी विजयच्या वाचनात आली बारावीला  ५५ % गुण मिळाले म्हणून रिझल्ट लागल्या नंतर काही तासातच एका तरुणीने आत्महत्या केली… विजयने स्वतः बारावीत दोन विषयात नापास होण्याचे दुःख पचवले होते पण लगेच त्याने ऑक्टोबरमध्ये ते अपयश पुसून काढले होते.  त्यानंतर त्याला बऱ्याच लोकांनी ह्या ना त्या मार्गाने पदवी पूर्ण करण्याचा सल्ला दिला पण तो सल्ला विजयने फार मनावर घेतला नाही कारण फक्त पदवी मिळवून काय उपयोग ? त्या घेतलेल्या ज्ञानाचा उपयोग आपल्याला प्रत्यक्ष आयुष्यात करता येणार असेल तर ठीक ! विजयचे स्पष्ट मत होते लिहिण्या – वाचण्याइतके ज्ञान तर असायला हवेच पण त्याहून वाचलेले सारे समजून घेण्याची कुवत असायला हवी ! पदवीच्या नादात लोक स्वतःच्या बुद्धीला फारच संकुचित करून घेतात आणि एखाद्या विशिष्ट विषयातच आयुष्यभर गुंतून पडतात. म्हणजे बँकेत नोटा मोजणारे आणि त्या नोटांचा हिशेब ठेवणारे आयुष्यभर ते एकच काम करत राहतात … वेगवेगळे विषय सतत वाचत राहिल्याने ज्ञानात जी प्रचंड भर पडते ती भर विशिष्ट विषयातील पदवी घेऊन पडत नाही.. पदवी मिळविण्यासाठी किती पुस्तके वाचायला लागतात ? फार फार .. तीस ! तितकी पुस्तके तर विजय कधी कधी महिन्याभरात वाचतो… सध्याच्या कोणत्याही शालेय अथवा विद्यापीठातील परीक्षांत मिळणारे गुण हे तुमच्या फक्त आणि फक्त स्मरणशक्तीवर अवलंबुन असतात… पण स्मरणशक्ती म्हणजे तुमच्यातील कल्पकता नव्हे ! जोपर्यत कल्पकतेला वाव देणारी शिक्षणपद्धती अस्तित्वात येत नाही तोपर्यत हे से स्मरशक्ती कमी असणारे आत्महत्या करत राहणार…विजय काही त्याची स्मरणशक्ती कमी होती म्हणून नापास झाला नव्हता तर त्याने अभ्यासच केला नव्हता म्हणून नापास झाला होता… पण त्याचवेळी त्याने त्याच्यातील कल्पकतेचा मात्र प्रचंड विकास केला होता. विजय पदवीधर नाही याची त्याला आता अजिबात खंत वाटत नाही कारण ! त्याच्या अचाट कल्पनाशक्तीसमोर भले – भले नतमस्तक होतात. अनेक पदवीधर त्याचा सल्ला मागता इतर क्षेत्रात ! विजयने पदवी घेतली नाही म्हणून त्याने त्याचा अभ्यास थांबविला नाही ! त्याच्या आयुष्यातील प्रत्येक छोट्यात छोट्या गोष्टीकडे तो अभ्यासू  वृत्तीने पाहतो. आता त्याचा पाय दुखत होता म्हणून तो पाय धरून बसला नाही तर ! त्याने पायाच्या आजाराशी संबंधित शेकडो विडिओ पहिले,  लेख वाचले,  त्यावरील आयुर्वेदिक,  होमीओपॅथिक आणि ऍलोपॅथिक सर्व प्रकारच्या उपचारांचा त्याने त्याच्या परीने अभ्यास केला. त्यामुळे त्याचा  पाय बारा होण्यास लागणार वेळ त्याला आता मानसिक त्रास देत नाही ! कारणअभ्यासातून त्याला आता त्याचा पाय बरा होण्यास लागणार कालावधी आणि त्यावर करावे लागणारे उपचार यांचा अचूक अंदाज आलेला आहे. हे सारं शक्य होत अवांतर वाचन, मनन आणि वाचन केल्यामुळे ! पण हल्ली कित्येक उच्चशिक्षित लोक रोजचे वर्तमानपत्रही वाचत नाहीत… विजयला ज्या माध्यमातून जे काही वाचायला मिळेल ते तो वाचतो त्यामुळे तो कोण काय म्हणालंय ! याला महत्व देत नाही ! त्याच्यादृष्टीने  त्याला काय वाटतं , त्याची बुद्धी काय सांगते ! हे महत्वाचे असते… सांगणारा ! कोणी का असेना त्याला दोनच मेंदू होते… आपल्यालाही दोन आहेत मग प्रत्येक गोष्ट आपणही आपल्या मेंदूवर घासून घ्यायला हवी ! तशी ती आपण घेत नाही म्हणून आपल्याकडून आज फक्त आणि फक्त अंधानुकरण होते … जे एकूणच मानवजातीच्या हिताचे नाही…पावसात भिजताना प्रत्येकाला आनंद का होत नाही ? पावसात भिजणार प्रत्येकजण आनंदी का नसतो ? पावसात भिजल्यावर असा कोणता मोठा आनंद मिळतो… या प्रश्नाच्या उत्तरातही जगण्यातील अनेक रहस्ये दडलेली आहेत…

— निलेश बामणे.

Avatar
About निलेश बामणे 417 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..