नवीन लेखन...

कर्णपिशाच्य! (माझे डॉक्टर – ४)

त्याच काय झालं होत कि, नेहमी प्रमाणे एकदा सर्दी झाली. दोन दिवसांनी कानठळी बसली! औषधाने आठवड्यात आणि बिनऔषधाने सात दिवसात सर्दी कमी होते, हा आजवरचा अनुभव होता. आम्ही या अनुभवावर विसंबून रेटून नेलं. ‘जो इतरावरी विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला!’ या युक्तीची सत्यता पटली! येथे मला माझ्या अनुभवानेच दगा दिला. कानाला ऐकू येईना! सर्दी यथाअवकाश कमी झाली. पण कानांनी आपले कार्य बंदच ठेवले. त्यात भर म्हणजे दोन्ही कानातून, म्हणजे आतूनच आवाज येऊ लागले, तेही वेगवेगळे! […]

माझे डॉक्टर – ३ – दंतकथा

दात दुखी अन कानदुखी या दोन दुखण्याचं सूर्यनारायणाशी काय वैर्य आहे माहित नाही. हि दोन दुखणी सुर्यास्थानांतर सगळं स्थिरस्थावर झाल्यावर, जेवण खाण करून अंथरुणाला पाठ टेकवली कि डोकं वर काढतात! कानातला ठणका आणि दाढेची कळ साधारण रात्री अकरा नंतर जोर धरते! का माहित नाही. आमच्या लहानपणच्या सगळ्या गोष्टी बदलून गेल्यात. पण या दोन दुखण्याच्या वेळात काडीचाही फरक पडलेला नाही! […]

माझे डॉक्टर – २

डॉक्टर आणि शिक्षकी पेशा हे दोन थोर व्यायसाय आहेत. याना नोबल व्यवसाय म्हटलं जात. माझा एक मोठा भाऊ इंजिनियरला होता. त्याकाळच्या अपेक्षेप्रमाणे एक पोरगा इंजिनियर आणि एक डॉक्टर असावा हि आमच्या घरच्यांची पण इच्छा होती. पण ‘आशा हे दुःखाचे मूळ कारण आहे!’ हे तत्व, ते जरी विसरले असले तरी, नियती विसरली नव्हती! आणि मलाच मुळात ‘शिक्षक’ व्हायचे होते! […]

शाकाहारी का मांसाहारी ?

इथ शाकाहार कि मांसाहार किंवा काय चांगल काय वाईट ? हा विषय च नाहीये. कोणी काय खाव हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे.पण एवढच सांगण आहे कि कोणाच्या दबावाखाली किंवा एखाद्या बंधनात अडकून आपल मन मारू नका .. […]

माझे डॉक्टर – १

‘डॉक्टर म्हणजे डॉक्टर असतो, तुमचा आमचा सेम असतो!’ असं कोण म्हणत? तर असं मीच म्हणतो. मंगेश पाडगावकरांनी ‘प्रेम म्हणजे प्रेम असत, तुमचं आमचं सेम असत.’ या त्यांच्या कवितेला रट्टाऊन टाळ्या दिल्या तशी दाद माझ्या वाक्याला देणार नाही हे मी जाणून आहे. कारण तुम्ही म्हणाल, ‘याला काय माहित आमचे डॉक्टर?’ हे अगदी खरं आहे. पण मला माझे काही डॉक्टर चांगलेच माहित आहेत. ते मी तुम्हाला सांगतो, मग तुम्ही तुमचे डॉक्टर त्यांच्याशी ताडून पहा. काही साम्य सापडले तर मात्र, टाळी द्यायला विसरू नका.  […]

गण्याच्या करामती

शिवापूर गांव सहयाद्रीच्या कुशीत वसलेला.वळणा वळणाच्या रस्त्यानी वेढलेल्या या गांवचा सौंदर्य काय सांगायचा. मनोहर मनसंतोष गड, रांगणा गड या सारख्या गडाच्या पायथ्याशी वसलेल्या या छोटयाश्या गांवात गणेश नार्वेकर नांवाचो व्यक्ती रहायचो. घर तसा मातयेचाच. पण नळयांनी शाकारलेला. लोक आवडीन त्येका गणो नार्वेकार म्हणान ओळखत. घरात आवशी बापाशी सोबत गणो – हवा. […]

बायको माहेरी जाणे – एक दुःखद (सुखद) प्रसंग

प्रत्येक विवाहित पुरुषाच्या आयुष्यात बायको माहेरी जाणे असे आनंदाचे प्रसंग येतात. लग्न झाल्यावर पहिल्याच वर्षी असा प्रसंग आला आणि तिला एकट्यालाच माहेरी जाणे आवश्यक असेल तर तशी (खुश) खबर बायकोच तुमचा मूड बघून अतिशय लाडीकपणे सांगते. काही वेळेस तुम्हाला देखील सोबत येण्याचे आग्रही निमंत्रण असते. तुम्हाला ऑफिसच्या कामातून सुटी मिळणे अशक्य असेल तर सूट मिळू शकते.  पण अशा वेळेस तुमच्या कौशल्याचा कस लागू शकतो. […]

चोरांची उपासमार

या लॉकडाऊनमुळे सर्व मंडळी घरातच बसल्याने कोठेच हात मारता येत नाही.सगळी घरं माणसाने भरलली आहेत.पूरा लोचा झाला आहे, भाय. […]

ती पहिली रात्र

चेरीसोबत काढलेली ती पहिली रात्र…. आठवले तरी धडधड होते. घरात सर्वांना मारे जाहीर केले की मी चेरीसोबत राहीन, तुम्ही झोपा बिनधास्त. मला वाटले रात्री ती खाली झोपेल आणि मी दिवाणावर…..एकदम सुरक्षित!!! […]

माझा व्हँलेनटाईन

आज चार पाच दिवस झाले त्याची माझी भेट झाली नव्हती. तो कुठे गडप झाला होता काही कळत नव्हते. मन खूप अस्वस्थ झाले. खरे तर मी त्याच्या नादी लागतच नव्हते. सतत माझ्यामागे भुणभुण करून त्यानेच मला नादाला लावले. त्याच्यामुळे माझे मुलांकडे आणि घराकडे होणारे दुर्लक्ष, रोजची कामे पूर्ण होऊ न शकणे आणि डोक्यात सतत त्याचेच विचार असणे […]

1 2 3 4 5 6 17
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..