नवीन लेखन...

मन:शांती

ज्येष्ठत्वे आता फक्त तडजोड करावी आपुल्याच मनाची समजूत घालावी चूक की बरोबर, व्यर्थची वादविवाद अंतरी संघर्षाविना मन:शांती लाभावी आता जगती जन्मताच सारेच सर्वज्ञ इथे कलियुगाचे निर्बंधी दृष्टांत वाजवी भौतिक सुखाचा सभोवार मुक्त संचार आपण स्वतःलाच अंती मुरड घालावी या युगी संस्कारांची, नित्य पायमल्ली हीच जीवनाचीच, जगरहाटी वास्तवी उमजुनी सारे,जगाशी तडजोड करावी सोडुनीया हटवादा, मन:शांती भोगावी या […]

अजूनही जगावेसे वाटते

भाळीचे सुखदुःख,ओंजळीत ओसंडले तरीही, आज स्वच्छंदी जगावेसे वाटते थकली गात्रे, निमाल्याही आशाकांक्षा तरीही सुखानंदे, मस्त जगावेसे वाटते सरता दिनराती, अंतरी आंस उद्याची उगवता, पुन्हा नि:शंक जगावेसे वाटते ऋतुचक्रांचे, अविरत अस्तित्व चराचरी विनाआसक्त, कृतार्थी जगावेसे वाटते हे माझे ते माझे, सोडुनीया स्वार्थ सारे जगती, मुक्त, निर्मोही जगावेसे वाटते न कुणी कुणाचे, भास सर्वत्र मृगजळी हाच सत्यार्थ ! […]

नवरात्र

पूर्वी कसे नवरात्रीला नऊ दिवस आपण नऊ रंगाचे कपडे परिधान करायचो… तू नाचायचीस मनसोक्त आणि मी तुझं ते नाचणं डोळेभरून पाहत राहायचो… रंगाच फार काही नाही पण तू जवळ असल्यावर मी नेहमीच आनंदात भरभरून जगायचो… तुझा आनंद मी माझ्या हृदयात साठवून तो साऱ्या जगाला हसत आनंदाने वाटायचो… आता फक्त राहतो उभा तुझी वाट पाहत तसाच त्या […]

कधीतरी…

कधीतरी… बाळगले होते स्वप्न उराशी कधीतरी मी ही यशाचे… वाटलेही होते घ्यावे चुंबन कधीतरी त्या ही नभाचे… जपले होते हृदयात प्रेम कधीतरी मी ही मनीचे… रेखाटले होते चित्र सुंदर कधीतरी मी ही आयुष्याचे… घडवले होते एक शिल्प कधीतरी मी ही स्वतःचे… निर्मिले होते एक साम्राज्य कधीतरी मी ही शब्दांचे… विणले होते एक जाळे कधीतरी मी ही […]

आत्महत्या

हल्ली का कोणास जाणे सभोवताली पडत असतो पाऊस बातम्यांचा फक्त आत्महत्येच्या… त्या बातम्यांचा तर होत नाही ना परिणाम रिकाम्या मेंदूवर त्रासलेल्या माणसांच्या… समस्या, दुःख, विरह आणि वेदना कधी नव्हत्या त्या तर सोबतीच होत्या युगानुयुगे मानवाच्या… नात्यातील गुंता भ्रम असतो आणि प्रेम असते माया आयुष्यात काहीच नसते वजनाचे आपल्या जिवाच्या… © कवी – निलेश बामणे ( ND.) […]

किनारा

चल सखये,जरा विसावू नदी किनारी बघ आठवांचा खोल डोह या किनारी गुणगुणते तृप्त प्रीती इथे मनहृदयीची साक्षी! नयनरम्य दीपमाळ ही किनारी।।१।। वाळुत झऱ्याझऱ्यातुन उमले प्रिती ओसंडिते गं पावन गंगेच्या किनारी ओढ निरंतर, सारितेला मिलनाची चल सखये, जरा विसावू या किनारी।।२।। मिठीत घेवू, त्या साऱ्या गतस्मृतींना भावगंधल्या सुखदुःखांच्याच किनारी रूप,जीवनाचे प्रीतरंगलेले हृदयस्पर्शी चल न्याहळू त्या निरव शांत […]

1 2 3 4 350
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..