भाद्रपद महिन्यात शुक्लपक्षातील ज्येष्ठा नक्षत्रावर गौरी पूजन करावे. संबंध येत नाही. गौरींचे पूजन ज्येष्ठा नक्षत्रावर होत असल्याने याला या व्रतात अनुराधा नक्षत्रावर गौरींचे आवाहन, ज्येष्ठा नक्षत्रावर पूजन व मूळ नक्षत्रावर विसर्जन करतात. या व्रतासाठी काही ठिकाणी धातूची मूर्ती, काही ठिकाणी मातीची मूर्ती, काही ठिकाणी कागदावरचे चित्र तर काही ठिकाणी पाच लहान खडे पूजनाला घेतात.
दक्षिण भारतात भाद्रपद शुद्ध तृतीयेला गौरीचा सण सुरु होतो. प्रत्येक गावात गौरीची पीठाची प्रतिमा करून मखरात ठेवतात. तिची मिरवणूक सुद्धा काढतात.
गौरी ही शिवांची चिशक्ती असून आध्यात्मिक दृष्टीने तिला शिवरूप आत्म्याची बाह्यात्कार वृत्तीच मानले आहे. हे व्रत नक्षत्र प्रधान आहे. येथे तिथींचा गौरी असेही म्हणतात.
Leave a Reply