नवीन लेखन...

गणित शिकलंच आहेस तू

गणित शिकलंच आहेस तू,
तर बेरीज वजाबाकी करू.
त्या क्षणांची फक्त बेरीज करू
अन या क्षणांची वजाबाकी करू.

चन्द्रासमोरच्या ढगांना जरासे
प्राजक्ती कळ्यांनी बाजूला करू
दिव्यावरच्या या काजळीला
गुलाबी पाकळ्यांनी बाजूला करू.

आंदोलने विसरून जाऊ सारी
अन क्रांतीचा मार्ग प्रशस्त करू
शहारल्या कमलदलांना या
दवांनीच आता निर्धास्त करू.

चल सखे, पुन्हा एकदा जगू या
चंद्र-चांदण्यांशी गप्पा करू.
अन या लखलखत्या चंद्राला
त्या कोजागरीची आठवण करू.

मी काय म्हणतो आपण ना,
भागाकारच सरळ वजा करू.
बेरजेची साथ घेऊ मोठी
अन गुणाकार आपलासा करू.

कच्चं असलेलं माझं बीजगणित
आपण दोघं मिळून पक्कं करू
गणित शिकलंच आहेस तू,
तर एवढं आपण नक्की करू.

©️ चन्द्रहास शास्त्री

Avatar
About चंद्रहास शास्त्री 3 Articles
मी डॉ. चंद्रहास शास्त्री. संस्कृत, मराठी आणि हिंदी भाषेत अनेकविध रचना करतो. कविता, लेख इत्यादी विषयांवरील अनेक पुस्तके प्रकाशित आहेत. सध्या मी राधा कृष्ण या विषयावर विशेषत्वाने लिहित आहे. तसेच भारतीय ज्ञान परंपरा या विषयावर देखील लिहित आहे. (Bhartiya Knowledge system, Marathi poems, stories etc.)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..