नवीन लेखन...

डिजिटल ब्लड प्रेशर मशीन कसे वापरावे?

मित्रांनो, BP म्हणजे ब्लड प्रेशर मशीन हे एक प्रकारचे उपकरण आहे जे रक्तदाब म्हणजे BP मोजण्यासाठी वापरले जाते. आज काल बऱ्याच घरांमध्ये हायपर टेन्शन, हाय किंवा लो ब्लड प्रेशरची समस्या किंवा आजार असतो. रक्तदाब म्हणजेच BP चा त्रास असणाऱ्या व्यक्तीचा वेळोवेळी BP चेक करावा लागतो. व तो आपण BP मशीन द्वारे चेक करू शकतो. तसेच प्रत्येक वेळी डॉक्टरकडे जाणे शक्य होत नाही, त्यासाठी घरात एखादे BP मॉनिटर मशीन असणे सोयीस्कर होते.

BP मॉनिटर मशिन चे प्रकार:
मित्रांनो, BP मॉनिटर मशीन चे दोन प्रकार असतात. एक ऑटोमॅटिक आणि दुसरे मॅन्युअल. डॉक्टर लोक जे मशीन वापरतात त्याला स्फिग्मोमॅनोमिटर असे म्हणतात.

1) ऑटोमॅटिक – ऑटोमॅटिक बीपी BP मॉनिटर्स वापरण्यास अगदी सोपे असतात. याचा वापर घरातील मोठी कोणतीही व्यक्ती करू शकते. त्याचे फक्त एक बटन दाबले की एक मिनिटात रक्तदाब मोजला जातो. त्यात दिलेल्या डिजिटल डिस्प्ले वर तुम्ही तुमचा रक्तदाब किती आहे ते पाहू शकता.

2) मॅन्युअल – मॅन्युअल BP मॉनिटर्स हे फक्त प्रोफेशनल्स वापरू शकता. यामध्ये एक कफ (cuff) येतो जो हवेने फुगवता येतो, एक बल्ब जो प्रेशर तयार करण्यासाठी हवा पंप करतो आणि मोजमाप करणारे युनिट ज्यात पारा (Hg) असतो. ज्याला स्फिग्मोमॅनोमिटर असे म्हणतात.

ब्लड प्रेशर मॉनिटर मशीन खरेदी करण्याआधी काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात:

योग्य कफ (cuff) आकार – तुम्ही जे BP मॉनिटर खरेदी करत आहात ते तुमच्या हाताच्या दंडावर किंवा मनगटावर व्यवस्थित बसते आहे का ते चेक करून घ्या. ते जर व्यवस्थित बसले नाही तर चुकीचे रिडींग दाखवेल.
वॉरंटी आणि किंमत – अश्या उपकरणं बद्दल आपल्याला जास्त माहिती नसते, त्यामुळे दुकानदार आपल्याला खोटी किंमत सांगून जास्त पैसे घेऊ शकता. त्यामुळे खरेदी करण्याआधी तीन चार ठिकाणी चौकशी करा. म्हणजे तुम्हाला त्याची योग्य किंमत कळेल. तसेच त्या प्रोडक्टला वॉरंटी आहे की नाही व ती किती आहे हे सुद्धा चेक करून पहा.

रिडींग सेव्ह करणारे BP मॉनिटर म्हणजे मेमरी स्टोरेज BP मॉनिटर्स –  आजकाल जवळ जवळ सगळ्याच डिजिटल ब्लड प्रेशर मॉनिटर्स मध्ये रिडींग सेव्ह करायचे फंक्शन दिलेले असते. तुमच्या घरात एक पेक्षा जास्त जणांना जर हायपर टेन्शनचा त्रास असेल तर हे फंक्शन तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. अनेकांनी वापरले तरी प्रत्येकाचे रिडींग हे मॉनिटर सेव्ह करून ठेवते. तेव्हा तुम्ही जो BP मॉनिटर घेत आहात त्यात हे फंक्शन आहे की नाही ते चेक करून घ्या.

तसेच तुम्ही जो BP मॉनिटर घेत आहात तो क्लीनिकली अप्रुव्ह (Clinically approved) आहे की नाही ते ही तपासुन पहा. नाहीतर ते चुकीचं रिडींग दाखवेल.

BP (ब्लड प्रेशर) मशीन वापरण्याचे काय फायदे आहेत:
• ब्लड प्रेशर मॉनिटर मशीन वापरणे खूप सोपे आहे. त्यामुळे प्रत्येकाला त्याचे ब्लड प्रेशर मोजणे शक्य होते.
• तुम्हाला तुमचे ब्लड प्रेशर चे रिडींग हे मॉनिटर मध्ये स्टोअर करून ठेवता येतात.
• या मशीनमुळे तुमच्या ब्लड प्रेशर मधील चढ उतार वेळेत लक्षात येतात. व त्यानुसार तुम्ही तुमच्या डॉक्टर चे मार्गदर्शन घेऊ शकता.
• हे मशीन मार्केट मध्ये तसेच ऑनलाईन ही उपलब्ध होतात. तसेच याचा मेंटेनन्सचा खर्च ही नगण्य आहे.
• हे मशीन पोर्टेबल आणि कॉम्पॅक्ट साईझ चे असल्याने ते तुम्ही कुठेही नेऊ शकता.
डिजीटल मॉनिटर हे त्यांचा लहान आकार आणि हलक्या वजनामुळे पोर्टेबल असतात.

BP (ब्लड प्रेशर) मशीन वापरण्याचे तोटे काय आहेत?
• ब्लड प्रेशर मॉनिटर मशिन्स हे खूप महाग असतात. सामान्य माणसाला परवडण्या सारखे नसतात.
• ब्लड प्रेशर मॉनिटर हे खूप संवेदनशील व नाजूक उपकरण आहे. त्यात बिघाड किंवा तुटल्यास दुरुस्त करणे कठीण आहे.
• कुठलेच मशीन 100 टक्के बरोबर व अचूक नसतात. त्यामुळे प्रत्येक वेळी यावर अवलंबून न राहु नका, हे मशीन कधी कधी चुकीचे रिडींग ही दाखवू शकतो.
अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की ब्लड प्रेशर मशीन हे जास्तीत जास्त दोन किंवा तीन वर्षे टिकतात. त्यानंतर मात्र तुम्हाला त्याची ऍक्युरसी चेक करून घ्यावी लागेल. ते अचूक चालत असेल तर ठीक आहे, नाहीतर तुम्हाला तुमचे BP मशीन बदलावे लागेल.
डिजीटल बीपी मॉनिटरचे डिझाईन हे घरी सहज, अगदी पहिल्यांदा वापरणारे आणि घरी एकटे राहणारे, इतरांच्या मदतीशिवाय वापरता येईल अशापद्धतीने केलेले असते. त्यात ब्ल्यूटुथ कनेक्टीव्हीटी असल्यास एखादी व्यक्ति अत्याधिक अचूक माहितीसह चालू आणि अगोदरची रीडिंग तज्ज्ञांना पाठवू शकते. डिजीटल मॉनिटर हे त्यांचा लहान आकार आणि हलक्या वजनामुळे पोर्टेबल असतात.
त्यांचे काही बाह्य भाग असतात आणि ते सेन्सरच्या साह्याने सहज डेटा रेकॉर्ड करू शकतात, ज्यामुळे हा एक वापरकर्ता-स्नेही (यूजर फ्रेंडली) पर्याय ठरतो. अपघाताने त्याचे नुकसान होईल किंवा बाह्य भाग प्रवास करताना गहाळ झाल्यास चिंता करण्याचे कारण नाही.
आपण उच्च रक्तदाबाकरिता औषधे घेतो किंवा मधुमेह अथवा हृदयरोग अशा अन्य रक्तदाबावर परिणाम करणारी स्थिती असल्यास डिजीटल मॉनिटर आपल्याला बदलणारी रीडिंग ट्रॅक ठेवण्यास साह्य करतो. जेणेकरून त्यांचे अचूक समायोजन करणे शक्य होते.
त्यामुळे डिजीटल बीपी मॉनिटरच्या वापराबद्दल अनेक चिंता आणि गैरसमज असतात हे आपले म्हणणे तितकेसे खरे नाही. आपण रक्तदाब मोजण्याकरिता डॉक्टरांच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन जितके करू, तितके अचूक रीडिंग घेणे आपल्याला शक्य होईल.

अचूकतेबद्दल काळजी:
हाताने तपासता येतो असा मॅन्युअल मॉनिटरच्या तुलनेत डिजीटल मॉनिटर कमी अचूक असतो ही सर्वसाधारण चिंता असते. डिजीटल बीपी मॉनिटर मोजमापावर गोंगाटासारख्या बाह्य घटक व मोजमापाच्या व्यक्तिनिष्ठ मूल्यमापनावर काही परिणाम होत नाही. आपण उपकरणाच्या माहितीपुस्तिकेनुसार सूचनांचे पालन केल्यास हे मॉनिटर अचूक रीडिंग देतात.
आपले BP युनिट घेतल्यावर ते डॉक्टरांच्याकडे नेऊन त्याचे कॅलिब्रेशन करणे जरुरी आहे . त्यांच्या स्फिग्मोमॅनोमिटर वरचे रिडींग व तुमच्या BP चे युनिट मद्धे किती फरक आहे ते कळेल. त्याची नोंद घ्या. स्फिग्मोमॅनोमिटर वरचे रिडींग सर्वात अचूक समजले जाते. त्याप्रमाणे तुमच्या BP युनिट वरचे रीडिंग ऍडजेस्ट करावे लागेल.

डिजिटल बीपी मशीन कसे काम करते?
ऑसीलेटरी उपकरणे डिजिटल रीडआउट तयार करतात आणि सिस्टोलिक आणि डायस्टोलिक दाबांमधील धमन्यांमधून रक्त वाहते या तत्त्वावर कार्य करते ज्यामुळे धमनीच्या भिंतीमध्ये कंपने निर्माण होतात जी शोधली जाऊ शकतात आणि इलेक्ट्रिकल सिग्नलमध्ये बदलली जाऊ शकतात .
ब्लड प्रेशर मशीनवर रक्तदाब कसा तपासायचा?
आपला हात पसरवा, तळहात वरच्या दिशेने करा. कफ तुमच्या उघड्या वरच्या हातावर तुमच्या कोपराच्या वाकण्यापासून एक इंच वर ठेवा. लक्षात ठेवा की कफ हा तुमच्या त्वचेला लागून असला पाहिजे (Skin touch). कपड्यावरून किंवा बाही वरून कफ गुंडाळू नका. ट्यूबिंग तुमच्या हाताच्या मनगटाच्या दिशेला पडल्याची खात्री करा जेणेकरून सेन्सर योग्यरित्या ठेवला जाईल. कफचा शेवट खेचा जेणेकरून तो तुमच्या हाताभोवती समान रीतीने घट्ट असेल. कफ ज्यास्त घट्ट असू नये. त्वचा आणि कफ यात दोन बोटे जातील एवढी जागा पाहिजे.

रक्तदाब मोजण्याची पद्धत:
तुम्ही दिवसाची तयारी करू शकता, परंतु तुमचा दिवसाचा पहिला रक्तदाब मोजण्या पूर्वी नाश्ता करू नका किंवा औषधे घेऊ नका . अगदी सकाळी रक्तदाब नये. सकाळी दहा वाजता व संध्याकाळी सहा वाजता रक्तदाब मोजा. पहिले रक्तदाब रिडींग मोजू नका कारण ते नेहमीच ज्यास्त असते. नंतर १-२ मिनिटाच्या अंतराने तीन रिडींग घ्या व त्याची सरासरी काढा. हा तुमचा जास्तीत ज्यास्त बरोबर, अचूक रक्त दाब असेल. रक्तदाब दिवसातून दोनदा सकाळी व संध्याकाळी ठराविक वेळीच घ्या व त्याची नोंद ठेवा. रिडींग घेण्यापूर्वी 30 मिनिटे अन्न, कॅफीन, तंबाखू आणि अल्कोहोल टाळा. तसेच, प्रथम तुमचे मूत्राशय रिकामे करा. लक्षात ठेवा डिजिटल युनिटने घेतलेला रक्तदाब हा डॉक्टरांनी घेतलेल्या रक्त दाबास पर्याय होऊ शकत नाही. दरमहा डॉक्टरांच्या कडे जाऊन आपल्या नोंदी पडताळून घ्या.

रक्तदाबासाठी कोणता हात अधिक अचूक आहे?
निष्कर्ष. एकल-आर्म मोजमाप, दुहेरी-आर्म मोजमापांच्या तुलनेत, उच्च रक्तदाबाचा प्रसार कमी लेखू शकतो. तथापि, दुहेरी हाताचे माप अनुपलब्ध असल्यास, विशेषत: स्त्रियांमध्ये, बीपी मोजण्यासाठी उजव्या हाताला प्राधान्य दिले जाते.

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी.
२९/०८/२०२३

 

डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
About डॉ. दिलीप केशव कुलकर्णी 73 Articles
वनस्पती शास्त्रात शिवाजी विद्यापीठातून १९८० साली पीएच. डी. आंतर राष्ट्रीय कीर्तीच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा,(NCL) पुणे येथे १९८१ साली रुजू. सुमारे ३२ वर्षे झाडांचे उती संवर्धन या विषयामध्ये सखोल संशोधन. यामध्ये १२ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जर्नल मध्ये पेपर प्रसिद्ध अति वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून २०१३ साली निवृत्त. सोशल मीडिया मध्ये वावर. जवळ जवळ पन्नास पॉप्युलर लेख लेख प्रसिद्ध. तसेच इतर विषयावरील वीस लेख प्रसिद्ध. वेंकटेश सुप्रभातम चे दोन खंडात मराठी भाषांतराची पुस्तके प्रकाशित. mob. 9881204904

1 Comment on डिजिटल ब्लड प्रेशर मशीन कसे वापरावे?

  1. रक्तदाब मोजण्या साठी बाजारात मिळणारे मशीन कसें घ्यावे व वापरावे. ह्या वर अतिशय उपयुक्त लेख आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..