नवीन लेखन...

जिकडे तिकडे खड्डेच खड्डे..!

भूतलावर कोठेही जा खड्डा पाहायला मिळतोच या खड्ड्याला ना देशाचे बंधन असते ना प्रांताचे ना प्रदेशाचे.. फरक एवढाच की कुठला खड्डा मोठा असेल तर कुठला लहान… कुठला खड्डा मुद्दामहून पडलेला असेल तर कुठला निसर्गतः तयार झाला असेल.. अशी खड्डा निर्मितीची खूप कारणे सांगता येतील.. […]

बटाटा वड्याची पूजा

गोर गरिबांची अत्यल्प दरात भूक भागवणारा, लग्नाच्या जेवणावळीत हॉट फेवरिट ठरणारा आणि खवैयांच्या जिभेचे चोचले पुरवणारा हरहुन्नरी बटाटेवडा मला खरोखरच पूजनीय वाटतो. […]

शाळा हेच आमचे समाज माध्यम..

तेंव्हा शिक्षकाजवळ छडी असायचीच आज जसं मोबाईल असतो तशी.. त्या छडीमुळेच तर व्हायरल व्हायचे आमचे पराक्रम.. त्या छडीचीच फ्रेन्ड रिक्वेस्ट यायची आमच्या पाठीवर.. मग काय.. त्यात वेगवेगळे राग, आलाप, ताना घेऊन सुरु व्हायचे संगीत.. थोडी धूसफूस.. हे आमचं फेसबुक.. बुकात फेस लपवून फुंदत-फुंदत रहायचं कितीतरी वेळ.. थोड्या वेळात सारं विसरलं जायचं… आजही हे आठवलं की हसू आवरता येत नाही. सगळं आमच्या सोशल मिडिया मध्ये लोकप्रिय होतं.. कारण शाळा हेच आमचं समाज माध्यम होतं.. प्रभावी !!! […]

कुकर…

आज सकाळी चहा घेत बसले होते.. गॅस वर कुकर लावला होता.. या कुकर चं काय एवढं असं विचाराल.. तर हा कुकर माझ्या सासुबाईंचा अत्यंत लाडका बरं का.. 20 एक वर्ष तर नक्कीच झाली असतील त्याला..अहो बरोबरच आहे !.. आपण आपल्या कष्टाने घेतलेल्या वस्तू किंवा भेट म्हणून मिळालेली वस्तू जपून वापरतोच.. वय झाल्यावर जसे म्हाता-या माणसांचे दात त्यांना अच्छा करतात तसंच या कुकर चे स्क्रु एक एक करून याला टाटा करत करत साश्रू नयनांनी निरोपही देतात. […]

अर्थसंकल्प आणि झिपऱ्या !

झिपऱ्या आज भलताच खुशीत होता, कारण कधी नव्हे ते त्याला अनेक नेते भेटले होते, आणि त्या सगळ्यांनी त्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवून चॅनेलवाल्यांच्या माईक समोर बाईट देण्यासाठी उभे केले होते . टीव्हीच्या पडद्यावर दिसणार म्हणून तो भलताच खुशीत होता. […]

गजर…

आता गजराचं ते पारंपारिक घड्याळ जरी आपण वापरत नसलो तरी त्याचे वंशज असलेले alarm tones मात्र रोज गजर करतातंच..हा प्रेरणादायी सवंगडी असलेला ‘गजर’,  कुठल्या ना कुठल्या माध्यमातून आपल्या आयुष्यात कायम राहो व असा ‘गजर’ करत राहण्याची प्रेरणा आपल्याला सर्वांना पुनः पुनः मिळत राहो.. […]

एखादी स्मित रेषा

तसे बघितले तर स्मित व हास्य हे समानार्थी शब्द होत. स्मित हे हास्याचे सौम्य रुप झाले, ( तोंड न उघडतां, दांत न दाखवता गालांच्या थोड्याश्या हालचाली करुन ). नैसर्गिक रित्त्या  चेहर-यावर जे समाधानाचे वा आनंदाचे मंद भाव येतात ते झाले ‘स्मित ‘. हास्य किंवा हसणे हे काही विषेश कारणाने चेहेर्‍यावर  प्रकटते. विशेष कारणे जसे एखादा विनोद, कुणाची फजिती, मिळालेले यश, सहमती, कुत्सितपणा, समाधान वगैरे हास्याला कारणीभुत असु शकतात. […]

किचन गुरु!

माझ्या किचन बंदीला, मीच जवाबदार होतो म्हणा. खरेतर तो एक अपघात होता. झालं काय कि, एकदा ती कणिक मळत होती. त्याच वेळेस गॅसवरचे दूध उतू जाण्याच्या बेतात होते, आणि माझ्या दुर्दैवाने मी जवळच होतो. […]

लेखक होण्यास काय लागतं ?

तुम्हाला म्हणून सांगतो, आम्हाला ‘लेखक’ होण्याची लहानपणापासूनच मोठी हौस होती. (म्हणजे अजूनही आहेच! तसे आम्ही याबाबतीत, मराठीत चिवट, आणि इंग्रजीत ‘नेव्हर गिव्ह अप’ मधले.) पण लेखक व्हायला काय लागते? या प्रश्नाचे उत्तर शोधता शोधता, पन्नाशी कधी उलटून गेली कळलच नाही! […]

मोबाईल डॉक्टर! (माझे डॉक्टर – ५)

अशी माणसं जगात अजून आहेत. गरिबीने उच्य शिक्षण नाही मिळाले. भपकेबाज दवाखाना याने करण्यासाठी कर्जाची भानगडच केली नाही! एक बाईक, मेंदूतील वैद्यकीय ज्ञान आणि मनातील सेवाभाव! हीच त्याची इन्व्हेस्टमेंट! हा ‘मोबाईल डॉक्टर’ माझ्या आयुष्यातला सगळ्यात अनमोल डॉक्टर आहे! […]

1 2 3 4 5 17
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..