व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेला शंकर जाधव यांचा लेख
आज जगातील प्रत्येक विकसित व विकसनशील देशात शेअर बाजाराचे अस्तित्व आहे. भारतात पहिला संघटित शेअर बाजार १८७५ मध्ये मुंबईमध्ये स्थापन झाला जो आशियातील सर्वात जुना बाजार आहे.
पूर्वपीठिका:
जागतिक कीर्ती संपादन करून, सर्वोत्तम स्टॉक एक्सचेंज म्हणून नांवारूपाला आलेल्या या एक्सचेंजला १४५ वर्षांची गौरवशाली परंपरा व इतिहास आहे. ९ जुलै १८७५ साली मुंबई स्टॉक एक्स्चेंज (बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज ) ची स्थापना झाली असली तरी स्थापनेच्या २५ वर्षांआधीपासून शेअर दलालांचं काम सुरू होतं. त्याकाळच्या टाऊन हॉलच्या (आताचे हॉर्निमन सर्कल) बाजूला असलेल्या वडाच्या झाडाखाली शेअरची खरेदी-विक्री करायला सुरुवात केली गेली. या खरेदी-विक्रीत दिवसेंदिवस दलालांची संख्या वाढत गेली.
दलालांची संख्या वाढल्याने त्याकाळच्या मेडोज पथ (आताचे महात्मा गांधी पथ) वरील वडाच्या झाडाखाली बाजार भरवायला सुरुवात केली. १८७५ मध्ये २५ दलाल एकत्र आले आणि त्यांनी ‘दि नेटीव्ह शेअर अॅण्ड स्टॉक ब्रोकर्स असोसिएशन’ नावाची संस्था स्थापन केली आणि अधिकृतरित्या या शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात झाली. या २५ दलालांनी प्रत्येकी १ रुपया काढून या संस्थेची स्थापना केली असल्याचंही म्हटलं जातं. १८७५ ते १९५७ या काळात झालेले सर्व व्यवहार फक्त एकमेकांवरील विश्वासावर होत होते. या काळात अस्तित्वात आलेले नियम आणि संकेत हे पुढे स्थापन झालेल्या २३ समभाग बाजारांनी जसेच्या तसे स्वीकारले. ३१ ऑगस्ट १९५७ रोजी भारत सरकारने या बाजारास सिक्युरिटीज कॉन्ट्रक्ट अॅक्ट १९५६ अन्वये मान्यता दिली. अशा तऱ्हेने भारतातील पहिला मान्यताप्राप्त शेअर बाजार अस्तित्वात आला.
कार्यविस्तार
सध्या एक्सचेंजचे कामकाज कार्यकारी संचालकाच्या नेतृत्वाखाली असलेल्या संचालकांमार्फत होत असते. या संचालक मंडळात प्रतिष्ठित व्यावसायिक, ट्रेडिंग सदस्यांचे प्रतिनिधी आणि सर्वसाधारण प्रतिनिधींचा समावेश आहे. बीएसईची कार्यप्रणाली अशी आहे की त्यामुळे बाजारात पारदर्शकता आणि सुरक्षितता अनुभवायला मिळते.
या एक्सचेंजमध्ये ‘ट्रेडिंग राईट’ आणि ‘ओनरशीप राईट’ हे दोन्ही परस्परांपासून वेगळे आहेत. असे असल्यामुळे गुंतवणूकदारांच्या हिताचे चांगल्या प्रकारे संरक्षण होते. एक्सचेंज इक्विटी, डेब्ट तसंच फ्युचर्स आणि ऑप्शन्सची कार्यपद्धती व पारदर्शक ट्रेडिंग सिस्टिम सुनिश्चित करते. बीएसईची ऑन लाईन ट्रेडिंग सिस्टीम देखील दर्जेदार आहे. जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त अशा इनफॉर्मेशन सिक्युरिटी मैनेजमेंट सिस्टिमतर्फे याला दर्जा आणि BS 779-2-2002 प्रमाणपत्र मिळालेले आहे.
असे प्रमाणपत्र मिळवणारे बीएसई हे भारतातील एकमेव व जगातील दुसऱ्या क्रमांकाचे एक्सचेंज आहे. विविध माहितीचे एकत्रीकरण, जोखीम नियंत्रण, तंत्रज्ञान पद्धती, तसेच लोकांच्या संपत्तीची सुरक्षितता यासाठी BS 7799 हा आंतरराष्ट्रीय पातळीवरील नामांकित असा मापदंड आहे.
भारतातील हे स्टॉक एक्सचेंज हे लिस्टेड कंपन्यांची संख्या आणि बाजाराचे कैपिटलाइजेशन ह्या दोन्ही बाबतीत मोठे आहे.
बीएसई हे भारताच्या कॅपिटल मार्केटचे प्रतीक मानले जाते. बीएसईचा सेन्सेक्स (निर्देशांक) हा देशाच्या अर्थव्यवस्थेचे आणि वित्तबाजारातील उलाढालीचे प्रतिबिंब दर्शवणारा बेंचमार्क – इक्विटी इंडेक्स आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर समांतर राहून बीएसई अनेक बाबतीत आघाडीवर आहे. तीव्र स्पर्धेच्या युगात बीएसईने प्रभावी नेतृत्वाने यश संपादन करून आपली यशोगाथा पुढे चालू ठेवलेली आहे.
एका दृष्टिक्षेपात बीएसई
- इक्विटी डेरिव्हेटिव्ह चालू करणारे भारतातील पहिलं एक्सचेंज
- फ्री फ्लोट इंडेक्स चालू करणारे भारतातील पहिलं एक्सचेंज
- एक्सचेंजवर आधारित इंटरनेट ट्रेडिंग प्लेटफॉर्मची स्थापना करणारं भारतातील पहिलं एक्सचेंज
- सर्व्हेलन्स, क्लियरिंग आणि सेटलमेंटच्या बाबतीत आयएसओ प्रमाणपत्र मिळवणारं देशातील पहिलं एक्सचेंज
- बीएसई ऑनलाईन ट्रेडिंग सिस्टीम म्हणजेच बोल्टला विश्वस्तरावरील मान्यताप्राप्त इनफॉर्मेशन सिक्युरिटी मॅनेजमेंट सिस्टिम स्टँडर्ड बीएसई बीएस ७७९९-२-२००२ मिळवणारे एक्सचेंज.
- फायनान्शिअल ट्रेनिंग (वित्तीय उलाढाल प्राशिक्षण) सुरू करणारे पहिले एक्सचेंज
- जुन्या ट्रेडिंग रिंग सिस्टीम पासून ते इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग पर्यंतचा आधुनिक स्थित्यंतराचा प्रवास अवघ्या ५० दिवसांत पूर्ण.
- ‘बीएसई ऑन वेब’ ही वेगळी सुविधा बीएसईने तयार केली आहे – त्याद्वारे गुंतवणूकदार देशातील कोणत्याही भागातून किंवा घरी बसून, ब्रोकर्समार्फत ऑन-लाईन ट्रेडिंग करू शकतात.
- बीएसईच्या गुंतवणुकदारांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा सुविधा उपलब्ध आहेत त्यामध्ये मुख्य आहे बीएसई ऑन वेब सेवा. ही एक अशी सेवा आहे की कोणीही व्यक्ती अगदी घरी बसून किंवा कुठूनही इंटरनेटच्या माध्यमातून शेअर्सची खरेदी-विक्री करू शकते.
- बीएसई ट्रेनिंग इन्स्टिट्यूट मार्फत शेअर बाजार संबंधातली विषयांबाबतचे शिक्षण/ प्रशिक्षण दिले जाते.
या प्रकारे देशाच्या भांडवल बाजाराच्या विकासात बीएसईचे नेहमीच महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. भारताने आंतरराष्ट्रीय वित्त बाजारात जे श्रेष्ठ स्थान मिळवले आहे त्यात बीएसईची भूमिका महत्त्वपूर्ण आहे.
स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेचे तत्त्व
बीएसई ही संपूर्णतः आपल्या मातीतील आर्थिक संस्था आहे. त्यामुळे सामान्य माणसापासून उद्योगपतींपर्यंत सर्वांना कसे स्थैर्य देता येईल यासाठी बीएसई प्रयत्नशील असते. देशात कोणतीही आपत्कालीन स्थिती आली तरी जबाबदारीने पावले उचलली जातात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकही दिवस बाजार बंद नव्हता, गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला कारण त्यांचे पैसे सुरक्षित होते. प्रत्येक व्यक्ती अर्थनिर्भर व्हावी यासाठी म्युच्युअल फंडच्या योजनांप्रमाणे, परदेशी कंपन्यांशी टायअपसुद्धा केले आहे. लघुउद्योग आणि लहान व्यावसायिक यांना योग्य दरात भांडवल उपलब्ध करून देण्यासाठी बीएसईने अनेक पावले उचलली आहेत. महिलांनीही या क्षेत्रात यावे यासाठी काही योजना राबवल्या. त्याचप्रमाणे आणखीही अनेक प्रशिक्षण योजना आगामी काळात कार्यन्वित होतील.
MSME उद्योगांनासुद्धा शेअर बाजारातून भांडवल उभे करता यावे यासाठी BSE SME ची स्थापना करून एक नवीन आश्वासक पर्याय निवडून दिला.
“जागतिक स्तरावर अग्रेसर रहात देशातील प्रमुख शेअर बाजार म्हणून प्रस्थापित होणे” या ध्येयाने वाटचाल करणारी बीएसई लिमिटेड, शेअर बाजारच्या वैभवशाली परंपरेला साजेसे असे हे एक्सचेंज देशातील शेअर बाजारांमध्ये दीपस्तंभाप्रमाणे आहे.
महत्त्वाचे मुद्दे
- Industries & Commerce Department, Govt. of Telangana हे BSE आणि Global inssur यांच्या सहकार्याने MSME ना भांडवल उभारणीसाठी एकत्र आले आहेत.
- BSE हे भारतातील एक प्रतिष्ठीत आणि भारतातीलच नव्हे, तर जगातील सर्वात मोठे एक्सचेंज आहे.
- BSE SME वर ३३० कंपन्या लिस्टेट आहेत.
- SME लिस्टेड कंपन्यांची Mkt cap 21,338 (Rs. Cr.) आहे. आतापर्यंत एकूण भांडवल उभारणी ३,३८१.४० करोड इतकी आहे.
- BSE हे आशियातील पहिले आणि जगातील सर्वात जलद स्टॉक एक्सचेंज आहे.
- BSE चा स्वतःचा असा SME Trading साठी Platform देखील आहे. तसेच Dedicated MF distribution platform आहे.
- BSE Star MF जे भारतातील सर्वात मोठे Matual Fund Distribution Infrastructure आहे.
- २०१८ मध्ये BSE ने Commodity derivatives trading Launch केले. ज्यात Gold, Silver, Copper, Oman Crude Oil, Guor Gum, Guor seeds and Turmeric ट्रेडिंग केले जाते.
- BSE तर्फे अनेक सेवा दिल्या जातात. जसे Services to Capital Market, Participats Rise Management, Clearing, Settelment, Market Data Services and Education.
- BSE ने YES Bank बरोबर SME उद्योगांच्या वाढीसाठी उपक्रमांसाठी एक सामंजस्य करार नुकताच केला.
- यासारख्या आपाद परिस्थितीतसुद्धा १२ ऑक्टोबर २०२० ला BSE Star MF ने एक विक्रम प्रस्थापित केला. फक्त एकाच दिवसात रेकॉर्ड १२.८८ लाख Transaction केले.
- या कठीण परिस्थितीत BSE Star MF ने ग्राहकांना Paperless Transactions करून खूप चांगली सुविधा दिली.
•आजमितीस Star MF चा SIP Book Size ५४ लाख आहे.
– शंकर जाधव
Head Strategy BSE
(व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंका मधून)
Leave a Reply