नवीन लेखन...

भारतमातेच्या वीरांगना – 19 – बिना दास

एखादी स्त्री कधीतरी आपल्या तारुण्यात कुणाचा तरी खून करायचा विचार करेल का? आणि समजा कोणी केलाच असेल तर त्यामागे केवढा असंतोष तसेच मोठा विचार असेल, नाही का? बिना दास ह्या त्या वीरांगना ज्यांनी वयाच्या २१ व्या वर्षी नुसताच विचार नाही तर हे साहस केले.

२४ ऑगस्ट १९११ साली ब्रम्ह समाजी शिक्षक श्री बेनी माधव दास आणि समाजसेविका श्रीमती सरला देवी ह्यांच्या घरी हे कन्यारत्न जन्माला आले. अर्थात घरातले वातावरणच जर शैक्षणिक, समाजमनप्रेरीत आणि क्रांतिकारी असेल तर मुलीही तश्याच घडणार. कल्याणी दास आणि बिना दास दोघी बहिणी आपल्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. बिना लहानपणापासूनच बंडखोर होत्या, क्रांतिकारी होत्या अर्थात त्यांना बाळघुटीतून हेच विचार दिले गेले. त्या शाळेत असतांनाच एक प्रसंग इथे नमूद करावासा वाटतो. तेव्हाच्या ब्रिटिश व्हायसरायच्या पत्नी एकदा बिनाजींच्या शाळेत येणार होत्या. त्यांच्या स्वागताची जंगी तयारी सुरू झाली. बिनाजींची निवड त्यांच्या स्वागत समितीत करण्यात आली. त्या येतील त्यावेळी त्यांच्या वर फुले उधळायची आणि त्यांना फुलांच्या पायघड्या घालायच्या अशी योजना केली होती. आपली भारत माता ज्यांच्या मुळे पारतंत्र्यात आहे अश्यांचे स्वागत!! बिना नुसत्याच अस्वस्थ झाल्या नाहीत तर अपमानितपणाची भावना त्यांच्या मनात निर्माण झाली आणि ते करण्याला त्यांनी साफ नकार दिला. त्या शाळकरी मुलीच्या जीवाची होणारी तगमग कदाचित आपल्या पर्यत पोहचू शकणार नाही.

बिना वाढत राहिल्या, आपल्या आई-वडिलांच्या, आपल्या मोठ्या बहिणीच्या छायेत आणि नकळत, अगदी सहज एक तरुण क्रांतिकारी घडली. त्या घडतांना त्यांनी ब्रिटिश अत्याचाराच्या कथा ऐकल्या, पहिल्या आणि त्यांच्या मनातला विचार अगदी घट्ट होत गेला, भारतमातेच्या स्वातंत्रतेचा. ज्यांचे वडील सुभाष चंद्र बोसांचे शिक्षक होते ती व्यक्ती पण आपल्या गुरू बंधू सारखीच घडणार. त्यांच्या आईने एकदा सुभाषजी जेव्हा त्यांच्या घरी आले होते, तेव्हा हे त्यांना सांगितले सुद्धा होते.

आपल्या कॉलेज काळात त्या अर्ध क्रांतिकारी संघटन छत्री संघटन च्या सभासद होत्या. प्रत्येकाचे स्वप्न आपले शिक्षण पूर्ण करून पदवीदान समारंभानंतर आयुष्यात पुढे वाढण्याचे असते. पण बिनाजींचा पदवीदान समारंभ त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. त्या समारंभ साठी बंगाल चे गव्हर्नर स्टेनली जॅक्सन येणार होते. बिनाजीं ने आपल्या सह क्रांतिकारी कमला दास गुप्ता ह्यांच्याकरवी एक पिस्तुल मिळवले. स्टेनली जसे सभागृहात आले त्यांच्यावर बिना जींने गोळी झाडली, ती त्यांना न लागता त्यांच्या कानाजवळून गेली आणि स्टेनली जमिनीवर झोपले. जवळ उपस्थित पोलीस अधिकाऱ्याने बिनाजींना पकडले तो पर्यत त्यांनी ४ आणिक गोळ्या झाडल्या पण तो गव्हर्नर वाचला. बिनाजींन अटक झाली आणि ९ वर्ष सश्रम कारावास झाला. आपल्या कबुली जवाबत बिनाजी म्हणाल्या, “माझा उद्देश मरण हाच होता, आणि जर मरायचेच आहे तर मग अश्या निरंकुश, दडपशाही सरकार विरुद्ध लढतांना मरणे हे केव्हाही श्रेयस्कर नाही का? जिने माझ्या मातृभूमीला अतोनात छळले आहे आणि पारतंत्र्यात ठेवले आहे. मी स्वतःला प्रश्न विचारला की अश्या भारतात जगणे योग्य आहे का जो दुसऱ्याच्या जुलमी शासनाच्या आधीन आहे, का आपल्या जीवाची आहुती देऊन त्याच्या विरुद्ध बंड पुकारणे? जर एका भारतमातेच्या मुलीच्या आणि त्या इंग्लडच्या मुलाच्या मृत्यू ने माझ्या भारतवासीयांना जाग येणार असेल की जे अजूनही ही अधिनता मान्य करून पाप करताहेत आणि इंग्लंडला आपल्या अधर्मी वर्तनाबद्दल जाग येईल? “. बिनाजींचा कबुली जवाब ५ पानी होता, पण तो तेव्हाच्या ब्रिटिश सरकार ने दाबून टाकला.

कारावासात थोडी सूट मिळून त्या लवकर बाहेर आल्या आणि १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला आणि परत एकदा कारावासात गेल्या १९४२ ते १९४५. पुढे स्वातंत्र्य मिळल्यावरही त्यांनी १९५१ पर्यत विधानसभेची सभासद राहून आपले काम करत राहिल्या. त्यांचे पती जतीशीचंद्र भौमिक (युगांतर ह्या क्रांतिकारी समूहाचे सदस्य) च्या निधनानंतर त्या ऋषिकेश येथे एकाकी जीवन जगल्या आणि २६ डिसेंम्बर १९८६ ला ही क्रांतीज्योती शांत झाली.

१९६० साली ह्या ‘अग्निकन्येला’ त्यांच्या सामाजिक कामासाठी भारत सरकाने पद्मश्री देऊन सन्मानित केले. १९३२ च्या घटनेनंतर त्यांना ब्रिटिश सरकारनी पुढील शिक्षणाला बंदी केली होती, त्याच्या ८१ वर्षांनंतर मरणोप्रांत त्यांना कोलकत्ता महाविद्यायला तर्फे BA होनोर्स ही पदवी देण्यात आली. ह्या अग्निकन्येला माझे त्रिवार वंदन.

|| वंदे मातरम् ||

— सोनाली तेलंग.

२२/०६/२०२२

संदर्भ :

१. biography by Bhartiya Vidya Bhavan

२. amritmahotsav.com

३. wikipedia.com

Avatar
About सौ. सोनाली अनिरुद्ध तेलंग 60 Articles
मी सोनाली अनिरुद्ध तेलंग, विज्ञान शाखेत स्नातक आहे. सध्या "conginitive science based brain and skill development for growing child " वर काम करते. मी गेली १०-१२ वर्ष वेगवेगळ्या विषयांवर लिखाण करते. लिखाणाचा रोख मुख्यत्वे मनुष्य स्वभाव, भारतीय संस्कृती ह्यावर असतो. आपले पदार्थ आपल्या पुढच्या पिढीला वारसा हक्कात देण्याची जवाबदारी आपली असते, त्यामुळे मराठी व इतर पाककृती स्वतः करते आणि सगळ्यांबरोबर शेअर करते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..