विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

हरकूळ बॅक वॉटर्स

हरकूळ बॅक वॉटर्स …. फोंडा … भिरवंडे …. सांगवे …. कनेडी परिसर … सह्याद्रीचा पायथा (राधानगरी घाट) …. तळकोकण आयुष्याच्या सायंकाळी सूर मनांतच सनईचे दूर दिगंती मृदू रंगांचे मनमोहन घन मलईचे कोण वागलें काय वाउगें त्याचा आतां विसर पडे भलें पुटा जें आलें त्याचे सडेच मागें आणि पुढें स्नेह पांगले त्या घाटांतिल उंबरठयावर गोड उषा पाणवठयावर […]

बाबाची आठवण…..

काल माझा एलएलबी च्या अंतिम वर्षाच्या निकाल लागला .सकाळ पासून मनात सारखी हुरहूर होती .कसा लागेल निकाल मी तर छान लिहिले पेपर , परवाच्या रात्रीमध्ये वाटायचं कधी निघून जाते ही रात्र.मी अधून मधून रात्रीला उठून घड्याळाचा काटा बघत होते.घड्याळाच्या बाजूने बाबाचा लागलेला स्मित हास्य असलेला फोटो पाहत .नकळत मला माझे वाऱ्यासारखी गेलेली पाच वर्षे आठवली .आजचा […]

फरिश्ता

रात्रभर ड्रायव्हिंग करून थकलेल्या रहिमने आपली टॅक्सी नेहमीच्या जागी पार्क केली. तिच्या महा.xx/०७८६ या नंबर प्लेटच्या खाली बारीक अक्षरातीत ‘फरिश्ता’ या शब्दा कडे पाहून तो समाधानाने हसला. आता रात्री नउ साडेनऊ पर्यंत निवांत होते. रहिम रात्रीच टॅक्सी चालवत असें. आज पुन्हा ‘पाव भाजी’वरच भागवावे लागणार होते.तो दगडूदादाच्या गाड्याजवळच्या बाकड्यावर विसावला. “दगडूदादा, एक पाव भाजी दे दे […]

राधानगरी घाट.. सह्याद्रीचा महासमर्थ मुलुख !

दास डोंगरी राहातो …..! राधानगरी घाट.. सह्याद्रीचा महासमर्थ मुलुख ! दाजीपूर….राधानगरीचा …. फोंडा …. भिरवंडे … हरकूळ … नरडवे … सांगवे … कनेडी …… हा सहयाद्रीच्या घाटमाथ्याचा … पायथ्याचा महा मातब्बर मुलुख …घनदाट अरण्याचा… आकाशाला स्पर्श करणाऱ्या सहयकडयांचा…कल्पनेपलिकड़े कोसळणाऱ्या पावसाचा… कडेकपाऱ्यांतून …. दऱ्याखोऱ्यातून अहोरात्र थैमान घालणाऱ्या वाऱ्याचा …फुसांडत कोसळणाऱ्या प्रपातांचा … निसर्गाच्या या सगळ्या सामर्थ्यचं प्रतीक […]

दी ग्रेट इंडियन लोकशाही सर्कस

जुन्या काळी मनोरंजनाचे सर्कस हे एक आकर्षण होते. पण काळाबरोबर सर्कस नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. पण लोकशाहीच्या कृपेने भारतीयांकरता ही सुविधा निवडणूकीच्या रुपाने आजही उपलब्ध आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणविणार्‍या लोकशाहीतील निवडणूका या सर्कसपेक्षा जरा जास्तच मनोरंजक तर असतात. रिंगमास्टर हा दिल्लीत बसून ह्या सर्कसची सूत्रे हालवित असतो. याच्या एका इशार्‍यावर बंडोबा थंड होतात. गुरगुरणारे […]

राधानगरी धरण परिसर …. डोंगरमाथा … 

राधानगरी धरण परिसर …. डोंगरमाथा … गूढरम्य …. बेलाग सह्याद्री …. ! माझ्या व्याकुळल्या मना …. नको साकळून राहू सख्या आपुल्या गतीने तू मी निरंतर वाहू …. नित्य चांगले स्मरावे .. ओखटे ते विसरावे अहंतेचे द्वाडपण नीट ओळखून घ्यावे ….. आपुली ही पायपीट येथे थोडया दिवसांची वाट पहाते पहाट सोसलेल्या अवसांची …. साकळलेपणामुळे विष प्रसवते जिणे […]

मन एक पाखरू

मन …….मन ही खूप कोमल भावना आहे ,जी प्रत्येकाच्या अंतःकरणात वसलेली आहे.मन हे भणभंनाऱ्या वाऱ्यासारखे , असंख्य प्रश्नासारखे,सागराच्या उफनत्या लाटांप्रमाणे उठणार्‍या भावना लहरी…… मन कधी अनेक समस्यांचे तुफान….. […]

किस्सा रघ्याचा !

दुपारची उन्ह करकर तापली होती. रेल्वे स्टेशनच्या दादऱ्याखाली, ते दोन मळक्या, फाटक्या कपड्यातले भिकारी सावली धरून बसले होते. नुकतीच बाराची प्यासिंजर निघून गेली होती. ‘धंद्याच्या’ दृष्टीने त्यांचा हा ‘भाकड’ पिरेड होता. त्या मुळे ते दोघे ‘सुख -दुःखाच्या’ गप्पा मारत असावेत असे, पहाणाऱ्यांना वाटत होते. आणि ते खरे हि होते. ज्यास्त कमाई(विना सायास ) म्हणजे ज्यास्त सुख हे त्यांच्या जीवनाचे सूत्र होते! हाच त्यांच्या गप्पांचा विषय पण होता.  […]

1 2 3 4 5 154