समर्पण
फुलांसारखे फुलत जगावे ब्रह्मांडाला गंधाळीत रहावे सृजनाचा अविष्कार आगळा विश्वात्म्याला सदैव स्मरावे… विलोभनिय ही अदा सृष्टीची त्या सौंदर्यात भुलुनी जावे साक्षात्कार सारा चैतन्याचा सुखामृताला प्राशित रहावे… निसर्गाचेच तत्व निरागस ते हॄदयांतरी जपत रहावे जीवा जगवितो तो कृपाळू निरंतर त्याला भजत रहावे… फुलांसारखे फुलता फुलता निर्माल्यातही सुख मानावे समर्पणात सौख्य आल्हादी याचे भान नित्यची असावे… ******** — […]