वैवाहिक आयुष्य बहरविण्यासाठी
प्रेम हा विवाह जीवनाचा पाया आहे. प्रेमात शारीरिक आकर्षण हा फार मोठा भाग आहे, पण त्याचबरोबर प्रेम हे मानसिक व भावनिक पातळीवर रुजले असेल तरच शारीरिक पातळीवर टिकू शकते. लग्नामुळे दोन वेगवेगळ्या आर्थिक, कौटुंबिक, स्वाभाविक आणि काही वेळा वेगवेगळ्या जातीधर्मातील व्यक्ती आयुष्य एकत्रित घालवण्याच्या ओढीतून एकत्र येतात, स्त्री पुरुषांमधल्या नैसर्गिक आकर्षणामुळे विवाहाने एकत्र बांधले जाणे ही एक वेळ सोपी गोष्ट आहे […]
