नवीन लेखन...

पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज

आज प्रत्येक क्षेत्रात ” पर्यावरण ” हा परवलीचा शब्द झाला आहे.
पर्यावरण संवर्धन करणे हे महत्त्वाचे आहे. ” पर्यावरण संवर्धन ” होण्यापेक्षा हल्ली पर्यावरणाचा ऱ्हासच जास्त होताना दिसतो .
मग “पर्यावरणाचा ऱ्हास ” म्हणजे काय ?
“पर्यावरणाचा र्‍हास म्हणजे मानवनिर्मित आणि नैसर्गिक घटकामुळे पर्यावरणाच्या गुणवत्ते झालेली घट होय “. या र्‍हासामुळे पाणी मातीची गुणवत्ता कमी होते. नैसर्गिक अधिवास ,जंगले ,जलस्रोत नष्ट होऊन प्रदूषित होतात.
पर्यावरण र्‍हास हा एक व्यापक शब्द आहे. यावर जंगलतोड,वाळवंटीकरण ग्लोबल वॉर्मिंग , प्राणी नष्ट होणे आम्ल पावसाची निर्मिती, प्रदूषण आणि हवामानातील तीव्र बदल यांसारख्या विविध घटकांचा प्रभाव पडतो .
भूकंप, जंगलातील आग , ज्वालामुखीचा उद्रेक, चक्रीवादळ, भूस्खलन ,सुनामी ही पर्यावरण र्‍हासाची काही नैसर्गिक कारणे आहेत.

१ सधन कृषी पद्धती –
कृषी उत्पादनाच्या मागणीत प्रचंड वाढ झाल्यामुळे मागणी पूर्ण करण्यासाठी या पद्धतीचा अवलंब केला जातो.
मोठ्या प्रमाणावर जंगलतोड होत असून त्याचे रूपांतर शेत जमिनीत होत आहे परिणामी वन्य जीव जंगलांचा ऱ्हास होतो वाढत्या मागणीच्या पूर्ततेसाठी शेतीच्या आधुनिक तंत्र वापरले जात असल्याने रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. भरपूर विषारी द्रव्ये जमिनीत जमा होतात, पर्यावरण र्‍हासाचे एक मुख्य कारण आहे.

२ लँड फिल्स –
विविध प्रकारची विषारी रसायने लँडफिल्समधून बाहेर काढली जातात . ही संपूर्ण पर्यावरणासाठी घातक ठरू शकतात या प्रक्रियेत जमीन, हवा, पाणी प्रदूषित होणे त्याचबरोबर नैसर्गिक जीवन चक्र आणि अन्न चक्र प्रभावित होते.

३ जास्त लोकसंख्या –
जेवढी अधिक लोकसंख्या तेवढा अधिक जमिनीचा वापर, संसाधनांचा वापर , घरे व उद्योग उभारणीसाठी अधिक जमीन आवश्यक असल्याने मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत आहे. जमीन ,वायू जलप्रदूषण ही अति लोकसंख्येला पूरक आहे.

४ जंगलतोड –
झाडे तोडल्याने पर्यावरण आणि नैसर्गिक अधिवासावर मोठा परिणाम होतो .हवामानातील बदल, ग्लोबल वॉर्मिंग मातीची धूप,ओझोनच्या थराचा र्‍हास, प्रजाती नष्ट होणे , जैवविविधतेत होणारे नुकसान यांसारखे तीव्र पर्यावरणीय बदल या सर्वांचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होऊन त्याचा ऱ्हास होतो.

५ पर्यावरण प्रदूषण –
प्रदूषणामुळे नैसर्गिक वातावरणाचा नाश होतो. ७०% अधिक प्रदूषण हे मानवनिर्मित आणि अपरिवर्तनीय आहे. लँड फील्ड्स, वाहने, उद्योग इत्यादी. मधून उत्सर्जित होणारे विष वातावरणात शोषले जाते. आणि पीएच पातळी विस्कळीत होते. त्यामुळे ॲसिडचा पाऊस पडतो जैवविविधतेला हानी पोहोचते, यामुळे मातीची नैसर्गिक सुपीकता आणि वनस्पतीच्या विविध प्रजाती नष्ट होतात.
ही झाली पर्यावरण र्‍हासाची मानवनिर्मित कारणे . परंतु काही नैसर्गिक कारणे आहेत.
उदाहरणार्थ जंगलातील भूस्खलन, सुनामी ,भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक चक्रीवादळ असे नैसर्गिक घटक पर्यावरणाचा ऱ्हास करीत असतात .
जमिनीचे अयोग्य नियोजन नागरिकरण, औद्योगिक ठिकाणी शॉपिंग मॉल्स, कार्यालयातील जागा, पार्किंगची जागा रस्ते, रेल्वे , नेटवर्क , बांधकाम साईट , खाणप्रकल्प, थर्मल प्लांट आणि प्रकल्प हे सर्व पर्यावरणीय प्रदूषण वाढवण्यास मदत करणारे प्रमुख घटक आहेत.

पर्यावरणाच्या ऱ्हासाचे परिणाम

१ वातावरणातील बदल –
पर्यावरणाचा ऱ्हास अनेकदा वातावरणात बदल घडवून आणतो पाण्याचे चक्र आणि वनस्पती प्राण्यांचे नैसर्गिक अधिवास बदलतात. नैसर्गिक जैवविविधतेचा र्‍हास होत आहे. वातावरणातील बदलांना प्रोत्साहन देण्यासाठी हवा, पाणी, जमीन , प्रदूषणात भर पडते.
वाढत्या प्रदूषणामुळे हवामान बदलते त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग वाढते ते येणाऱ्या पिढ्यांसाठी हानिकारक ठरू शकते. पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे ओझोन थरांचा ऱ्हास होण्याचे प्रमाणही झपाट्याने वाढते.

२ मानवी आरोग्य –
पर्यावरण र्‍हासाचे मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. हवा, पाणी, जमीन यांच्या गुणवत्तेत लक्षणीय घट होत असल्याने मानवाचे सरासरी आयुर्मान कमी होते. प्रदूषणामुळे होणाऱ्या आजारामुळे लाखो लोकांचा मृत्यू होतो, हवेची गुणवत्ता कमी झाल्यामुळे फुफुसाचा कर्करोग, हृदयविकाराचा झटका यांसारखे आजार बळवतात. तर दुसरीकडे लँडफिल्समधून घातक कचरा अन्नसाखळीत प्रवेश करू शकतो .
उद्योगामुळे विषारी कचरा टाकल्यामुळे प्रदूषणात भर पडते व मानवाच्या आरोग्यावर घातक परिणाम होतो.

३ जैवविविधता नष्ट –
पर्यावरणाच्या र्‍हासामुळे नैसर्गिक अधिवास जंगले आणि परिसंस्था विस्कळीत होतात. बहुतेक प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत मोठ्या प्रमाणात जंगलतोड झाल्यामुळे मातीची धूप होते. हवा अशुद्ध होते परिणामी जैवविविधता नष्ट होते.

उपाययोजना

नुसताच पर्यावरणाचा र्‍हास होत आहे म्हणून फायदा नाही तर यावर काहीतरी ठोस उपाययोजना करायला हवी. पर्यावरणाचा ऱ्हास जागतिक समस्या आहे आणि ती विनाशकारी असू शकते आपण ज्या वातावरणात राहतो ते विस्कळीत होऊ शकते.

आगामी पिढ्यांसाठीही धोक्याचे ठरू शकते त्यामुळे पर्यावरण वाचवण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सरकारने एकत्रितपणे काम करायला हवे. समाजातील विविध स्तरांवर पर्यावरण पूरक कार्यक्रमाचे आयोजन करावे.
शालेय स्तरावर जागरूकता वाढवायला हवी . प्रदूषण रोखण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न करायला हवा. कंपन्या आणि उद्योग हे पर्यावरण पूरक असले पाहिजेत . या उद्योगांमधून बाहेर पडणाऱ्या कचऱ्याचे योग्य रिसायकलिंग व्हायला पाहिजे. लँड फ्रिल्ड्स मध्ये कचरा टाकण्यास बंदी घालावी .

प्रत्येक घराने कचऱ्याची वर्गवारी करायला हवी.
उदा_ ओलाकचरा, सुका कचरा इत्यादी पर्यावरण पूरक आणि जैवविघटनशील उत्पादनांना प्रोत्साहन द्यायला हवे. मातीचे प्रदूषण कमी करण्यासाठी रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर कमी केला पाहिजे.
हे सर्व केल्याने पर्यावरणाचा ऱ्हास कमी होऊ शकतो तसेच पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी काही सामान्य पर्यावरणीय कार्यक्रम करायला हवेत.

उदा –  जागतिक वातावरणीय घड्याळ, पृथ्वी संसाधन उपग्रह ,जागतिक हवामान संशोधन कार्यक्रम इत्यादी.
आज मानवाच्या गैरव्यवस्थेमुळे निसर्गनिर्मित गोष्टींचा ऱ्हास होणे हाच पर्यावरणाला सर्वात मोठा धोका आहे.
याचा सर्वांगीण विचार करून आपण वेळीच सावध होऊन पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी योग्य ती पावले उचलणे हे काळाची गरज आहे.

प्रिया नितीन उपासनी
माहीम मनपा माध्यमिक शाळा

Avatar
About प्रिया उपासनी 3 Articles
सौ प्रिया उपासनी या मुंबई महापालिकेच्या माहीम मनपा माध्यमिक शाळेत शिक्षिका आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी बर्‍याच उपयुक्त प्रकल्पात भाग घेतला आहे. 

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..