नवीन लेखन...

तो परत आलाय्

तो परत आलाय
केरळातून.
मान्सून सारखा!
मान्सून मित्र म्हणून येतो,
हा परत आलाय-
आपले यापूर्वीचे सर्व आयुध पचवून,
शत्रू म्हणून!

..
आम्ही असतो सरकारी दवाखान्यात
रांगेत उभे.
तिथला वैद्यकीय अधिकारी
देतो आम्हाला ‘ऑगमेंटीन’लिहून.
अमॉक्सिसिलीन हे प्रतिजैवक जेव्हा थकतं
तेव्हा देण्याचे हे
एक उच्चतम प्रतिजैवक -ॲण्टीबायोटिक्स.
( ऑगमेंटीन खरंतर एक मुद्रा नाम.
मूळ औषध अमाॅक्सिसिलिन + पोटॅशियम क्लॅहूलानेट)
आपल्या सरकारी दवाखान्यात,
हे उच्चतम प्रतिजैवक सर्रास दिले जाते.
कधी अमाॅक्सिसिलीन संपलं म्हणून,
तर कधी औषधनिर्माण अधिकारी( फार्मसी ऑफिसर)
ऑगमेंटिनची मुदत (एक्सपायरी) जवळ आल्याचं लक्षात आणून देतो म्हणून.
( कारण हे मुदतबाह्य ठरलं तर,
वैद्यकीय अधिकारी आणि औषध निर्माण अधिकारी दोघांच्याही गळ्याला फास)
तर कधीच वरच्या साटेलोट्यामुळे,
सरकारी औषध भंडारं ऑगमेंटिननी भरली जातात म्हणून.
एकूणात,
हे वरच्या श्रेणीचे प्रतिजैवक गरज नसताना माथी पडत.
पण आम्ही,
असतो बाहेर पडत,
‘भारीचं’ औषध मिळालं या खुशीने.
…..
……
सरकारी दवाखान्यात ही तर्हा तर
खाजगीत?
खाजगीत असतो पर्याय
प्रतिजैवक वापरण्याचा किंवा न वापरण्याचा.
पण आम्ही,
धरतो हट्ट लवकरात लवकर बरे होण्याचा!
डॉक्टरला दिलेली फीस वाजवून वसूल करण्याचा!
अशा रीतीने,
आम्ही,
माथी मारून घेतो उच्चतम प्रतिजैवकं.
आता,
…तो परत आलाय् !
आपण विनाकारण आणि हट्टान घेतलेल्या
प्रतिजैवकांना पचवून,
‘मल्टी ड्रग रेजिस्टंट’
हे बिरूद लावून!
…..
….
आम्ही,
सरसावत आहोत,
जुने संदी-कपारीतले मास्क शोधून,
ऐकून वाचून पाठ झालेल्या प्रतिजैवकांच्या
तलवारी परजून!
आणि हो,
कमरेला आजीबाईचा बटवा आहेच!

..
आम्ही,
आम्ही तयार आहोत
जातील-
तेवढे बळी द्यायला
आणि
वाचतील-
तेवढे वाचवायला!
नशिबाच्या हवाल्याने.

..
तो परत आलाय् !
जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचे ढोंग फोडायला!
स्वयं निर्णयाला आपली लायकीच नसल्याचं सिद्ध करायला!
तो परत आलाय्!
सामूहिक निर्णय नेटानं अमलात आणण्यातला आपला अप्रमाणिकपणा सिद्ध करायला!
आमच्याच मूर्खपणाच्या फलिताचा आरसा समोर धरून,
तो परत आलाय!
….

आणि आम्ही?
आमच्यातच मशगूल,
त्याच्या बदलत्या रूपाचं बारसं करण्यात,
आणि
पुढच्या पिढीला ‘प्रतिपिंडांचं नपुसकत्व’ बहाल करण्यात!
….

आम्ही- भारताचे लोक!!
वुई- द पीपल ऑफ इंडिया !!!
( सदर ललितातील ‘विचार’ नवीन नसला तरी, तातडीचा आणि प्रसारणावश्यक आहे. बहुभाषिक वाचकांनी भाषांतरित करून प्रसारित करण्यास हरकत नाही.)

— मनोज महाजन.

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 346 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..