नवीन लेखन...

कोकण प्रभा

चुलिसमोर , ती पेटवताना बूड टेकण्यासाठी बहुदा एका बाजूचं पावकं उडालेला फळकुटवजा लहानसा सागवानी पाट, फुटभर अंतरावर झाकणाला भोक पाडलेली काचेची छोटी रॉकेलची बाटली. हीचा मान मोठा. […]

हतबल …. भाग दोन

इस्पितळातून तेथील ड्यूटी कॉन्स्टेबलचा पोलिस ठाण्यात फोन येतो. हवालदार मेसेज रीतसर लिहून घेऊन ड्यूटी ऑफिसरला थोडक्यात सांगतात . ” सर, xxxxxx हॉस्पिटल मधून डेथ बिफोर अँडमिशनचा मेसेज आहे .”ड्यूटी ऑफिसर मेसेज वाचतो . पोलिस स्टेशन डायरी मधे , त्याच्यासोबत जात असलेल्या हवालदारांचा बकल क्रमांक नमूद करून ” xxxx इस्पितळात रवाना ” झाल्याची नोंद करतो आणि तातडीने […]

हतबल भाग – एक.

नाईलाजाने ड्यूटी ऑफिसर त्या मॅडमची चोरीची फिर्याद लिहून घ्यायला सुरुवात करतो. त्याच वेळी डीटेक्शन स्टाफचे एक हवालदार आणि महीला पोलिस यांना जीपने मॅडमच्या सोसायटी कडे त्या कामवाल्या बाईना आणण्यासाठी रवाना करतो. ज्या घरात त्या बाई काम करत असतात त्या घराकडे सिक्युरीटी वॉचमन पोलिसांना घेऊन जातो. […]

चण्याची पुडी

माझे मन आहे चण्याची पुडी जड विचारांची तळाशी बुडी भरले आहेत चणे फुटाणे तेच चव साधती साधेपणे मावत नाही काजू अक्रोड कशास हवी ती डोकेफोड ? लांब ठेविले बदाम मनुके यास्तव मन हे हलके फुलके चणा वाटतो आपलाच सहज बाकी भासती किंमती ऐवज नको बेदाणे खारीक पिस्ते तेच घडविती विवाद नस्ते चघळत बसतो एक चणा मुरवत […]

गोळी ….

मुंबईतील घाटकोपरच्या पूर्वेला असलेला गारोडिया नगर हा भाग पहिल्यापासूनच उच्चभ्रू गुजराथी समाजाचा. प्रामुख्याने केमिकल्स चे कारखानदार , हिरे , किंमती खडे याचे व्यापारी यांची निवासस्थाने असलेला. फेब्रुवारी १९९० मधे या परिसरातील इमारतीमध्ये पाचव्या मजल्यावर राहणाऱ्या एका वृद्ध जोडप्याला राहत्या घरात लुटल्याची घटना घडली. […]

बंदा.

टॅक्सीत बसल्यावर त्यांचा संवाद कोणत्या तऱ्हेचा असे हे चौकशीअंती कळल्यावर एक अनुमान काढता आले की आरोपी एकमेकांना पूर्वीपासून ओळखणारे होते. लुटीनंतर टॅक्सी जिथे सोडून दिली जात होती तिथपासून घरापर्यंतचे अंतर चालत जाण्याइतपत किंवा तेथून दुसरी टॅक्सी केली तरी कमीत कमी मीटर रिडिंग होईल इतक्या अंतरावर आरोपींची निवास स्थाने असावीत असाही आमचा होरा होता. […]

मनमवाळ

फार वर्षांपूर्वी नायर हॉस्पिटलच्या मागे “लाल चिमणी कंपाऊंड ” मधे असलेल्या मोकळ्या जागेत एका गोडाऊन शेजारी युनुसभाईंचे गॅरेज होते. गोडाऊन च्या भिंतीला बसवलेले लोखंडी स्टँड, त्यावर गाड्यांचे छोटे सुटे भाग , हातोड्या , पान्यांचे खोके आणि गॅरेजचे इतर सामान लावलेले. […]

शिक्का

पोलिसदल कायद्याने रीतसर स्थापन होण्या पूर्वी म्हणजे १८६१ पूर्वी संस्थानिक आणि राजे रजवाड्यांच्या काळात त्यांनी नेमलेले कोतवाल पोलिसाचे काम बजावत असत. कोतवालांचे इमान हे निव्वळ त्यांच्या स्वामींशी . न्यायी राजांचे काही मोजके अपवाद सोडले तर बाकी सगळ्यांचा लहरी कारभार. त्यांच्या लहरी सांभाळणे हेच त्या कोतवालांचे आणि त्यांच्या दलाचे मुख्य काम . […]

खळगी

अटक स्त्रीला आपल्याला अटक झाल्याबद्दल सोयर सुतक काहीही नसे. आपण उघड्यावर पडलो नाही यावरच ती समाधानी. दिवसभरात जामिनावर कोणीतरी सोडवायला येइल याची तिला खात्री असायची.
त्यावेळी स्त्री अरोपींसाठी कुर्ला पोलिस ठाण्यात पोलिस कोठडी नव्हती. […]

तिबोटी खंड्या

बाहेर प्रथमच आलेल्या पिल्लाचा फोटो काढण्याची संधी मिळेल या आशेने जोर धरला. आणि काय आश्चर्य …! घरट्याच्या बिळाच्या तोंडाशी निळसर पिवळी चोच डोकाऊ लागली. प्रथमच बाहेरचे जग पाहणारे बावरलेले डोळे दिसले. […]

1 2 3
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..