नवीन लेखन...

स्वामी विवेकानंद बालपणीचे

कोलकत्याच्या उत्तरेकडील शिमुलिया नावाच्या विभागात गौरमोहन मुखर्जी मार्गावरील दत्त कुटुंबियांच्या भव्य अशा घरात स्वामी विवेकानंद यांचा दि. ०२ जानेवारी १८६३ रोजी जन्म झाला. सकाळी ६ वाजून ३३ सेकंदानी शुवनेश्वरी यांनी या स्वामी विवेकानंदांना जन्म दिला. दोन मुलींच्या जन्मानंतर एका मुलाचा जन्म झाला त्यामुळे सारे दत्तभवन आनंदाने दुमदुमुन गेले. असे कांही आनंदाचे दिवस गेल्यावर एक दिवस असा उजाडला की, त्या दिवशी या नवजात बालकाचे नामकरण करावयाचे होते. मुलाचा चेहरा त्यांच्याच घरातील संन्यासी म्हणून गेलेले त्यांचा सारखा दिसत होता.या कारणास्तव.या बाळाचे नांव ‘दुर्गादास* म्हणून ठेवावे अशी इच्छा प्रकट केली गेली. परंतु श्रुवनेश्वरी देवीने स्वतःच्या दैवी स्वप्नाचे स्मरण ठेवून आपल्या मुलाचे नांव “वीरेश्वर’ ठेवण्यात यावे असे सुचविले. त्याप्रमाणे नामकरणाचा विधिपूर्वक सोहळा पार पडल्यानंतर कुटुंबातील सारी मंडळी मुलाला “बिले? या ठोपण नांवानेच हाक मारू लागली. शेवटी उष्टावणाच्या समारंभा प्रसंगी बाळाचे नाव नरेंद्रनाथ असे ठेवण्यात आले. अनेक हिंदू कुटुंबात मुलांची नावेदोन असतात. त्यापैकी एक राशिनाम आणि दुसरे व्यवहारातील प्रचलित नांव. पण पुढील साऱ्या आयुष्यात “नरेंद्रनाथ? या नावानेच सर्वत्र प्रसिध्द झाले.

जसजसा बाळ मोठा होऊ लागला तसतसा त्या बाळात अवखळपणा, खोडकरपणा आणि खट्याळपणाही वाढूलागला. त्याच्या या खट्याळपणाने सर्वचजणांच्या नाकीनऊ येत असे. धाक, भिती, विनंती याची कसलीही मात्रा त्यावर लागू होत नसे. या मस्तीखोर बाळाला सरतेशेवटी त्याच्या मातोश्रीने एक तोडगा शोधून काढला. “शिव-शिव’* म्हणत त्याच्या डोक्यावर पाणी ओतताच. एखाद्या मंतरलेल्या सर्पाप्रमाणे लहानगा नरेंद्र अगदी शांत होऊन जात असे. “असुतोष’ (शीघसंतोषी) शिव नुसत्या जलधारेच्या अभिषेकाने संतुष्ट होत असतात या विश्वासाच्या आधारे त्या आईने ही अभिनव क्लुप्ती अंमलात आणली होती. आपला मुलगा शिवाच्या आशीर्वादाने जन्मला आहे असा तिचा दृढ विश्वास असलातरी ते गुपीत कुणाहीजवळ कधी उघड केले नव्हते. पण तेव्हा एकदा अशाच एके दिवशी छोटा नरेंद्र खूप धिंगाणा घालत होतां. त्याची आई हैराण झाली तेव्हां तिच्या तोंडून नकळत निघाले की, “महादेवाने” स्वत:न येता कुठुन हे भूत पाठवून दिले आहे कुणास ठाऊक अशा प्रकारे कधी कधी त्याची मस्ती अधिक वाढली की, त्याची आई त्याला असंही म्हणे की बघ “बिले” तू ही अशी दांडगाई करशील तर महादेव तुला कैलासात येऊच देणार नाहीत बघ. हे ऐकल्यावर मात्र हा छोटा बिले. भयभित डोळ्यांनी आईकडे पाहून शांत होत असे.

एक मुसलमान विश्वनाथबाबूंचे अशील होते. या अशिलांचे नरेंद्रावर खूप प्रेम होते. ते आले की नरेंद्र त्यांच्याकडे धाव घेत असे. त्यांच्या मांडीवर बसून हत्तीच्या आणि उंटाच्या पाठीवर बसणाऱ्या गमती जमती ऐकत असे. मलाही उंटाच्या पाठीवर बसण्यासाठी घेवून जा असा हट्ट करीत असे. त्यावर ते गृहस्थ म्हणत की तू आधी मोठा हो मग मी तुला नक्की घेवून जाईल. उंटावर बसायला मिळेल या आशेने उतावीळ होऊन दुसऱ्याच दिवशी त्यांना तो सांगे की, हं बघा काल रात्री मी दोन बोट मोठा झालो. चला आता मला घेवून. त्यांची गट्टी जमल्यामुळे तो आशील नरेंद्रला मिठाई, फळे खायला देत असे. पण गरेंद्रला त्याचे काही वाटत नसे. मात्र त्याच्या घरातील मंडळींमधे चांगलेच वादळ उठत असे. पण विश्वनाथबाबू हे कांही संकुचित विचारांचे धर्मवेडे नव्हते. त्यामुळे आपल्या पुत्राचा हा जातपातनाशक भ्रष्टाचार त्यांच्या दृष्टीने दंडजनीय ठरू शकला नाही. अनेक वेळा अनेक जाती धर्माचे अशील कोर्ट कचेरीच्या कामासाठी नरेंद्रच्या वडीलांकडे येत असत. त्यांच्यासाठी बैठकीत एका बाजूला अनेक रूपेरी हुक्के ठेवलेले असत. मुसलमानांच्या हातची मिठाई खाल्यामुळे नरेंद्र घरच्या मंडळींचा रोष घेत असे. तेंव्हा पासून जातिभेद त्याच्या दृष्टीने एक विलक्षण कोडेच होऊन बसले. कां बरे एका माणसाने दुसऱया एखाद्याच्या हातचे पदार्थ खायचे नाहीत. एखाद्याने जर परजातीच्या व्यक्तींच्या हातचे खाल्ले तर काय होईल?

त्याचा डोक्यावर छत कोसळेल? तो काय मरून जाईल? असे अनेक प्रश्‍न नरेंद्रच्या मनात घोळ करून बसत असत. एके दिवशी नरेंद्रने दिवाणखान्यात प्रवेश केला. तिथे आणखी कुणी नाही याची खात्री करून मनाचा निश्चय करून एका मागून एक याप्रमाणे सर्व हुक्के एक एकदा ओढण्यास सुरूवात केली. पण कुठे काय? त्याच्यात काही बदल झाला नाही. तो तर होता तसाच राहीला. नरेंद्र आपल्या विचारात गर्क असतानाच विश्वनाथबाबू तेथे आले. त्यांनी नरेंद्रला खटकले व विचारले की. काय चालविले आहेस रे बिले? गरेंद्रने त्यांना ताबडतोब उत्तर दिले. जातीभेद मानला नाही तर माझे काय होते? ते पहात होतो. विश्वनाथबाबूंनी त्याकडे हसत आपल्या लाडक्या मुलांकडे पहिले आणि त्याच्या डोक्यावरील काळ्याभोर केसात हात फिरवून निघून गेले. नरेंद्रची आई रोज नित्यनियमाने शिवपूजा करीत असे. ते पाहून तो ही शिवपूजा करू लागला. कधी पद्मासन घालून तो एकटाच ध्यानस्थ बसे. तर कधी आपल्या मित्रांना बोलावून आणि सर्व मिळून त्या शिवमूर्तीला घेरून ध्यान करण्यासाठी बसत. नरेद्र कसले चिंतन करीत आहे ते त्यालाच माहित. असाच एकदा ध्यान करता करता आपल्या आईच्या बोलण्याची नरेंद्रला एकाएकी आठवण झाली. तो दुःखी होऊन आपल्याशीच विचार करू लागला. खरोखर का मी खोडकर आहे म्हणून महादेवांने मला दूर सारले असेल? त्याने आपल्या आईला विचारले, आई मी जर चांगला झालो, साधू झालो तर शिव मला आपल्या जवळ परत येवू देतील का? आईने त्यांचे सांत्वन करून सांगितले की, हो येऊ देतील बाळा, कां बर येऊ देणार नाहीत? हे शब्द तिच्या तोंडावाठे सहजगत्या बाहेर पडले खरे पण तिला एक हूरहूर मात्र लागून राहीली. तिचे हृदय भरून आले आपल्या आजोबांच्या पावलावर पाऊल टाकून नरेंद्रही घरदार सोडून गेला तर! तिने स्वतंःला सावरले खंबीर मनाच्या भुवनेश्वरीने शिवो स्मरण करून क्षणिक ममतेची दुर्बलता मनातून हुसकावून लावली. विचार केला. भगवंताची जशी इच्छा असेल तसेच घडेल. तिला रोखणारी मी कोण? माता पित्यांचा प्रेमाच्या शीतल छायेत सुरूवातीचा सोळा वर्षाचा काळ हसण्या खेळण्यात अगदी आनंदात गेला. त्याचे बालपणीचे जीवन अलौकीक किंवा असाधारण नसले तरी वैशिष्ट-यपूर्ण मात्र खासच होते.

सोळा वर्षाच्या वयातच त्याच्या ठायी जी तीक्ष्ण बुध्दी, जी प्रखर आत्मनिष्ठा आणि ज्ञानोपार्जनाची जी प्रबळ निष्ठा दिसून येत होती तिला तोड नाही. पित्याजवळून त्याने लहानपणापासूनच संगीताचे शिक्षण घ्यावयास प्रारंभ केला होता आणि त्या वयातही गा-यनकलेतील त्याचे प्राविण्य प्रशंसनीय होते. हा बुध्दीमान, तेजस्वी, चंचळ बालक एकीकडे खोल विचारशील. धर्मपरायण, दयाळू आणि मित्रवत्सल होता.

त्याच्या एकंदर वागण्यात अशी कांही निष्कपट सरलता भरलेली असे की तिच्यामुळे तो घरांतील आणि घराबाहेरील साऱ्यांचाच कंठमणी होऊन बसला होता. असो. मॅट्रीकची परीक्षा उत्तीर्ण होऊन नरेंद्रनाथाने कॉलेजात प्रवेश केला. लागलीच विविध घटनांच्या आघात प्रत्यघातांमधून त्याच्या सरळ स्वाभाविक जीवनात एका विचित्र रहस्यमय आणि गुंतागुंतीच्या अध्यायास प्रारंभ केला.

– विद्याधर ठाणेकर

Avatar
About विद्याधर ठाणेकर 10 Articles
विद्याधर ठाणेकर हे ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष आहेत. ते मराठी नाट्य परिषदेच्या ठाणे शाखेचे कार्यवाह आहेत. ते ठाण्यातील अनेक सामाजिक संस्थांशी निगडित आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..