नवीन लेखन...

इ-बुक रीडर

हाताच्या पंजाच्या आकाराच्या एखाद्या साधनावर पुस्तक वाचता आले तर किती छान होईल. नेमकी हीच कल्पना इ-बुक रीडरच्या माध्यमातून प्रत्यक्षात आली आहे. इ-बुक रीडरलाच इ-बुक डिव्हाइस किंवा इ-रीडर असेही म्हटले जाते. डिजिटल पुस्तके, नियतकालिके वाचण्यासाठी या साधनाचा उपयोग होतो.

इ-बुक रीडरचा विषय निघाला की, ॲमेझॉनच्या किंडलचा उल्लेख प्रामुख्याने करावाच लागेल. यात हवा तो मजकूर त्या छोट्याशा यंत्राच्या पडद्यावर दाखवण्यासाठी इ-इंक तंत्रज्ञानाचा वापर केलेला असतो. या साधनाचा फायदा म्हणजे ते अधिक छोटे, कुठेही नेता येण्यासारखे असते. प्रकाशातही त्याच्या पडद्यावरील मजकूर वाचता येतो.

शिवाय याच्या बॅटरीचे आयुष्यही भरपूर असते. पर्सनल डिजिटल असिस्टंट म्हणजे पीडीए साधनांवर जसे आयफोन, आयपॅड यावरही असा मजकूर वाचण्याची सुविधा असू शकते, पण त्यात इ-रीडरची सगळी वैशिष्ट्ये नसतात. या इ-बुक रीडरमध्ये जे ‘इ इंक’ तंत्रज्ञान वापरले जाते ते एमआयटी मीडिया लॅबने १९९७ मध्ये तयार केलेले आहे.

तो एक प्रकारचा इलेक्ट्रॉनिक पेपरच असतो. सध्या यात ‘ग्रेस्केल’ व ‘कलर’ अशा दोन स्वरूपात इलेक्ट्रॉनिक पेपर उपलब्ध असतो. त्याचा वापर मोबाईल संच, इ-रीडर, काही मोबाईल फोन व घड्याळे यांच्यात केलेला असतो. ॲमेझॉनचा ‘किंडल’ हा इ-बुकरीडर फॉक्सकॉमने उत्पादित करून दिला आहे. त्याच्या तीन पिढ्या बाजारात आहेत. आता किंडल प्रकारातील दुसरी पिढी २०१० मध्ये बाजारात आली आहे, तिचे नाव आहे ‘किंडल डीएक्स’. ‘किंडल डीएक्स ग्राफाईट’ ही तिसरी पिढी असून त्याच्या पडद्यावर मजकूर अधिक स्पष्टपणे दिसतो. लिनक्स ऑपरेटिंगवर तो चालतो.

किंडलची क्षमता ४ जीबीपर्यंत आहे. वजन २४० ते ५४० ग्रॅम इतके आहे. २००७ मध्ये किंडलने पहिले उत्पादन बाजारात आणले व त्यानंतर अवघ्या साडेपाच तासात ते सोल्डआउट झाले, यावरून त्याची लोकप्रियता लक्षात येते. इ-इंक वर्ल तंत्रज्ञान वापरून बनवलेले इ बुक रीडर अधिक स्पष्टपणे मजकूर दाखवतात. इ-इंक ट्रायटनमुळे प्रखर प्रकाशातही पडद्यावरील मजकूर डोळ्याला ताण न देता वाचता येतो. शिवाय हा कलर डिस्प्ले असतो.

इ-इंक ट्रायटन तंत्रामुळे आपल्याला ग्रे कलरच्या किमान १६ छटा दिसतात व ४०९६ वेगवेगळे रंगही यात असतात. सोनी व इतर अनेक कंपन्यांचे इ-बुक रीडर बाजारात आहेत. आता गुगलही या स्पर्धेत उतरत आहे. या तंत्रज्ञानामुळे आता काही वृत्तपत्रे व नियतकालिकेही सहजपणे इ-बुक रीडरवर वाचता येतात. अनेक वृत्तपत्रांनी पाश्चात्त्य देशात हे माध्यम वापरले आहे. ‘एस्क्वायर’ नावाचे पहिले नियतकालिक ऑक्टोबर २००८ मध्ये इ-बुक रीडरवर उपलब्ध करण्यात आले होते.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..