नवीन लेखन...

एक परीस स्पर्श (भाग – ५८)

आज विजय एका कारखान्यात त्या कारखान्याच्या मालकाला भेटायला गेला होता. त्या मालकाने हा कारखाना नव्यानेच सुरु केला होता. त्या कारखान्याचा मालक उत्तरभारतीय होता. त्याची बायको गर्भारपणात वारली त्यामुळे त्याला बरेच दिवस गावी थांबायला लागल्यामुळे त्याच्या मालकाने त्याला नोकरीवरून काढून टाकले. त्यामुळे त्याने दुसरीकडे नोकरी करण्यापेक्षा नोकरी सोडल्यामुळे आलेल्या पैशातून दोन लेथ मशीन विकत घेऊन छोटासा कारखाना सुरु केला. तो कामाच्या शोधात असतानाच एकदा विजय आणि त्याची भेट झाली होती. विजयला एकाच भेटीत माणसे ओळखता येतात त्यामुळे विजयने त्याचा मोबाईल नंबर घेऊन ठेवला होता. विजयचा पाय बऱ्यापैकी बरा झल्यावर विजयने त्याला एक जॉब करायला दिला होता पण नंतर विजय गावी गेल्यामुळे आणि तो कारखान्याचा मालक आजारी पडल्यामुळे तो जॉब लटकला. त्यासंदर्भात विजय त्याच्या कारखान्यावर त्याला जाता -येता  भेटायला चार – पाच वेळा गेला, प्रत्येक वेळी विजयने त्याला कामाच्या बाबतीत काही सूचना आणि काही उपाय सुचविले त्यामुळे विजय त्याच्या कारखान्यात पाय ठेवण्यापूर्वी तोट्यात चालणार त्याचा कारखाना नफ्यात चालू लागला. आज जेंव्हा विजय त्याच्या कारखान्यात गेला तेव्हा त्याला पैशाची चिंता होती. एक पार्टी त्याला पैसे द्यायला येणार होती. विजयच्या उपस्थितीत ती पार्टी तेथे आली आणि तिने त्याला हवे होते तेवढे पैसे दिले. ती पार्टी निघून गेल्यावर विजयने त्याला विचारले कि अब मेरे जॉबका क्या? त्यावर तो म्हणाला,” करेंगे ! आप का जॉब हो जायेगा तो आप इधर नहीं आओगे ,”आप आतेहो तो मुझे अच्छा लगता है ! त्यावर विजय म्हणाला , ” ऐसा कुछ नही !. विजयला लक्षात आले होते कि, त्याला विजयचा पायगुण कळला होता. त्यामुळे विजय त्याला त्यावर काहीच न बोलता त्याचा निरोप घेऊन आपल्या दुसऱ्या मित्राला भेटायला निघून गेला. विजयच्या पायगुणाची जादू विजयला माहीत होती. पण ती जादू ओळखणारा विजयला आज पहिला माणूस भेटला होता. विजय त्याला त्याच्या नशिबाने भेटला होता. विजय असाच कधीच कोणाला भेटत नाही. ज्याचे भाग्य बदलणार असते त्यालाच विजय भेटतो. रात्री विजय शेअर रिक्षातून माघारी घरी येत असताना त्याच्या बाजूला एक तरुणी बसली होती. तरुणी विजयच्या नजरेतून फार सुंदर वगैरे नव्हती. पण ती इतरांच्या नजरेत सुंदर नसेलच असे नाही. ती विजयच्या बाजूलाच बसून कोणाशीतरी अगोदर हिंदीत बोल्त होती त्यामुळे विजयला वाटले ती हिंदी भाषिक असावी, पण नंतर ती मराठीत बॊलयाला लागली कदाचित ती विजयला मराठी समजली नसावी म्हणून तिने मराठीत बोलायला सुरुवात केली, लोकांचा संवाद हे विजयचे खाद्य,” ती फोनवर कोणा तरुणाशी बोलत होती.” त्याला सांगत होती कि ती जेथे कामाला होती. तेथे एक मुलगा पूर्वी म्हणे सारखा तिच्याकडे पाहत होता. आणि आता तिच्याकडे पाहतही नाही, का ते तिला कळत नव्हते. पुढे ती त्याला म्हणाली,” दोन दिवसापूर्वी ती जेथे फोटो काढायला गेली होती, तेथे फोटो काढणारा दादा ! दिसायला खूप संदर होता. त्यावर समोरचा तिला म्हणला,” मग ! तू त्याला दादा का म्हणतेस? त्यावर ती म्हणाली,” माझ्या तोंडून दादाच निघत ,” त्यावरून विजयला आठवले, ” एकदा अनामिका आणि तिच्या बहिणीसमोर  समोर एक सुंदर तरुणी विजयला दादा ! म्हणाली होती,” तेंव्हा पासून अनामिकाची बहीण विजयला दादा ! म्हणून चिडवायला लागली होती, पण तिला आणि अनामिकाला  हे माहीत नव्हते की विजयचे ” दादा ” हे टोपण नाव आहे.विजयला लहानपणापासून आजूबाजूची वीस पंचवीस मुले दादा म्हणायची,” त्यामुळे  बऱ्याच मुली त्याला दादाच म्हणायच्या.त्यामुळे विजयला कोणतीही मुलगी दादा म्हणाली तर तो ते फार मनावर घेत नसे. विजयने त्याच्या घरी त्याच्या कमाईचे पैसे द्यायचे बंद केले की घरात आर्थिक तंगी आल्यासारखी परिस्थिती निर्माण होते. का? ते विजयला कळत नाही? विजयच्या मेहनतीचे थोडेसे पैसेही घरखर्चाला मोठा आधार देतात. म्हणून तर विजय परिससारखा आहे त्याचा स्पर्श झालेली प्रत्येक गोष्ट सोन्यासारखी होते. अनामिकेच्या हाताला विजयचा  एकदाच स्पर्श झाला होता.तो एक स्पर्श विजयला आजही आठवतो आणि त्याच्या मानत गुदगुल्या निर्माण करतो. त्या स्पर्शानंतर अनामिकेच्या आयुष्यात नक्की काय बदल झाले ते विजयला माहीत नाही. पण अनामिका विजय समोर बॊलायला घाबरतही असे आणि लाजतही असे ! का? ते तिलाच माहीत. त्यामुळेच तिच्यात आणि विजयच्यात कधीही उत्तम संवाद होऊ शकला नाही. पण विजयाच्या बोलण्याकडे तिचे आणि तिच्या बोलण्याकडे विजयचे बारीक लक्ष असे. विजयच्या प्रेम कविता वाचल्यामुळेच कदाचित अनामिकाचा असा गैरसमज झालेला असावा कि विजयचे कोणासोबत तरी प्रेमप्रकरण असावे ! आणि यापूर्वी विजयच्या आयुष्यात असणाऱ्या तरुणी अनामिकाला माहीत होत्या. त्यामुळे विजय तिच्या  प्रेमात पडला असेल असे तिला वाटणे अशक्य होते. विजयने आपले प्रेम तिच्यापर्यत पोहचविण्याचे निर्थक प्रयत्न बरेच केले होते.

विजयला अनामिका आणि त्याच्या प्रेमाचा शेवट काय होणार हेच कळत नाही. आज रस्त्याने श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने विजयने काही लहान मुलांना कृष्णाच्या आणि राधेच्या वेशात शाळेत जाताना पहिले आणि त्याला आठवले विजय लहान असताना दहीहंडीच्या चारपाच दिवस आधीपासूनच त्याच्या घरासमोरील  गल्लीत गल्लीतील सर्व लहान मुलांना जमा करून  हंडी बांधून ती फोडत असे तेव्हाची ती मजा विजयने नंतर कधीही अनुभवली नाही आता तर हंडी फोडणे दूरच राहिले ती फोडताना तिच्या आजूबाजूलाही तो उभा ही  राहत नाही. त्याला कारण एक एकच विजयाच्या लहानपणी त्याच्यात जो उत्साह होता तो आता नावालाही शिल्लक राहिलेला नाही. श्रीकृष्णाने बरीच लग्न केली पण श्रीकृष्णासोबत आदराने नाव घेतले जाते ते राधेचे ! राधेसोबत त्याने विवाहही केला नव्हता. राधेचे त्याच्यावर आणि त्याचे राधेवर निरपेक्ष प्रेम होते. तसे प्रेम सध्याच्या कलियुगात कोणी करूच शकत नाही. प्रेम यशस्वी होणार नाही हे पाहिल्यावर आत्महत्या करणारे खरे प्रेमी नसतात तर ते भ्याड असतात. या जगात प्रेमापेक्षा कशातही जास्त ताकद नाही. पण ती ताकद ओळखता यायला हवी.     प्रेम म्हणजे काही आयुष्य नसते प्रेम हा आयुष्याचा एक अविभाज्य भाग असतो. या सृष्टीतील प्रत्येक गोष्टीवर प्रत्येकाला प्रेम करता आले पाहिजे पण ते प्रेम निस्वार्थी असायला हवे ! विजयचे अनामिकावर प्रेम होते तिच्यासाठी तो दिवस रात्र झुरत होता पण त्याला तिच्याकडून त्या बदल्यात काही अपेक्षा नव्हती. फक्त  ती त्याच्या आयुष्याचा भाग व्हावी इतकीच त्याची इच्छा होती. ती इच्छाही त्याच्या मनात नियतीने निर्माण केलेली होती. विनाकारण कोणीही कोणाच्या प्रेमात पडत नाही. तसे असते तर अनेक प्रेमविवाह अयशस्वी झाले नसते. तुमचे कोणावर फक्त प्रेम आहे म्हणून कोणी तुमच्या आयुष्यात येत नाही. तुमच्या आयुष्यात येणारी प्रत्येक व्यक्ती ही नियतीने योजलेली असते. पूर्वी विजय ठरवून कित्येकांच्या प्रेमात पडला होता, त्यांना त्याच्या प्रेमात पाडण्यासाठी त्याने नानाविध प्रयोगही केले होते. त्याच्या प्रयत्नांना यशही आले होते काहीजणी त्याच्या प्रेमातही पडल्या होत्या. पण त्यातील एकही त्याच्या आयुष्याचा भाग मात्र होऊ शकली नाही. लहानपणापासून एकमेकांवर प्रेम करणारे तरुणपणी लग्न करतात लग्नानंतर त्यांना मुलं होतात ती मुलं पंधरा सोळा वर्षाची झाल्यावर त्या दोघाच्याही आयुष्यात नवीन स्त्री पुरुष येतात ते पुन्हा प्रेमात पडतात आणि एकमेकांपासून घटस्फोट घेऊन दुसरी लग्ने करतात. या सगळ्यात प्रेम आहे कोठे? म्हणजे आज आपण ज्याला प्रेम समजतो तो फक्त एक भ्रम आहे. प्रेम हे त्यागाचे दुसरे रूप आहे. स्वार्थाचे नाही. प्रेमात शारीरिक सुखाला काडीचेही महत्व नाही.नेमके हेच आजच्या तरुण पिढीला कळत नाही. त्यामुळे एकमेकांवर प्रेम करायचे म्हणजे एकमेकांचे शरीर एकमेकांना अर्पण करायचे असा गैरसमज समाजात वाढीला लागलेला आहे त्यामुळे हल्ली प्रेमात पडलेल्यांची विवाहपूर्वीच शारीरिक संबंध सर्रास येतात हे वास्तव आहे. फक्त शारीरिक संबंधासाठी जे प्रेम जन्माला येते त्या प्रेमाचे आयुष्य फारच कमी असते. त्यामुळे समाज एक गैरसमज पसरलेला दिसतो की प्रेमविवाह टिकत नाही ! कसे टिकणार? विजयच्या आयुष्यात अनामिका येण्याच्या अगोदर जवळ जवळ दोन डझनभर मुली त्याच्या आयुष्यात आल्या होत्या पण त्यातील एकीचाही गैरफायदा घेण्याचा विचार त्याच्या मनालाही कधी  शिवला नाही.त्याच्याआयुष्यात आलेल्या मुलींच्या तुलनेत अनामिका सर्वच बाबतीत डावी असतानाही तो तिच्या प्रेमात का पडला हा प्रश्न कधी कधी त्याला स्वतःलाही सतावतो. पण त्याचे उत्तर आता सगळ्यांनाच माहीत आहे ते म्हणजे नियती.

— निलेश बामणे.

Avatar
About निलेश बामणे 416 Articles
Poet & Writer Editor - Marathi magzine Sahitya Upekshitanche
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..