नवीन लेखन...

ऋण जन्मदात्यांचे

हा गर्भ एक पावन उदरातला तो कोण ? कुणा कळला नाही जन्मदात्यांचेच ऋण आजन्मी तेच ब्रह्मरुप ईश्वरी , दुजे नाही….। त्यांना पुजावे, त्यांनाच भजावे श्रद्ध्येय भक्तीप्रीती दुजी नाही पान्हा मातृत्वी वात्सल्यपुर्तीचा पितृत्वासम, दुजा आधार नाही….। जन्मदाते! सर्वश्रेष्ठ या जगती तिथेच नमावे अन्य कोठे नाही पापपुण्यकर्म हिशेब चित्रगुप्ती तिथे तर कुणाची सुटका नाही….। तो जो कोण अनामिक […]

शेवटची ओळं

देह चिखलाचा गोळा, माय बाप रे कुंभार त्यासी देती ते आकार, तसा तसा घडे जाय..!!! लहानपणी माय बाप, बहीन भाऊ गोतावळा, मोठा व्हता बायको भार्या, जिनं व्यापुनं टाकीते…!!! लेकर बाळ आन संसारं, दमछाकीचा तो खेळं, किती धावशीलं पळशीलं, भावना बाजाराचा मेळं…!!! देवा बाजार मांडला, सगळे बाव्हले बाव्हले, मोह टाकुनिया त्यातं, जिवं कामालं लावले…!!! देवा देले दोनं […]

माहेरचा पाऊसं

मह्या शेतातलं पिकं, कस डौलतया तोर्‍यातं, शेतं हिरव हिरवं, मन हारके सुखानं. नभ ढगाळ ढगाळ, झोंबी झोंबाडं गारवा, मना सुखवी शिळानं, पिक नाचे शहारून. ढगं बरसती थेंब थेंब, मोती पखरले शेतातं, त्याचा लेऊन शिंगार, पिकं डौलते डौलात. हिरवले रानं वनं, गेली सृष्टि गोंजारूनं, पशु पक्षी चहकती, कोकिळं करीते गुंजनं. पशु,पक्षी,झाडं,वेली, अवघी धरा उल्हासली, आला महेरचा पाऊस, […]

प्रसन्नता

प्रांगणी येता प्रभातकिरणे चैतन्याच्या कळ्या उमलती. वेलीवरी झुळझुळता पर्णे प्रसन्नतेची अंतरी अनुभूती. मध्यान्हीला, श्रमलेलेही साऊली, प्राजक्ती शोधती कालचक्र ते फिरविणारा भानू येता क्षितिजावरती. सारे, नजारे गुलमुसलेले सांजेला मंदिरी दीप तेवती. वात्सल्याचे ते स्पर्श लाघवी गुरे गोधुली प्रीत उधळत येती रचना क्र. ६७ ८/७/२०२३ – वि.ग.सातपुते. (भावकवी) 9766544908

हृद्य

मीच अजूनही जगतो तुझ्याच हृद्य आठवात तुझेच ते रूप लाघवी पाझरते या लोचनात…. सांग कसे व्यक्त करू भावनांना शब्दाशब्दात तुही निष्पाप निरागसी अव्यक्तता.! पापण्यात…. तीच अधीरता अंतरात जाणवते तुझ्या विरहात मीही अजूनही जगतो तुझ्या हृदयस्थ आठवात…. रचना क्र. ६० २७/६/२०२३ -वि.ग.सातपुते.(भावकवी) 9766544908

छंद

प्रसवते रोज कविता कां कशी कोण जाणे… मीही, होतो संभ्रमित कसे जमते व्यक्त होणे… मन हे चंचल पाखरू त्याचेच कां फडफडणे… अंतरी काहूर कल्लोळ भावनांचेच ते प्रसवणे… मीच शब्दातुनी मांडतो अव्यक्ताला सहजपणे… आज हा छंद जीवाला रिझवितो, हळुवारपणे… आनंद हा एक आगळा सहजसुकर होते जगणे… रचना क्र. ५९ २७/६/२०२३ -वि.ग.सातपुते. (भावकवी) 9766544908

हिशेब

आता कसला तो हिशेब सारा शुन्यत्वाच्याच पलीकडले सारे अथांग सागर नजरेत किनारा सुखदुःखांचाच ताळमेळ सारा… मायाममता अन प्रेम जिव्हाळा ऋणानुबंधांचाच केवळ पसारा कुणासाठी इथे न वेळ कुणाला स्वार्थाचाच निरर्थक विंझणवारा… नातीही सारी केवळ नावापुरती प्रेमभावची निर्जीवी अंकुरणारा फुलणे, गंधणे आज कोमजलेले अत्तरकुपीतही, सुगंध उग्र न्यारा… जगणे कलियुगातील असेच सारे मानवतेचाच सर्वत्र दुष्काळ सारा निव्वळ पैशासाठी सर्वत्र […]

कल्लोळ

जगी भेटली माणसे अनभिज्ञ ती सारी… जोडली नाती निराशाच पदरी… नव्हता जिव्हाळा भावशून्य सारी… नाही कुणी कुणाचे छळे सत्य जिव्हारी… जखमांचे झिरपणे नि:शब्द वाहते अंतरी… असले कसले जगणे प्रीत उदास हृदयांतरी… हा कल्लोळ असह्य भावनांचे रुदन भीतरी… रचना क्र ७० १०/७/२०२३ – वि.ग.सातपुते.(भावकवी) 9766544908

तणकटं

लय फोफावलय तणकटं…. धुरे सोडून मध्ये रानातं घुसलयं….. रान कमी पडलं मनुन काय की, आत्ता डाळणाच्या उरावरंबी फोफावलयं… आत्ता तं पिकबी तणकटाच्या सावलीपुढं, निमुट मानं टाकुण मुक उभ दिसायलयं… काल घरातुन निंघताना भिंतीवर एक पिंपळाचं झाड पाह्यलं… मनात विचार आला, मायझं,भुतायलं जागा कमी पडायलीय, मनुनं ईथबी एक उगवलय काय की? लय फोफावलयं…. गल्लीतंबी अन दिल्लीतंबी, घरातंबी […]

पाऊस

पाऊस! हा तुझा नी माझा तनमनांतराला भिजविणारा… ओल्या ओल्या चिंब भावनां पाऊस! मिठीस बिलगणारा… जीवा जीवालाही हवाहवासा व्याकुळ अधीरतेने बरसणारा… मनमुक्त प्रीतीत भुलूनी जाता अधरांनी, प्राशावी अमृतधारा… श्रावण, श्रावण बेधुंद कलंदर श्वासा, श्वासातुनी गंधाळणारा… प्रीतासक्ती, तो अवीट पाऊस चिंबचिंब सर्वार्थी भिजविणारा… ओला पाऊस मृदगंधली माती सुगंध सभोवार तो दरवळणारा… वर्षा ऋतुची किमयाच आगळी नाहू घालते सरितुनी […]

1 4 5 6 7 8 434
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..