नवीन लेखन...

समाजमाध्यमांचा विधायक वापर

सहाय्यक प्राध्यापक समाजकार्य विभाग, अॅमिटी युनिव्हर्सिटी, मुंबई

मानव हा समाजशील प्राणी असून आपल्या दररोजच्या सर्व गरजा भागविण्यासाठी समाजातील विविध घटकांवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे अवलंबून असतो.

या सगळ्यात आपल्या भावना आणि विचार एकमेकांशी संभाषण साधून व्यक्त करण्याचे वरदान मानवाला लाभले आहे. पूर्वीच्या काळापासून आपण संदेशवहनासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा वापर करीत आलो आहोत या मागे एकच उद्दिष्ट की, आपल्या मनातल्या भावना व्यक्त करणे तसेच आपले विचार मांडणे. अगदी पूर्वीच्या काळी जलद गतीने संदेश पाठवण्यासाठी तार यंत्रणा अस्तित्वात होती. तसेच पोस्टमनद्वारे येणाऱ्या आपल्या मित्रांच्या-नातेवाईकांच्या पत्राची अनामिक ओढ होती.

१९९१ नंतर आपण स्वीकारलेल्या जागतिकीकरण आणि उदारीकरणामुळे आणि तंत्रज्ञाच्या विस्तारामुळे संगणक इंटरनेटचा वापर वाढला आणि घरात सहजबसल्या जगातील घडामोडी समजू लागल्या तसेच काही वर्षांपूर्वी आलेल्या फेसबुक, व्हॉटस अँप, ट्विटर इत्यादी समाज माध्यमांनी तर लहानापासून ते वृद्धांपर्यंत सर्वांच्या मनात गारुड केले आहे यात काहीच शंका नाही. तसेच घर, ऑफिस, सार्वजनिक ठिकाणे या ठिकाणांवर मोबाइलला वाय-फाय नावाचा सोबती मिळाल्यामुळे ‘जिओ जी भरके’ याचा अर्थ बदलला आहे. आता ही समाजमाध्यमांचे आपल्या जीवनातील स्थान अढळ असून, ही समाजमाध्यमे आपल्या फोन सोबत मनातही पक्की ‘इन्स्टॉल’ झाली आहे असे म्हणणे वावगे ठरू नये. आज या समाज माध्यमातून जगभरातील घडामोडी आपल्या मोबाईलच्या एका टच वर उपलब्ध होतात. नवीन तंत्रज्ञान, शिक्षण, वेगवेगळ्या क्षेत्रात केले जाणारे नवीन प्रयोग याची माहिती या इंटरनेट आणि समाजमाध्यमांचा मायाजालातून मिळत राहते. परंतु सध्या सर्वत्र समाजमाध्यमांचा अनिर्बंधपणे वापर वाढल्यामुळे तसेच अनेकवेळा आपली सामाजिक आणि नैतिक जबाबदारीचे भान विसरल्यामुळे समाजात तेढ निर्माण होण्याच्या तसेच भावना दुखावल्या जाण्याचे प्रकार सर्रास घडताना दिसतात. वेळप्रसंगी हे सर्व एका टोकाला जाऊन त्याचे रूपांतर ‘सायबर गुन्ह्यात ‘ होताना आपल्याला दिसते. परंतु यासाठी आपण समाज माध्यमांना संपूर्ण दोषी ठरवून चालणार नाही. समाजमाध्यमांचा विधायक कार्यासाठी कसा वापर होऊ शकतो याचा सर्वाना वैयक्तिक पातळीवर विचार करणे काळाची गरज आहे असे मला प्रामाणिकपणे वाटते.

मुंबई विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना अनेकदा विचार यायचा की, आजच्या पिढीला केवळ शिक्षण देणाऱ्या शिक्षकाची गरज नसून त्याच्या सोबत क्षेत्रकार्यात उतरून मार्गदर्शन करणाऱ्या मार्गदर्शकाची खरी गरज आहे. मग ही मार्गदर्शकाची भूमिका मी कशाप्रकारे निभावू शकतो हा विचार करत असताना ‘सतरंगीच्या’ स्थापनेतून उत्तर सापडण्यास थोडीबहुत मदत झाली.

आज या लेखाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सोबत घेऊन समाजमाध्यमांचा वापर विधायक कार्यासाठी करण्याचा जो प्रामाणिक प्रयत्न केला आहे तो आपल्यापुढे मांडणार आहे. मे, २०१७ उन्हाळ्याची सुट्टी सुरू होती. विद्यार्थ्यांना सोबत घेऊन प्रशासनासोबत विधायक कार्य झाले पाहिजे असे मला मनापासून वाटत होते. सध्याच्या काळात ए. सी रूममध्ये बसून प्रशासन कसे अकार्यक्षम आहे यावर तासंतास चर्चासत्रांचे गुऱ्हाळ भरवायचे आणि तरुणांमध्ये प्रशासनाविषयी नकारात्मकता आणायची आणि तरुणांची ढाल करून आपले छुपे अजेंडे साध्य करायचे असे अनेक प्रकार समाजमाध्यमातून दिसून येतात. या सगळ्या नकारात्मकतेत विद्यार्थ्यांना सुट्टीच्या काळात सोबत घेऊन प्रशासनासोबत काय विधायक कार्य करता येईल याचा विचार सुरू होता. या सगळ्या विचारमंथनातून ‘सतरंगी या व्हाट्स अॅप’ ग्रुप चा जन्म झाला. सुमारे २० – २५ विद्यार्थी सोबत घेऊन उन्हाळ्याच्या सुट्टीच्या काळात पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे श्रीमती. हेमांगिनी पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून रस्ते सुरक्षेविषयी संदेश देणारी भिंती चित्रे (वॉल पैंटिंग) करण्यात आले. ह्या पहिल्यावहिल्या सामाजिक उपक्रमातून सतरंगी मधील तरुण कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला होता. अलीकडे दिवाळीच्या सुट्टीत विद्यार्थ्यांनी कोल्हापूर येथे कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ‘रस्ते सुरक्षा जागर’ ह्या उपक्रमाद्वारे पथनाट्याच्या माध्यमातून कोल्हापूर आणि परिसरात रस्ते सुरक्षा आणि नागरिकांची जवाबदारी या विषयावर जनजागृती केली. तर सतरंगीच्या दुसऱ्या टीम ने ठाणे ग्रामीण पोलिसांसोबत भाईंदर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदशनाखाली पथनाट्याच्या माध्यमातून रस्ते सुरक्षा या विषयावर पथनाट्य केले. तसेच सतरंगीच्या तिसऱ्या तुकडीने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक डॉ. श्रीकांत परोपकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पथनाट्याद्वारे ग्रामीण भागात जाऊन लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कशा पद्धतीने कार्य करतो तसेच नागरिक म्हणून आपण काय करू शकतो या विषयावर जनजागृती केली. आपण सर्वानी समाज माध्यमांचा जबाबदारीने आणि विधायक कार्यासाठी वापर करणे ही काळाची गरज आहे. या समाज माध्यमाच्या विधायक वापरातून आपण स्वतःमध्ये आणि आपल्या समाजात एक सकारात्मक वातावरण निश्चित करू शकतो. या समाजमाध्यमांचा विधायक वापर होण्यासाठी शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी पालक आणि शिक्षक म्हणून एकत्रितपणे कार्यरत होण्याची गरज आहे. या समाजमाध्यमाच्या माध्यमातून होणाऱ्या विधायक कार्यात तरुण एकत्र आल्यामुळे एक सकारात्मक ऊर्जा समाजात निर्माण होईल तसेच प्रत्यक्ष कार्य करण्यातून तरुणांमध्ये संघभावना येईल यातूनच राष्ट्रविकासाची एक नवीन सुरुवात होईल यात काहीच शंका नाही. या सगळ्यात गरज आहे ती तरुणांना समाजमाध्यमातून विधायक कार्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि या कार्यातून झालेली सकारात्मकमनांनी एकमेकांना टॅग करण्याची.

व्यास क्रिएशन्सच्या चैत्र पालवी 2019 या अंकात अमेय महाजन यांनी लिहिलेला लेख.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..