नवीन लेखन...
Avatar
About विलास सातपुते
मुद्रक, प्रकाशक, पत्रकार, संपादक, साहित्यिक (कवी,लेखक), संतचित्रकार, व्याख्याता व संस्थापक अध्यक्ष, महाकवी कालिदास प्रतिष्ठान, पुणे 41. व्यवसायात आजपर्यंत 1077 पुस्तकांचे मुद्रण केले आहे. स्वतःची 16 पुस्तके प्रकाशित आहेत.

कलियुगी संस्कृती

पांघरुनी , बेगडी मुखवटे.. सुन्न जगावे ! सुंदर जगती.. क्षणक्षण सारे आव्हानांचे.. जीवाचे , जगणेच कसरती..।।१।। कोण भला अन कोण बुरा ?.. जगती , सारीच सुंदोपसुंदी.. विश्वासाचा नाहीच भरवसां.. स्वार्थापोठी ! साऱ्या संगती..।।२।। नीती , निष्ठा , प्रीती , भक्ती.. टांगलेल्या , आता वेशीवरती.. आज निर्लज्यांची सदैव सद्दी.. स्वाहा:कार ! विध्वंसी नीती..।।३।। कलियुगाचीच , सारी किमया.. […]

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग १७)

आजपर्यंत मी ज्येष्ठवृंद साहित्यिक गुरुवर्य आनंद यादव , अशोक कामत , दवी.केसकर , दभी कुलकर्णी , प्राचार्य बलवंत देशमुख, गुरुवर्य शांताबाईं शेळके , यशवंतजी देव , नंदूजी होनफ अशा काही व्यक्तिन्चे अनुभव कथन केले ..जीवनात साहित्य क्षेत्रात ज्यांचे मोलाचे मार्गदर्शक योगदान लाभले अशा अनेक व्यक्तिबद्दल खरे तर खुप लिहायचे आहे.. […]

शब्दब्रह्म

असतेस , सामोरी तूं जेंव्हा मज काव्य ! प्रसवते तेंव्हा ।।धृ।। मम भाळी गं हे दान ईश्वरी सत्य , निर्मळी भावप्रीतीचे अंतरी उधळीत येते शब्दब्रह्मा ।।१।। गगन बरसता भाव कल्लोळांचे मनहृदयीचे , अंगण सारे ओले शब्द मत्तमयुरी गं नाचती तेंव्हा ।।२।। गूढ सारांश , सकल जीवनाचा निःशब्द जरी , मनी पाझरतो उलगडते चराचरीचे गुपित तेंव्हा ।।३।। […]

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग १६)

माझे गुरुवर्य प्राचार्य कै. बलवंत देशमुख , तसेच प्राचार्य द.ता. भोसले सरांनीही पाहिली होती . ती वही कालांतराने एसएनडीटी कॉलेज डोंबीवली च्या रिटायर्ड प्राध्यापिका कै . मालती देसाई यांनी पाहिली. हे मी यापूर्वीच्या भागामध्ये उदघृत केले आहेत . […]

भावनांचे इंद्रधनू

तू प्राजक्ती सुंदरा मधुगंधा मनमोहिनी.. तू सुवर्णकांती कोमलांगी कमलिनी..।। तू दवबिंदू सुपर्णी अंतरी ओघळणारी नाजूका चंदनगंधी मनांतरी गंधाळणारी..।। तू गुलमुशी बिंब कोवळे हृदयांतरा दीपविणारे तू भावनांचे इंद्रधनू आसमंता कवटाळणारे..।। तू मस्त पवन गंधधुंदला अलवार जातेस स्पर्शूनी प्रीत ! शीतल शिडकावा तृप्त सुखदानंद जीवनी..।। केतकीच्या बनात प्रीती स्वर्गानंदी मंतरलेली अनावर अधीर लोचने तव रूपात हरविलेली.।। मूक मुग्ध […]

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग १५)

माझा मुद्रण व प्रकाशनाचा व्यवसाय असल्यामुळे त्या निमित्त सर्व महाराष्ट्रभर सतत भ्रमंती असे. कामे संपल्यावर ज्या ज्या ठिकाणी जी जी माहिती असणारी प्रेक्षणीय ठिकाणे मंदिरे असत ती ती मी वेळ असेल त्याप्रमाणे प्रवासात जरूर पहात असे. प्रत्येक प्रवासात मी किमान एक पुस्तक किंवा एक छान गाण्याची कैसेट घेत असे कोडैक कंपनीचा छान कैमेरा होता फोटोही काढत असे. असे माझे छंद होते. […]

खंत मनी ! मी काय प्रार्थू ?

समजावू कसे या मनाला जे शोधिते अजूनही तुला.. आजही लोचनी रूप तूझे.. तुझाच ध्यास या जीवाला.. एकमेकांवरी नि:सिम प्रीती तुझी न माझी, जडली होती पाहता , पाहताच एकमेकां प्रीतीभाव आगळा रुजला.. नि:शब्दुली ! भाषा मनांची अंतरंगी सारीच प्रीतभारली कटाक्षी प्रीती, स्मित लाघवी जगवित होती तनमनांतराला.. जरी निर्व्याज ही सत्यप्रीती प्रारब्ध्ये दुरावाच हा भाळी तुजविण सारे निरर्थ […]

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग १४)

ही सगळीच माणसे सर्वार्थांनच धार्मिक ! साहित्यिक ! राजकीय ! सामाजिक ! न्यायिक ! शैक्षणिक ! उद्योजक ! बैंकिंग !
अशा क्षेत्रातील मोठ्ठी ! विद्वान ! उच्च पदस्थ असून किती निर्मोही होती !… किती सन्यस्त वृत्तिची होती !…. किती लाघवी आणी अत्यंत साधी रहाणीमान असणारी होती !… किती परोपकारी होती…याची आज प्रकर्षाने जाणीव होते ..अशा आदर्श व्यक्ती आज खुपच दुर्मिळ झाल्या आहेत. हे मात्र खरे . यांचा प्रदीर्घ सहवास मला लाभला..हे माझे पूर्वकर्म …एवढेच मी म्हणेन ! […]

सत्य असत्य संभ्रमात

जन्म हा सुखाचा की दुःखाचा.. कां ? कुठला अक्षम्य गुन्हा आहे.. जरी गतजन्मांचेच ऋणानुबंध सारे कुणाची कुणाला आज ओढ आहे.. बेगडी नात्यांचेच स्वार्थी भावबंध खरे कोण कुणासाठी जगतो आहे.. ऐश्वर्याचे रांजण ,जरी स्वर्गीयसुखी सांगा , आज मनःशांती कुठे आहे.. ऐश्वर्यासाठी नात्यांचीही पायमल्ली नि:स्पृह प्रेम जिव्हाळा संपला आहे.. बिलोरी प्रतिबिंबही कितीही देखणे तरी इथे सत्य, असत्य संभ्रमात […]

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग १३)

कुणी मला म्हणाले तुम्ही अष्टपैलु आहात ! कुणी म्हणाले तुम्ही अष्टावधानी आहात ! कुणी म्हणाले तुम्ही हरफ़न मौला आहात ! तर कुणी म्हणाले तुम्ही म्हणजे एक कलंदर व्यक्तिमत्व आहात ! ….पण अगदी खरं सांगायचं झालं तर आजही मी सर्वसामान्यच आहे … *इदं न मम*…आहे तितुके देवाचे ..! एवढेच मी म्हणेन ! हे सर्व सहवासाचे फलितदान आहे !…. […]

1 3 4 5 6 7 8
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..