श्री मोरया गोसावी आणि चिंचवड परंपरा
मोरया आता गोसावी झाले. गो म्हणजे इन्द्रिये; त्यावर ताबा मिळवणारे गोस्वामी म्हणजे जितेंद्रिय योगी. त्यांना अष्टमहासिद्धी प्राप्त झाल्या. मोरगावला परतल्यावर त्यांचा दबदबा फार वाढला. अष्टौप्रहर लोक त्यांच्याकडे येऊ लागले. रंजल्या, गांजल्यांच्या अडीअडचणी दूर करताना त्यांना दिवसाचे चोवस तास पुरेनासे झाले. शेवटी वैतागून त्यांनी मोरगाव सोडले. […]
