नवीन लेखन...

वीस-विशी (२०-२०)

सुरु होते सुरळीत । साऱ्या सृष्टीचे व्यवहार । आला अदृश्य विषाणू । माजविला हाहाःकार ।। १ ।। किती उपाय योजिले । दूर ठेवण्यासि त्यास । रोज डांबून ठेविले । घरी सकळ जनांस ।। २ ।। हात सतत धुतले । पाणी प्यायले कोमट । तरी सरता सरेना । विचारांचे जळमट ।। ३ ।। नको कसलाच धोका । […]

निवांत

आताशा वाटतं बसावं इथंच निवांत क्षणांचे शिंपले वेचत आणि पहावं दूर मागे त्या वाटांकडे जिथून आले होते ते सुखदुःखांचे वारे.. आयुष्याचं गणित मांडून सोडून द्यावेत जुने हिशोब आणि बसावं इथंच निवांत स्वप्नांचा कशिदा विणत… — आनंद पाटणकर

स्वप्न तारा

सांगावीत कशी मी स्वप्ने मज शब्द सुचेना काही मौनातल्या अंधुक रेषा हलकेच पुसते जाई सांजवेळ की पहाट ही रात्रीस उन्हाचे कोडे दवबिंदूंची चांदण स्वप्ने अलगद टिपती झाडे नवीन जरी झाल्या वाटा जुनाच तरी वाहील वारा वळणावरती भेटेल तुला आठवणींचा अंधुक तारा… — आनंद पाटणकर

सागर आणि नदी

सागराला गळामिठी मारताना नदीचा पाय क्षणभर मागे सरतो I पर्वतशिखरापासून सुरु झालेला, वाटेतल्या जंगलांना, खेड्यांना वेढे घालत इथवर झालेला प्रवास ती वळून बघते म्हणे – आणि समोर दिसत असतो अथांग रत्नाकर, त्यांत सामावणे म्हणजे स्वतःचे वेगळे अस्तित्व संपणे I पण परतीचा मार्ग खुंटलेला कोणीच परतू शकत नाही I परतणे म्हणजे एकप्रकारे केलेला प्रवास नाकारणे I सागरात […]

ऊन पावसाचा खेळ…

पावसाची गोड गाणी तुझ्या सांगू का कानात… चिंब चिंब भिजण्याला चल जाऊया रानात… थेंब थेंब पावसाचा तुझ्या गालाव पडेल… खाली येत ओघळून दोन ओठांशी भिडेल… गार वा-याची झुळूक तुला सोसणार नाही… तवा मिठीत येण्याची उगा करशील घाई… माझ्या पाठीशी येईल दोन्ही हाताचे कुलूप… तुझ्या मोकळ्या केसांना सखे येईल हुरूप… गाणं गात पावसाचं जवा जमल गं मेळ… […]

कुठे काय

कुठे काय अन कुठे काय पैशाला येथे फुटले पाय दीड-दोन दमडी साठी          ईमान येथे विकला जाय                             कुठे काय अन कुठे काय सत्य झाले मिथ्य, मिथ्यस मानले तथ्य         मक्कारी दुनिया करे खोट्याचे नेपथ्य चौका चौकां […]

1 2 3 4 5 6 347
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..