नवीन लेखन...

आत्मनिर्भर भारत : प्रतिभा पोषणाचे द्योतक

आत्मनिर्भर यात ‘आत्म’ हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. आत्म याचा अर्थ स्वयम् म्हणजे स्वतः. स्वतःची ओळख असणं खूप गरजेचं आहे. स्वतःची ताकद काय आहे, मर्यादा काय आहे, आपली बलस्थाने कोणती, दुर्बलता कोणती, याचं ज्ञान आपल्याला होतं. दुर्बलतेवर आपण मात करू शकतो. आपल्या बलस्थानांना आपण अधिक मजबूत करू शकतो. […]

आत्मनिर्भरता, शिवराय आणि अंदमान

इतका वेळ शांतपणे ऐकणारा मिलिंद भारावून बोलू लागला, ‘अप्पा. शिवाजी महाराज आणि सावरकर खरोखरच ग्रेट होते. अतिशय प्रतिकूल परिस्थिती आणि मृत्यूचे सावट सतत डोईवर असताना दोघांनी पेशन्स राखून, प्रसंगी दोन पावलं मागे सरून, मिळालेल्या संधीचा लाभ घेऊन, चकवा देऊन, संकटाशी दोन हात केले होते. […]

गहिवर (कथा)

दिवाळी जवळ आली रे आली की रामजी शेठजींचा मूड एकदम बिघडायचा. एक माणूस म्हणून ते चांगले होते पण पदरचा पैसा गेला की त्यांचा जीव कासावीस होत असे. गणपती उत्सवाला शेकड्यांनी वर्गणी द्यायला लागायची. […]

सुखद वानप्रस्थाश्रमासाठी

काहींना मनाविरुद्ध वृद्धाश्रमात राहावं लागतं. वृद्धाश्रमासारखा ‘मानहानीकारक’ प्रकार टाळण्यासाठी अनेकजण खास ज्येष्ठांसाठी उभारलेल्या वसाहतींमध्ये राहणं पसंत करतात. या वसाहतींचं सर्वात मोठं वैशिष्ट म्हणजे ज्येष्ठांना आयुष्यातल्या संध्याकाळी स्वाभिमानाने जगता येतं. या वसाहती ज्येष्ठांच्या गरजा लक्षात घेऊन उभारल्या जातात. आवश्यक सुखसुविधांबरोबरच वैद्यकीय सुविधाही अहोरात्र उपलब्ध असतात. संसाराचा मोह सोडून मोक्षाकडे वाटचाल करण्याचा टप्पा अशी वानप्रस्थाश्रमाची ओळख असली तरी […]

भारतातील निसर्ग आणि विश्रांतीची पर्यटन स्थळे

निसर्ग नेहमीच आपल्याला भरभरून देत असतो. अशा या हिरवाईने नटलेल्या भारत देशात आपण जन्मलो हे आपलं भाग्यच! लांबच लांब पसरलेल्या हिमालय पर्वतरांगा, रांगडा सह्याद्री, त्याच्या कुशीत मनमुराद हुंदडणाऱ्या नद्या, त्या नद्यांना प्रेमाने आपल्यात सामावून घेणारे समुद्र, दूरवर पसरलेले वाळवंट हे सर्वच आपल्याला खुणावत असतात. […]

आपली इनिंग संपली, आता पॅव्हिलीअन!

निवृत्त किंवा ‘न धरी शस्त्र करी। युक्तीच्या गोष्टी सांगेन मी चार.’ भूमिका घेण्यापूर्वी आपण म्हणजे पतीपत्नी वृद्धापकाळातही आर्थिकदृष्ट्या मुलांच्यावर अवलंबून न राहता स्वावलंबी राहतील याची पूर्णपणे काळजी आधीपासूनच घेतली पाहिजे. यासाठी नटसम्राट नाटकातील ‘समोरचे ताट द्यावे पण  बसायचा पाट देऊ नये.’ हा उपदेश अमलात आणावा. क्रिकेटचा मी फॅन आहे. लहानपणापासून मी क्रिकेट खेळलो. पुढे मुंबईपर्यंत जाऊन […]

नात्यांच्या बदलत्या भूमिका

शब्दांमध्ये इतकी व्यापकता, समर्थता सामावलेली असते की, ज्याप्रमाणे चिंतामणी मनातली प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकतो, अगदी त्याचप्रमाणे शब्दांमध्येही माणसाच्या मनातल्या सगळ्या इच्छा पुर्या करण्याचं सामर्थ्य असतं. फक्त या शब्दांची आयोजना करण्याचं कौशल्य माणसाकडे पाहिजे. हुकमत गाजवण्यापेक्षा नम्रतापूर्वक बोलणं कधीही उपयुक्त ठरतं. प्रत्येक माणसाला सुखद आठवणींच्या झुल्यावर झुलायला खूप आवडत असतं. वर्तमानकाळात चांगले-वाईट अनेक प्रसंग येतात. घटना […]

गुंतवणूक – पोर्टफोलिओ आणि सोने

देशात पुरेसा पैसा चलनात असला तर उपभोगासाठी त्याचा वापर करून काही रक्कम बचत केली जाऊ शकते. या बचतीने बँकातील ठेवी वाढतात आणि त्यामुळे बँका अधिक कर्ज देऊ शकतात. उपभोक्ते, उद्योजक, शेतकरी, व्यापारी यांना अधिक कर्ज मिळाल्याने अधिक उत्पादन, अधिक विक्री आणि अधिक निर्यात शक्य होते.आणि त्यातू देशाची आर्थिक प्रगती साधता येते. […]

जीवन त्यांना कळले हो

लौकिक अर्थाने आयुष्याची संध्याकाळ झाली असताना हे ज्येष्ठ दुसर्यांच्या आयुष्यात आनंद, समाधानाची पहाट उगवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. शरीराचे वाढते वय किंवा दर वर्षीच्या जन्मतारखा या ज्येष्ठांच्या मनातले तारुण्य कधीच संपवू शकणार नाहीत. खरे तर त्यांना पाहून वृद्ध किंवा ज्येष्ठ म्हणणे ही बरे वाटत नाही. कारण व्योमनाप्रमाणे शरीर सोडले तर त्यांच्या उत्साहात, समजशीलतेत, बुद्धिमत्तेत तीळमात्र फरक पडला नाही. […]

भय इथले संपत नाही

लाओ त्से हा चीनी तत्त्वज्ञ म्हणतो आपण जितका लांब प्रवास करावा, तितकं आपल्याला कमी कमी कळत जातं. हे आपण लक्षातच घेत नाही आणि इथेच आपलं भय वाढीला लागते. जग जितकं पचवावं – रिचवावं तितकंच नेमकं अंगी लागतं. वृद्ध हा शब्दच संस्कृत भाषेत ज्ञानी या अर्थानं आलेला आहे. रशियन चित्रपट आहे द रिटर्न नावाचा. यात वडील अनेक […]

1 34 35 36 37
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..