नवीन लेखन...

एक परीस स्पर्श ( भाग – ४३ )

चार महिन्यानंतर आता कोठे विजयला त्याच्या पायाला नक्की काय झाले आहे याचा अंदाज बांधता येऊ लागला होता. चार महिने विजयला पायऱ्या उतरता येत नव्हत्या ! चढता येत होत्या पण वेदना सहन करत !  विजयने काही दिवसापूर्वी त्याच्या आयुष्यातील पहिला एक्सरे काढून घेतला होता. पायाच्या टाचेतील हाड म्हणजे कॅलकॅनिअल स्फुर वरच्या बाजूला जरा वाढलेले दिसले. अँकलमध्ये सूज असली तरी सांध्यातील हाडात काही समस्या नव्हती. प्रथम दर्शनी अँकलमध्ये असणारी सूज आणि वाढलेले हाड याचाही काही संबंध नसल्याचे दिसत होते. युरिक ऍसिड वाढल्यामुळे ते सांध्यात जमा होऊन तेथे सूज आली असल्याची शक्यताच जास्त होती. विजयच्या पाय दुखीची याव्यतिरिक्त इतर बरीच करणे असल्याची शक्यता नाकारता येत नव्हती. पण विजयने आता एका एका समस्येवर उपचार करण्याचा निर्णय घेतला. प्रथम अँकलमधील सूज कमी करण्याकडे त्याने लक्ष देण्याचे ठरले. त्याप्रमाणे त्याने होमिओपॅथी डॉक्टरकडून काही औषधे व मलम लिहून घेतले आणि त्याने काही अँकलसाठी उपयोगी ठरणारे व्यायामही करायला सुरुवात केली.  त्यामुळे आता त्याला  चालताना होणारा त्रास थोडा कमी होऊ लागला होता. युरिक ऍसिड नियंत्रणात ठेवंणारी आयुर्वेदिक औषधेही त्याने सुरूच ठेवली. टाचेतील  हाड वाढीवर अनेक उपचार आहेत अगदी व्यायाम करण्यापासून, इंजेक्शन देणे ते  ऑपेशन करण्यापर्यत..होमिओपॅथी मध्ये यावर उत्तम औषधे आहेत जी वाढलेले हाड कमी करण्यात उपयोगी ठरतात असेही विजयच्या वाचनात आले होते. त्यामुळे विजयने पहिल्यांदा एका होमिओपॅथी डॉक्टरचा सल्ला घेतला होता. मागील काही महिन्यात विजयने वजन म्हणजे पोट कमी करण्यासाठी काही प्रयोग केले होते ते प्रयोग त्याच्या अंगलट आलेच विजयला आता प्रकर्षाने जाणवत होते.    त्यामुळेच विजयला अशक्तपणा येऊन ही पायदुखी इतकी बळावली असावी ! असाही विचार त्याच्या मनात येऊन गेला होता. त्यामुळे आता त्याने पूर्वीसारखा मिळेल ते नाही पण पोटभर खाण्याचा निर्णय घेतला. पोट कमी होण्यापेक्षा चालणे त्याच्यासाठी खूप महत्वाचे होते. चालायला झालेला त्रास म्हणजे अवघड जागेच दुखणं असत. लंगडत चालताना जो बघतो तो प्रश्न विचारतो ! बरं त्या प्रश्नांची उत्तरे देणे टाळताही येत नाही कारण ते सर्वजण आपल्याला आपल्या काळजीने विचारत असतात. त्यामुले  या अशा विचारांनी विजय बेजार झाला होता…

विजयच्या आयुष्यात काय ? कोणाच्याच आयुष्यात कोणतीच गोष्ट विनाकारण घडत नाही ! यावर विजयचा ठाम विश्वास होता. विजयचा  पाय  दुखणे ! तो ही सलग चार महिने ! कोणत्याच उपचारालाही प्रतिसाद न मिळणे . ही विजयला एक सामान्य घटना नक्कीच वाटत  नव्हती… या चार महिन्यात विजयासह अनेकांच्या आयुष्यात अनेक घटना घडल्या होत्या. त्या चार महिन्यांमुळे अनेक घटना घडणार होत्या. विजयला सध्या तो जी नोकरी करत होता ती नोकरी त्याला सोडायचीच होती पण ती सोडायला काही ठोस कारण मिळत नव्हते. पायदुखीमुळे विजयला ती नोकरी सोडण्यासाठी एक ठोस कारण सापडले. प्रत्येकवेळी मागचा पुढचा विचार करणाऱ्या विजयने यावेळी मात्र तो तसा विचार अजिबातच केला नाही. त्याने सारे नियतीवर सोडण्याचा निर्णय घेतला. तसेही त्याला आता ही  कंपनी आपल्याला सोडायची आहे याचे संकेत अगोदरच मिळू लागले होते. तरीही विजय एका कर्णाच्या शोधात होता. ते कारण सापडले आणि विजयने क्षणाचाही विचार न करता ती कंपनी सोडली. तशी ती कंपनी सोडल्यामुळे त्याला काही मिळणार नव्हतच ! कारण आता तो तेथे मैत्रीखात्यात काम करत होता. त्याच्या कामाचा योग्य मोबदला तर त्याला तेथे मिळत नव्हताच पण उगाच त्याचा वेळही  वाया जात होता. विजयच्या वेळेला फार किंमत होती. त्या वेळेच्या किमतीचा तरी आपण मान राखला पाहिजे असा विचार विजयने हा  निर्णय घेताना केला होता. विजयकडे उदर्निवाहासाठी पैसे कमविण्याचा काही ठोस स्रोत नसला तरी त्यामुळे सध्यातरी त्याचे काही अडणार नव्हते. कारण तो छोटी मोठी दोन – चार कामे करूनही स्वतःचा उदरनिर्वाह करू शकत होता. कायमस्वरूपी उदरनिर्वाहाचे साधन म्हणून विजय एखादे दुकान सुरु करण्याच्या विचारतात होता. त्यासाठीं लागणारे भांडवल द्यायला त्याचा भाऊ तयारच होता… विजयने ही कपंनी सोडण्याचा निर्णय चार वर्षपूर्वीच घेतला होता. त्यावेळी या कंपनीचा मालक म्हणाला होता की तू कंपनी सोडलीस तर मला कंपनी बंद करावी लागेल. आपल्यामुळे एक कंपनी बंद व्हावी हे विजयच्या मनाला तेंव्हा पटले नाही. म्हणून त्याने आणखी चार वर्षे ओढले पण त्यामुळे विजयचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. विजयचे पायाचे दुखने बळावल्यावर विजयला खऱ्या अर्थाने विजयला पैशाची किंमत कळली. ज्या कंपनीच्या कामासाठी  विजयने पाय झिजवले होते ती कंपनी त्याच्या पायाचा उपचार आता करणार होती का ? तर नाही ! मग ! कमी पैशात शारीरिक त्रासाचे काम करणे हा गाढवपणाच होता हे विजयच्या लक्षात आले. आता विजयला ती कंपनी बंद झाली तरी काही फरक पडणार नव्हता. विजयच्या मानत एखादी गोष्ट पक्की ठरली कि ती कोणीही बदलू शकत नाही ! अगदी विजय स्वतःही ! त्यामुळे ती कंपनी बंद करण्याची तयारीही सुरु झाली… आपण सावरलेली एखादी कंपनी बंद होतेय याचे त्याला नक्कीच दुःख होते पण त्याहून दुःख ह्याचे होते की त्या कंपनीने आपल्याला आपल्या आयुष्यात काहीही मिळवून दिले नाही. विजयचे त्या कंपनीवर जितके प्रेम होते तितके त्या मालकाचेही नव्हते. त्याने फक्त आणि फक्त पैसे कमावण्यासाठी विजयचा वापर करून घेतला. त्यामुळे आता विजयला व्यक्तीश: इतके वर्षे एकत्र काम करूनही त्या मालकाशीही कोणताच संबंध ठेवण्यात काडीचाही रस उरलेला नव्हता. म्हणूनच विजयने त्याला कंपनी सोडत असल्याचेही फोन करून न सांगता व्हाट्स अँपवर मेसेज करून सांगितले होते…खरं तर हे विजयच्या स्वभावात बसणारे नव्हते पण माणूस किती स्वार्थी असू शकतो ! याचे त्या मालकाने त्याच्यासमोर उदाहरण उभे केले होते. विजयच्या आयुष्यात एकजात स्वार्थी माणसे आली होती पण त्या स्वार्थी माणसात सर्वात स्वार्थी माणूस हाच निघाला होता. विजय जेथे पाऊल ठेवतो तेथे लक्ष्मी पाऊल ठेवते. विजयच्या पावलाने त्या कारखान्यात लक्ष्मी आली होती आणि आता ती लक्ष्मी त्याच्या पावलासोबत निघूनही जाणार होती. त्यामुळेच विजयने कारखाना सोडताच त्याच्यावर तो कारखाना विकण्याची वेळ आली होती…वेळ विजयवर आली नव्हती तर वेळ आता त्याच्या त्या मालकावर येणार होती… त्या मालकाला याचे अनेकदा संकेत मिळूनही त्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केले होते… प्रत्येकाला आपल्या कर्माची फळे  भागवीच लागतात. कदाचित ! आता ती त्याच्या मालकाला भोगावी लागणार होती… विजय त्याच्यावर येणारी वेळ पुढे ढकलत होता पण आता नियतीने त्याचे हात नाही तर पायच बांधून ठेवले होते.

विजय ज्यांच्या – ज्यांच्या आयुष्यात येतो त्यांचे आयुष्य तो बदलतो…पण दुर्दैवाने हे काही लोकांच्या लक्षात येत नाही. कालांतराने त्या लोकांचा अभिमान हा वाढतोच ! मग ! तेच लोक  विजयचच महत्व कमी करण्याचा प्रयत्न करू लागतात आणि मग !  एक दिवस अचानक असे तोंडघशी पडतात या मालकासारखे ! हा असा अनुभव विजयच्या बाबतीत आलेली ही काही पहिली व्यक्ती नव्हती… हा सारा कलियुगाचा प्रभाव आहे… त्यामुळे त्यांच्या झालेल्या नुकसानीचे विजयला अजिबात दुःख होत नाही…विजयने फक्त त्या मालकालाच नाही तर कित्येकांना पुन्हा पुन्हा संधी दिली होती सुधारण्याची ! पण काही केल्या ते काही सुधारण्याचे नाव घेत नाहीत. त्या सर्वाना सतत वाटत राहते की आम्हीं विजयला फसवले आणि त्याला लक्षातही आले नाही. पण वास्तवात ! विजयच त्यांना फसवत असतो. विजयला त्याचे भविष्य ज्ञात असल्यामुळे त्याला त्याच्या भविष्याची चिंता नाही ! पण या सर्वसामान्य माणसांना आपले भविष्य माहित नसल्यामुळे ते आपलं भविष्य घडविण्याचे निरर्थक प्रयत्न करत असतात आणि तोंडघशी पडत असतात. कोणत्याही परिस्थितीत विजयच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न कधीच निर्माण होत नाही ! यावेळीही तो झाला नाही ! कारण तसा तो निर्माण होऊच शकत नाही ! कारण त्याच्या उदरनिर्वाहाची काळजी तो परमेश्वर स्वतः वाहतो. हा विजयचा भ्रम नाही तर त्याचा  अनुभव आहे..

— निलेश बामणे.

Avatar
About निलेश बामणे 417 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..