नवीन लेखन...

आपली इनिंग संपली, आता पॅव्हिलीअन!

निवृत्त किंवा ‘न धरी शस्त्र करी। युक्तीच्या गोष्टी सांगेन मी चार.’ भूमिका घेण्यापूर्वी आपण म्हणजे पतीपत्नी वृद्धापकाळातही आर्थिकदृष्ट्या मुलांच्यावर अवलंबून न राहता स्वावलंबी राहतील याची पूर्णपणे काळजी आधीपासूनच घेतली पाहिजे. यासाठी नटसम्राट नाटकातील ‘समोरचे ताट द्यावे पण  बसायचा पाट देऊ नये.’ हा उपदेश अमलात आणावा. क्रिकेटचा मी फॅन आहे. लहानपणापासून मी क्रिकेट खेळलो. पुढे मुंबईपर्यंत जाऊन […]

नात्यांच्या बदलत्या भूमिका

शब्दांमध्ये इतकी व्यापकता, समर्थता सामावलेली असते की, ज्याप्रमाणे चिंतामणी मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकतो, अगदी त्याचप्रमाणे शब्दांमध्येही माणसाच्या मनातल्या सगळ्या इच्छा पुर्या करण्याचं सामर्थ्य असतं. फक्त या शब्दांची आयोजना करण्याचं कौशल्य माणसाकडे पाहिजे. हुकमत गाजवण्यापेक्षा नम्रतापूर्वक बोलणं कधीही उपयुक्त ठरतं. प्रत्येक माणसाला सुखद आठवणींच्या झुल्यावर झुलायला खूप आवडत असतं. वर्तमानकाळात चांगले-वाईट अनेक प्रसंग येतात. घटना […]

गुंतवणूक – पोर्टफोलिओ आणि सोने

देशात पुरेसा पैसा चलनात असला तर उपभोगासाठी त्याचा वापर करून काही रक्कम बचत केली जाऊ शकते. या बचतीने बँकातील ठेवी वाढतात आणि त्यामुळे बँका अधिक कर्ज देऊ शकतात. उपभोक्ते, उद्योजक, शेतकरी, व्यापारी यांना अधिक कर्ज मिळाल्याने अधिक उत्पादन, अधिक विक्री आणि अधिक निर्यात शक्य होते.आणि त्यातू देशाची आर्थिक प्रगती साधता येते. […]

जीवन त्यांना कळले हो

लौकिक अर्थाने आयुष्याची संध्याकाळ झाली असताना हे ज्येष्ठ दुसर्यांच्या आयुष्यात आनंद, समाधानाची पहाट उगवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. शरीराचे वाढते वय किंवा दर वर्षीच्या जन्मतारखा या ज्येष्ठांच्या मनातले तारुण्य कधीच संपवू शकणार नाहीत. खरे तर त्यांना पाहून वृद्ध किंवा ज्येष्ठ म्हणणे ही बरे वाटत नाही. कारण व्योमनाप्रमाणे शरीर सोडले तर त्यांच्या उत्साहात, समजशीलतेत, बुद्धिमत्तेत तीळमात्र फरक पडला नाही. […]

भय इथले संपत नाही

लाओ त्से हा चीनी तत्त्वज्ञ म्हणतो आपण जितका लांब प्रवास करावा, तितकं आपल्याला कमी कमी कळत जातं. हे आपण लक्षातच घेत नाही आणि इथेच आपलं भय वाढीला लागते. जग जितकं पचवावं – रिचवावं तितकंच नेमकं अंगी लागतं. वृद्ध हा शब्दच संस्कृत भाषेत ज्ञानी या अर्थानं आलेला आहे. रशियन चित्रपट आहे द रिटर्न नावाचा. यात वडील अनेक […]

पर्यटन आणि संरक्षण

कुठेही प्रवासाला जायचं ठरवलं की एक अनामिक हुरहूर मनाला लागते. जायचा दिवस जवळ आला की आपली तयारी सुरू होते. कपडे कुठले घालायचे, बॅग कुठली न्यायची यापासून खरेदी काय करायची याचे बेत मनात आखायला सुरवात होते. परदेशी जाण्यासाठी व्हिसा मिळेल की नाही यापासून तिथल्या चलनात करायच्या खर्चाचे गणित सुरू होते. हे करत असताना प्रवासाचा दिवस उजाडतो आणि आपण घराबाहेर पडतो. […]

कोकणातील बंदरे

दाभोळ, जयगड, रत्नागिरी, रनपार, मुसाकाझी, विजयदुर्ग, देवगड, मालवण अशा सर्वच बंदरातून या प्रवासी आगबोटी येता जाता थांबत होत्या आणि प्रवाशांची बंदरांवर वर्दळही होती. त्याकाळी किनारपट्टीवरील लहान लहान खाड्यांमधून गलबते व मचवे गर्दी करून असत. रेशनवरील तांदूळ, गहु, जोंधळा अशा अन्नधान्यातून मीठ, लाकूड, मंगलोरी कौले अशा सर्व स्तरावरील मालवाहतूक लहान-मोठ्या बंदरांतून गलबतांद्वारे मोठ्या  प्रमाणात होत असे. […]

नवतारुण्याची प्रगल्भ डहाळी

वर्तमानात वयाची वाढ तर थांबवता येत नाही नि निसर्गाने ठरवलेले श्वास तर घ्यावेच लागणार असतात. मग हेच जर सत्य आहे, तर ते सत्य ‘सुंदर’ का करायचे नाही? ज्या प्रज्ञेने वैज्ञानिक झेप घेऊन चंद्र काबीज केला, त्याच प्रज्ञेने हे ज्येष्ठपण अधिकाधिक सुसह्य, आनंदमय का करता येऊ नये? स्वानंदी सुरेल व ‘भाव’ जपून नवी ज्येष्ठालये उभारणे, आता जाणिवेने […]

कोकणची माती आणि तिचे संरक्षण

कोकणच्या मातीमध्ये रुजणारे हे सर्व वृक्ष या भागाला समृध्दी तर देतीलच पण वृक्षांच्या उत्पादनावर आधारित शेकडो कुटिर उद्योग कोकण भूमीला स्वयंसिद्धतेकडे स्वावलंबनाच्या महाद्वारामधून घेऊन जाऊ शकतात. कोकणच्या मातीचे संरक्षण करावयाचे असेल तर या भूभागाचा विकास तेथील निसर्गाला बरोबर घेऊनच करावयास हवा. […]

योग: कर्मसु कौशलम्

कर्माच्या दोरीवरून चालताना दुसर्या बाजूचा तोलही सांभाळावा लागतो. ही दुसरी बाजू अपेक्षांची! मी एवढं केलं सगळ्यांसाठी पण कुणाला काही नाही त्याचं. साधं थँक्यू म्हटलं नाही. ..वाईट वाटतं. अगदी खरं आहे. पण हळूहळू ते वाईट वाटणं ही कमी व्हायला हवं. कारण ते वाईट फक्त आपल्याला वाटत असतं. ज्याला ते कळायला हवं त्याच्या ते गावीही नसतं. ‘योग: कर्मसु […]

1 35 36 37 38
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..