नवीन लेखन...

आळस

जागतिक आळशी समूहाध्यक्ष
मंडळी सप्रे म नमस्कार !

आजचा विषय आहे आळस

आता विषयावर लिहायचं तर विषयाच्या बाजूने किंवा विषयाच्या विरुद्ध असंही लिहिता येतं ! तसं पहायला गेलं तर विरोधी पक्ष खूप सोपा ! समोरचा बोलेल , वागेल , करेल त्याला भंजय पणे विरोधच करायचा ( पक्षी : “आलू से सोना” वालं येडं ! आणि त्याचा पणा म्हणजे “सतत बिनडोक सारखं वागा—बोलायचा पण) — असा हल्ली समज आहे बाॅ ! ( हे जाणवल्यापासून मुळातंच कमी असलेली आमची बुद्धीही “ह ल ली” आहे बाॅ ! ) , पण पूर्वी असं नव्हतं , विरोध करायचा तर समोरच्याचं म्हणणं पूर्ण समजून घेऊन त्यातल्या मुद्यांना सुसंगतवार विरोध करावा लागे ! आमचं लहानपण ( शारीरीक हां ! वैचारीक अन् मानसिक रित्या आम्ही अजूनही बाल च आहोत असं आमचे सगळेच बाल , हे “बच्चे” झाले तरी आमच्या सौभाग्यवती आम्हाला म्हणतात बाॅ ! ) अशाच विचारांच्या लोकांमधे गेल्यामुळे आम्ही लगेच ठरवलं , आपण विषयाच्या बाजूनेच लिहायचं ! काय आहे , देव अक्कल वाटत असताना अस्मादिक संडासला गेलेले ( त्यात ते “लोखंडे!” ) त्यामुळे सगळं आटपून शूचिर्भूत ( मुळातंच रंगरूपाने भूत असणार्‍या आमच्यासारख्यांना पाठी शूचि: कशाला लावायचं बाॅ ??? ) होऊन देवाकडे जायला उशिर झाला.त्यात चालायचा कंटाळा , एवढ्या लांब जाताना आणि “अक्कल” आणताना भांडं मोठ्ठं कोण carry करणार ? मग हाताला लागेल ते ( त्यातल्या त्यात लहान ! ) भांडं घेऊन निघालो ! पोचलो तोवर देवाकडचा साठा संपत आलेला ! लोकं बरीच आणि माल कमी ! मग अगदी सुरुवातीला आमच्या रांगेत पुढे बरेच असलेले देशमुख , साहित्यप्रेमी “शाह” , देशपांडे , “Full” सुंदर व्यक्तींना भरभरून वाटून झाली की वो म्हणतो मी अक्कल आणि आमच्या वेळी रेशनिंग! मग जी वाट्याला आली ती घेतली चाळणीत ! त्यामुळे ती घेऊन घरी परतेस्तोवर बारीक बारीक अक्कल भोकांतून सांडत गेली ( तेंव्हापासूनंच बारकाईने विचार करण्याचा आम्हाला आळस ! ) आणि घरी पोचल्यावर जी काय उरली ती टक्कुर्‍यात मातोश्रींनी भसकन ओतली , त्या जीवावर किती उड्या मारणार आम्ही आणि किती लिहिणार ? म्हणून विषयाच्या बाजूनेच लिहायचं ठरवलं….. हुश्श ! एकदाचं विषय सोडून बरळण्याचं भुंकय भाऊत सारखं वागलं की कुणालाही सामोरे जाता येतं !

हां तर आजच्या विषयावर येतो….. ( तरी बरं , वाढदिवस २७ जुलै असल्यामुळे पण साल तेच नसल्यामुळे नांवात आद्याक्षर उ असूनही व पुढे द सामायिक असूनही ध आणि व सोडून आम्ही य जमान पद स्वीकारलं व तेवढे इर साल व जाब साल झालो नाही ! ) जान् द्ये जान् द्ये , मूळ विषय पे गाडी आन् द्ये आन् द्ये ! हां तर….. आळस

आम्ही जन्मजात आळशी ( सोमवारी रात्रीच यायचं नियोजन होतं पण आलो मंगळवारी पहाटे ! बहुदा तेंव्हापासूनंच मातोश्रींना उग्र मंगळ लागू झाला असावा ! ) पुढे आमच्याकडे बघून देवाला पण आळस आला आमचं भवितव्य लिहायचा , मग त्याने जितक्या सावकाश लिहिलं तितक्या सावकाश दैवगतीने पदरात यश पडत गेलं ! नाही म्हणायला सौभाग्यवती चांगली मिळाली व दोन चिरंजीव चांगले उपजले ( नशिब , आई वर गेले ते! ) आता बोलताना पण आम्ही हिंदी सिनेमातल्या असित सेन सारखं ( तोच तो , भरताच्या वांग्यासारखा खरपूस भाजका व काही ठिकाणी साल गेल्यामुळे पिंगट पांढरट राहिलेला चेहेरा ! ) सा s व s का s श बोलायला लागलो , तर लोक मधे मधे पेंगू लागले ( खरं तर मधेच जागे होऊन “याचं अजून बोलणं चालू आहेच का?” याची खात्री करून परत डुलक्या घेऊ लागले ! ) म्हणून आम्ही जलद बोलू लागलो तर आमचा शाह रुक , रुक खान झाला ! तेही कळेना झालं लोकांना ! मग आम्ही बोलणं सोडून लिहायला लागलो ! तर…..

हे येवरं मोठ्ठं लिवल्येलं कोन वाचनार वं ? कं जांलं कं ? येरा कुटला ! येवरं लिवत्यात कं ? न बाला , दोन सबुद खरडाव नं निंगाव तं बसलं लिवत ! आस्सं जालं ! आणि इथे पण आमचं नशिब आळस करून गेलं बघा ! आता वय वर्ष ८ ते १०० कुणालाही ज्या पुस्तकात आपल्या आवडीचं काही ना काही ( तरीच नव्हे हां ! ) तरी सापडेल असं सुविचार , कविता , उखाणे , स्केचेस , पेंटिंग्ज , लेख — व्यक्तिचित्र , ऐतिहासिक लेख , सिनेमावरचे लेख असं सगळं साहित्य तयार आहे ! पण ते पुस्तक छापायला संपादक मिळेना राव ! तो पण आळस करतोय !

एकूण काय, आम्ही केला आ ळस नशिबाचा झाला क ळस देवाला ज्याची कि ळस तो झटकावा आ ळस हे पटलंय हो , पण आता अंगवळणी पडला आळस तर कसे व्हावे तुळस बदलावसं वाटतं पण आळस आडवा येतो , आणि आपलं काही ( तरी ? ) खरं नाही हे जाणून मी पण आडवा होतो ! चला , कमीत कमी लिहावं म्हटलं तर तिथे आळस झाला नाही हे मात्र बरं झालं बाॅ !
कळावे ,

आपला आळशी मित्र, उदय गंगाधर सप्रे

-म —ठाणे
रविवार १३ आॅगस्ट २०२३ सकाळी ९.५२ वा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..