नवीन लेखन...

शुष्क व्यवहारी भावना

या जगी कलियुगी संसारात जगणे झाले केवळ व्यवहारी जाणिवा , भावनांच्या शुष्क ऋणानुबंधी नातीही व्यवहारी..।।१ आस्था , जिव्हाळा हरविला जो , तो स्वस्वार्थातची रमला मायबाप ,बंधुभगिनी , सोयरे प्रीतभावबंध केवळ व्यवहारी..।।२ मने गोठलेली , रक्तही गोठलेले सत्य ! धनदौलत ,भौतिकसुख क्षणिक सुखाचे सारे हे सोहळे जगणे जाहले सारेच व्यवहारी..।।३ केवळ पैसाच , मूल्य जीवनाचे विवेकी , […]

अटळ सत्य

लाभले , भोगले सारेच वैभव.. उगाच कशाला हव्यास आता.. येता जाता , बंद रिकाम्या मुठी.. दृष्टांत हा जगी जगता जगता..।।..१ जीवन , खेळ कठपुतळीचा.. नाचवितो सर्वां तो अनामिक.. दोर सारेच फक्त त्याच्या हाती.. स्मरावे , त्याला जगता जगता..।।..२ जन्मा सोबती सावलीच मृत्यू.. अंती , हेच अटळ सत्य सृष्टीचे.. जगी येणे मोकळे जाणे मोकळे.. आसक्ती , जीवा […]

नि:शब्द एकांत

आताशा , मला माझी खोलीच छान वाटते.. बंद दरवाजा ,टेबल,खुर्ची , नि:शब्द एकांत.. संगे मैत्र पुस्तकांचे ! नित्य वाचतो लिहितो.. आताशा , मला माझी खोलीच छान वाटते..।।…१ आता न धाक अन दरारा माझाच कुणाला.. नाही त्रास माझ्या बुरसटलेल्या विचारांचा.. सारेच आता ! मुक्त , बेबंध स्वानंदात रमले.. आताशा , मला माझी खोलीच छान वाटते..।।…२ पुस्तके मुक्त […]

अस्मिता

मी जर अस्मिता वेशीवरी टांगली असती स्वर्गसुखदा ! मी सारीच भोगली असती.. अहोरात्र कष्टप्रदी क्षण सारेच मी वेचिले संगत संस्कारांची मजला सावरत होती.. जरी तडजोडही या जीवनी घुसमटलेली राखिली बहुतांची अंतरंगे मित्रांच्या संगती.. म्हणूनिया आज जगतो तृप्त मी हा असा गुंफुनिया भावनांना मुक्त काव्या सांगाती.. एकएक भावशब्द निरंतर दान दयाघनाचे वेचुनी अलगदी माळीतो प्रीत भक्तीसंगती.. सोहळे […]

ब्रह्मानंदी मंत्रमुग्धता

अधरंमधुरं घुमवित वेणू.. त्रैलोकी ब्रह्मरूप आगळे.. ब्रह्मानंदी..! मंत्रमुग्धता.. गगन ईश्वरी , निळेसावळे..।।..१ अस्ताचली रवी केशरी.. नभांगण ! ते सप्तरंगले.. सोज्वळ ती तिन्हीसांजा.. दिव्यत्वाचे , दिव्य सोहळे..।।..२ लोचनी , श्रीरंग सावळा.. सावळबाधा ती ब्रह्मांडी.. सखा , कृपावंत आगळा.. कन्हयाचे , रंगरूप सावळे..।।..३ कृष्ण,कृष्ण तो मनप्रांगणी.. गंध भृकुटी , बुक्का भाळी.. सुवर्णकांती भर्जरी पितांबर.. मयूरपिसी ते स्पर्श आगळे..।।..४ […]

सृजनाचा बीजांकुर

दरवळता , भक्तीभाव अंतरी.. देवत्वाचा साक्षात्कार व्हावा.. बीजांकुर , सृजनाचा रुजता.. जीवनाचा गर्भितार्थ कळावा..।।१।। शब्दांशब्दांमधुनी रंग हसावा.. श्वासाश्वासातूनी , तो गंधावा.. सुखदुःखाच्या आसवातुनही.. मंजुळ वेणूचा आनंद लुटावा..।।२।। रानफुलातुनही भ्रमर गुंतता.. मंद प्रीतीचीच झुळूक यावी.. पर्णापर्णातुनी फुटता पालवी.. मम हृदयी आत्माराम हसावा..।।३।। शब्द अबोली अन गहीवरता.. गंधचंदनी मना स्पर्शूनी जावा.. तृषार्थ व्हावे या अशा जीवनी.. आत्मरंगी आत्माराम […]

कलियुगी संस्कृती

पांघरुनी , बेगडी मुखवटे.. सुन्न जगावे ! सुंदर जगती.. क्षणक्षण सारे आव्हानांचे.. जीवाचे , जगणेच कसरती..।।१।। कोण भला अन कोण बुरा ?.. जगती , सारीच सुंदोपसुंदी.. विश्वासाचा नाहीच भरवसां.. स्वार्थापोठी ! साऱ्या संगती..।।२।। नीती , निष्ठा , प्रीती , भक्ती.. टांगलेल्या , आता वेशीवरती.. आज निर्लज्यांची सदैव सद्दी.. स्वाहा:कार ! विध्वंसी नीती..।।३।। कलियुगाचीच , सारी किमया.. […]

1 2 3 4 5 344
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..