नवीन लेखन...

प्रसार माध्यमे आणि स्त्रीप्रतिमा

विभागप्रमुख वृत्तपत्रविद्या व संवाद शास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

भारतात १९७५ च्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या आंतरराष्ट्रीय महिला दशकाच्या निमित्ताने महिलांच्या सामाजिक दर्जाचा अभ्यास अहवालाद्वारे प्रकाशित झाला. या अहवालात महिला आणि माध्यमे या विषयालाही महत्त्व देण्यात आले. महिलांच्या प्रश्नांना, आशा-आकांक्षांना माध्यमांनी प्रतिबिंबित करणे ही अपेक्षा योग्यच आहे. महिलांचे प्रश्न, समस्या आणि सर्व स्तरावरील दर्जा या विषयीची चर्चा केली. शतकभर केवळ जगातच नव्हे तर भारतातही सुरू आहे. भारतीय पत्रकारितेची पहिली शंभर वर्षे ही सामाजिक समस्या आणि प्रश्न मांडण्याची ध्येयवादी पत्रकारिता होती. वृत्तपत्रांच्या प्रारंभीच्या काळात स्त्री-शिक्षण, सतीची चाल, बालविवाह, विधवा पुनर्विवाह अशा प्रश्नांची चर्चा करण्यात येत असे. केवळ चर्चाच नाही तर त्या अनुषंगाने कायदे तयार करण्याची आवश्यकता वातावरणनिर्मिती वृत्तपत्रांनी केली, त्याचा परिणाम अनेक सामाजिक सुधारणा झाल्या, त्यासाठी आवश्यक ते कायदे अमलात आले.

महिलांचे शिक्षण, त्यासाठी समाजातील प्रयत्न, स्त्रियांना मिळणाऱ्या शैक्षणिक संधी, नोकरी-व्यवसाय यासंदर्भात तत्कालीन वृत्तपत्रे आणि नियतकालिकांनी ‘समाजमन’ तयार करण्याचे कार्य केले. आज प्रत्येक क्षेत्रात गुणवत्ता यादीमध्ये प्रथम येण्याचे मुलींचे प्रमाण अधिक आहे. महिलांच्या विकासासाठी समान संधी मिळाली की ‘सामाजिक चित्र’ बदलण्यास मदत होते हे त्याचे बोलके उदाहरण म्हणावे लागेल. स्त्री शिक्षणामुळे सामाजिक प्रश्न सुटले का? तर त्याचे उत्तर काही प्रमाणात होकारात्मक आहेत. महिलांचे आर्थिक सक्षमीकरणाचा परिणाम, समाजातील तिचे स्थान बदलण्यास नक्कीच मदत झाली आहे. स्वतःबद्दलचे आत्मभान, हक्क आणि अधिकार यामुळे स्त्री स्वातंत्र्य ही संकल्पना अधिक व्यापक झाली. स्त्रियांचे सामाजिक, आर्थिक, राजकीय, आरोग्य आणि इतर अधिकार जसे महत्त्वाचे आहेत तसे महिलांनी स्वतःचे स्थान निश्चित करण्यासाठी स्वतःची वैचारिक भूमिका निश्चित करणे तेवढेच आव्हानात्मक राहिले आहे. वृत्तपत्रांचे किंवा नियतकालिकांचे केवळ वाचक न राहता या माध्यमांमध्ये महिलांनी लेखन करण्यास सुरुवात केली, तसेच पत्रकारितेच्या क्षेत्रात रोजगार मिळविला. वृत्तपत्रांच्या संपादकपदी महिला आहेत हे चित्र फारसे समाधानकारक नसले तरी निश्चितच भूषणावह आहे.

 

बंगालमध्ये कामिनी सील यांनी ‘ख्रिस्ती महिला’ हे महिलांचे मासिक १८८१ साली कलकत्ता येथे बंगाली भाषेत सुरू केले. त्यानंतर आनंदीबाई लाड यांचे ‘आर्य भगिनी’, हेमंत कुमारी चौधराणी यांचे ‘सुगृहिणी’ अशा महिला संपादक असलेल्या महिलांच्या मासिकांची सुरुवात झाली. स्वातंत्र्याच्या काळात मादाम भिकाजी कामा (वंदे मातरम), डॉक्टर नी बेझंट ( न्यू इंडिया), अरुणा असफ अली (इन्कलाब) रेडिओ ब्रेन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उषा मेहता यांनी भारत छोडो आंदोलनात भूमिगत रेडियो काही काळ चालविला. अशी प्रमुख नावे पुढे येतात.

 

स्वातंत्र्यानंतर व्यावसायिक पत्रकारितेत महिलांचा प्रवेश झाला पण त्याहीआधी १९३० ला

गुजरात येथील नवसारी येथील होमाई वायखाला यांनी इलेक्ट्रिक विकली या मासिकात इस्टंट ब्युरो ऑफ द ब्रिटिश सर्व्हिस दिल्लीच्या या सायं दैनिकासाठी फोटोजर्नलिस्ट म्हणून काम केले. कमला मानकेकर, अनिता मलिक, विद्या मुन्शी, देवयानी चौबळ पाटील, अनिता सरकार, विद्या बाळ यांनी अनुक्रमे इंग्रजी, हिंदी, मराठी, गुजराती वृत्तपत्रे मासिकांसाठी काम केले, यामध्ये प्रभा दत्त, बरखा दत्त, कुणाल पांडे, सुचेता दलाल ही नावे महत्त्वाची आहेत, माध्यमाबरोबरच नभोवाणी आणि दूरचित्रवाणी या माध्यमांच्या विकासामुळे माध्यमांचे एक नवे युग महिलांसाठी खुले झाले, इलेक्ट्रॉनिक माध्यमातील महिला, महिला प्रेक्षक, जाहिरातीतील महिला, दूरचित्रवाणी मालिकांचा महिला प्रेक्षकांवर होणारा प्रभाव आणि परिणाम असे अनेक विषय आहेत. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या संकेतस्थळावर प्रतिमा पुरिया या आहेत. पहिल्या महिला न्यूज रीडर म्हणून माहिती देण्यात आली आहे. १९६७ ला सलमा सुलताना यांनी दिल्ली दूरदर्शनवर बातमी देण्यास सुरुवात केली. गेल्या साठ वर्षात दिल्ली दूरदर्शन मधील महिलांनी आपले स्वतंत्र पान तयार केले आहे. त्याचे योगदान पुस्तक रूपाने संकलित होण्याची आवश्यकता आहे. सह्याद्री आणि इतर प्रादेशिक वाहिन्या यांचाही असाच अभ्यास होणे आवश्यक आहे. मुंबई दूरदर्शन १९७२ ला सुरु झाले. भक्ती बर्वे,सुलु सन्याल, स्मिता पाटील, स्मिता तळवळकर, ज्योत्स्ना किरपेकर, चारुशीला पटवर्धन, वासंती वर्तक, अंजली पैठणे, ज्योती आंबेकर या न्यूज रीडरबरोबर महत्त्वाच्या पदावर कार्यरत असलेल्या महिलांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. १९९१ नंतर झालेल्या खाजगी वाहिन्यांनी तर महिलांसाठी रोजगार निर्माण केला. काही वृत्तवाहिन्यांमध्ये महिलांचे प्रमाण ४२ टक्के इतके आहे. खासगी रेडिओचे विश्व व्यापले आहे. चित्रपट आणि जाहिरात यातील महिला प्रतिमा या माध्यमांच्या सुरुवातीच्या काळापासून चिंतनाचा व चिंतेचा विषय आहे. आज जागतिकीकरणामध्ये चित्रपटातील महिलांचे चित्र असे अस्वस्थ करणारे आहे

तसेच त्यांचा सार्वजनिक जीवनातील मुक्त वावर हा चिंताजनक आहे. खासगी वाहिन्यांवर समाज माध्यमांवर त्यांचे पूर्ण चित्र येणे बाकी आहे. हॉलिवूडच्या पूर्णतः प्रभावाखाली व जागतिक कंपन्यांच्या प्रलोभनामुळे आपले वक्षस्थळ उघडे ठेवण्याची फॅशन ही समाजाला कोणत्या दिशेने घेऊन जात आहेत याची चिंता सध्या कोणत्याही घटकांना नाही. खाजगी दूरचित्रवाणीला कोणत्याही नियमांची भीती नाही. तसे स्वतःची अशी आचारसंहिता नाही. केवळ बाजार व्यवसायात टोकाच्या हव्यासामुळे माध्यमात येणारी स्त्री प्रतिमा विशेषतः फॅशन, चित्रपट आणि जाहिरात यातून होणारे महिलांच्या देह प्रदर्शन हा गंभीर सामाजिक चिंतेचा विषय होणे आवश्यक आहे. माध्यमातून महिलांची प्रतिमाही उपभोगण्यासाठीच आहे असा संदेश पोहोचतो आहे.

 

यामुळे समाजातील महिलांचा दर्जा, महिलांचे विषय प्रश्न याविषयी असलेली आस्था यावरही विचार झाला पाहिजे. वृत्तपत्रांनी महिला वाचक तयार करण्यासाठी महिलांचे व्यासपीठ तयार केले आहे. या व्यासपीठावरून महिलांचे प्रश्न, आशा-अपेक्षा, महिलांचे हक्क आणि अधिकार याचबरोबर माध्यमातील स्त्रीप्रतिमा यावर कधीतरी गंभीर विचार होण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. महिला आर्थिक सक्षम करण्यासाठी ‘इंटरनेट यात्री’सारखे प्रकल्प गुगल इंडिया, टाटा ट्रस्ट, काही स्वयंसेवी संस्था माध्यमाबरोबर करताहेत हे नक्कीच महत्त्वाचे पाऊल आहे. बदलत्या समाजातील बदलती माध्यमे आणि स्त्री प्रतिमा या विषयाचा विचार करता सध्या प्रकर्षाने जाणवणारा मुद्दा म्हणजे माध्यमातूनचे कार्य दाखवले जाते यावर कुठेच नाराजी, नापसंती विरोध दिसत नाही. आपल्या दिवाणखान्याच्या दूरचित्रवाणीवर फिल्मी चित्रपट पुरस्कार यावेळी सेलिब्रिटी महिलाप्रदर्शन आपल्याला अस्वस्थ करत नसेल तर महिला आणि माध्यमांचे चित्र चित्रण या विषयावर काहीच न बोलणे हा मार्ग पत्करावा लागणे हे गंभीर आहे. मोबाईल, समाज माध्यमे आणि नेट फिक्स वरील महिला प्रतिमान याविषयी जर असंवेदनशील होणार असतील तर त्या तंत्रज्ञानामुळे हे सगळे घडत असले तरी त्याला काही मर्यादा, बंधने असायला हवे असे वाटणे महत्वाचे आहे.

व्यास क्रिएशन्सच्या चैत्र पालवी 2019 या अंका डॉ. निशा मुडे -पवार यांनी  लिहिलेला लेख.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..