नवीन लेखन...
Avatar
About विलास सातपुते
मुद्रक, प्रकाशक, पत्रकार, संपादक, साहित्यिक (कवी,लेखक), संतचित्रकार, व्याख्याता व संस्थापक अध्यक्ष, महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे 41. व्यवसायात आजपर्यंत 1077 पुस्तकांचे मुद्रण केले आहे. स्वतःची 16 पुस्तके प्रकाशित आहेत.

सत्य दृष्टांत

सत्य, दृष्टांत हरिहराचा शब्द निःशब्द भावनांचे लोचनीच फक्त साठवावे रूप, अतर्क्य नियंत्याचे….. गवाक्षी कवडसे नारायणी तिमिरीही भाव प्रसन्नतेचे उघड़ता कवाड़े अंत:चक्षु ओंजळी शब्द सरस्वतीचे द्वैत अद्वैताचे मिलन सुंदर तृप्ततादात्म्य मुग्ध पावरीचे स्पंदनी झरावी पुण्यपुण्यदा भाग्य, मंत्रमुग्धी कृतार्थतेचे…. मीत्व व्यर्थची सोडूनी द्यावे अर्थ ! उमजावे सात्विकतेचे निर्मोही मैत्रतत्व उरी रुजावे स्मरावे नित्य नाम भगवंताचे…. –वि.ग.सातपुते.( भावकवी ) […]

मन श्रावण

सखये सृष्टिलाही स्वप्न तुझे ऋतुं ऋतुंतूनी तूं झुळ झुळते…. ऋतुं रंगली, तुं स्वरूप सुंदरी चैतन्याला मनमुक्त उधळीते…. कुसुम सुमनी, तुझेच दरवळ कांचन किरणातुनी तू स्पर्शते…. तव अधरीचे, हास्य श्रावणी मन मनांतर, मोहरुनी जाते…. तूच अंतरी सप्तरंगले इंद्रधनु आत्म सुखाची प्रचिती असते… तूच श्रावणातील श्रावणधारा अव्यक्तालाही चिंब भिजविते…. क्षण हेच खरे अवीट ब्रह्मानंदी निर्झरी, संथ गुणगुण तोषविते…. […]

कृतकृत्य

निसर्ग भगवंताचे रूप स्पर्श दिव्य अनामिक लाभता या स्पंदनांना आत्मिक शांती सात्विक…. अविष्कार पंचभुतांचे सदा सर्वदा सौख्यदायक नक्षत्रे अलंकार सृष्टिचे लोचनी उमले नंदनवन…. क्षण सारेच भारावलेले स्वानुभूतिच आनंदघन दृष्टांत, नैसर्गी लडिवाळ मनमनांतर पावन पावन…. सृजनता ही अलौकिक झुळझुळते तृप्त जीवन निर्मोही, भाव परस्पर निरंतर कृतकृत्य जीवन…. –वि.ग.सातपुते (भावकवी) 9766544908 रचना क्र.१९२ ८/८/२०२२

चेहरा

चेहरा, बिलोरी आरसा अंतरीच्याच भावनांचा प्रतिबिंब मनसंवेदनांचे सत्य साक्षात्कार मनाचा ऋणानुबंध सारे वोखटे अंतरात स्वार्थ स्वत:चा हीच आजची जगरहाटी इथे नाही कुणी कुणाचा चेहरा हसरा इथे बेगडी सत्य एक आरसा मनाचा –वि.ग.सातपुते.(भावकवी ) 9766544908 रचना क्र.१९३ ८/८/२०२२

मन आभाळ

अंतरी रूप पाझरते स्मरण नेत्री ओघळते… सांग ! कसे विसरावे मनआभाळ ते दाटते… श्रावण, प्रीतबरसला लाघव ते रिमझिमते… मृदगंधलेली, सुगंधा गगना भारूनी जाते… व्योमात कृष्णसावळा ब्रह्मात, पावरी घुमते… लडिवाळ नाद मधुरम मनी भक्तीप्रीत प्रसवते… हेच भाग्य साक्षात्कारी जन्मोजन्मी, सुखावते… ती राधा अन ती मीरा आत्माच समर्पूनी जाते… –वि.ग.सातपुते.( भावकवी ) 9766544908 रचना क्र.१९१ ८/८/२०२२

सार्थक

जगती जन्म हा हिशेब गतजन्मांचा प्रारब्धभोग पुर्वसंचिताचे….. कधी सुखदा, कधी दुःख वेदनां हेच खेळ सारे मूक साहण्याचे…. पराधीनता जगती सकल जीवाजीवांची अनामिका हाती दोर कठपुतळीचे….. दैवी प्रीतभावनां भाग्य ते भाळीचे वात्सल्य अमृती कृपासिंधु मातेचे…. तोच कृपाळू एक सत्य ! शाश्वताचे त्याला नित्य स्मरावे हे सार्थक जीवनाचे…. –वि.ग.सातपुते.( भावकवी ) 9766544908 रचना क्र.१९० ६/८/२०२२

काजळ गाली

सख्या, तुझ्या आठवात मी, चालते संथ पाऊली सांजवर्खी या सांजवेळी ओघळले, काजळ गाली…. संगती तीच वाट निरंतरी तुझ्याच स्पर्शात नाहलेली नेत्री दाटता अस्तिव तुझे ओघळले, काजळ गाली…. ही नित्याची साक्ष अंतरी पाहता, उमललेली कळी अनवट मोहक वाटेवरचा तूच नटखट माझ्या भाळी…. तुज मी स्मरता वेळोवेळी ओघळले, काजळ गाली तुझा असा असह्य दुरावा ओघळते, काजळ गाली…. –वि.ग.सातपुते.(भावकवी) […]

सुंदर सत्य

जीवन हा श्वास आहे स्मरणगंधी ध्यास आहे… कळीकळीने उमलावे फुलांनी दरवळणे आहे… सभोवारी गंधाळावे सत्कर्मी आव्हान आहे… सुखदुःखांच्या सरोवरी मुक्त असे डुंबणे आहे… प्रवाहा विरुद्ध पोहणे पुरुषार्थाची कमाल आहे… विवेकाची साथ असावी अप्राप्यही, प्राप्त आहे… मनामनांत नित्य रहावे तीच खरी मन:शांती आहे… द्वैत, अद्वैत एकरूपता निर्मलतेचे प्रतिबिंब आहे… कानी मंजुळ धुन मुरलीची आत्मानंदी सुंदर सत्य आहे… […]

भावुक मनांतर

आले कोवळे किरण कांचनी चराचर सारे , सुखात नाहले… भावनांच्या कळ्या उमलल्या अधरी शब्दलाघव ते प्रसवले… रिमझिमणाऱ्या, श्रावणधारी कृष्णमेघ सावळे बरसबरसले हिरवळलेल्या या तृणांकुरातून चैतन्य जीवा तोषवित राहिले… लागताच चाहुल विश्वंभराची रूप ब्रह्मांडाचेही भारावुन गेले… झरझरता श्रावण आत्मरंगला स्वर शब्दमार्दवी दाटुनी आले… व्याकुळता, अंतरीची निरागस मन दिगंतरी सारे भावुक झाले… –वि.ग.सातपुते .(भावकवी) 9766544908 रचना क्र. १८७ […]

क्षण

क्षण तोच धुंद , बेभान अस्तित्वा हरवुनी गेला मी , तू सहज विसरूनी मिठितच गुंतवुनी गेला तो सोहळाच प्रीतस्पर्शी अंतरंगी विर्घळूनी गेला तादात्म्य ! भाव निर्मळी स्वत्वास ! समर्पूनी गेला तोच अवीट स्पर्शानंद श्वासास सजवुनी गेला खेळ साराच संचिताचा जन्म , हा कृतार्थ झाला –वि.ग.सातपुते ( भावकवी ) 9766544908 रचना क्र.१८६ ३/८/२०२२

1 2 3 4 5 33
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..