नवीन लेखन...

उत्कट

मुंबईतील गर्दी हा “मुंबई शहर” याविषयामधील एक अटळ मुद्दा आहे. दक्षिण मुंबईतील व्यापारी भागात तर दिवसा चालता येणं मुश्किल होते इतकी गर्दी असते. अशा भागात दिवसा वाहनांचे किरकोळ अपघात सतत घडत असतात. मजेची बाब अशी की रविवारी त्याच रस्त्यावर “तरुण मुले क्रिकेट खेळून दंगा करत आहेत” अशा तक्रारीही पोलिसांकडे येतात. गर्दी आली की त्या अनुषंगाने येणाऱ्या गुन्ह्यांचे आणि घटनांचे प्रकारही आलेच. पाकिटमारी, बॅग खेचून पळुन जाणे, कपडयावर घाण टाकून धुण्यासाठी मदत करावयाच्या बहाण्याने बाजूला नेणे आणि बॅग खाली ठेवून आपल्या शर्टावरची घाण धुण्यात दंग असलेल्या मालकाला घाणी बरोबरच आपली बॅगही नाहीशी झाल्याचा दृष्टांत होणे हे नित्याचेच. […]

विकृती

दुसऱ्यावर हल्ला करत त्याला जखमी करताना एखाद्या गुन्हेगाराने क्रौर्याची परिसीमा ओलांडण्याचे प्रकार पोलिस अनेक वेळा पाहतात.विशेषतः जातीय दंगलीमध्ये त्याचे जास्त अनुभव येतात. मात्र समोरच्या व्यक्तीच्या दुबळेपणाचा फायदा घेऊन तिचा सातत्याने छळ करत राहणे ही विकृतीच. त्यातूनही एका स्त्री स्वभावात तिचे दर्शन होणे हे आणखी क्लेशदायक. १९९८ मधे दक्षिण मुंबईतील लोकमान्य टिळक मार्ग पोलिस ठाणे येथे नेमणुकीस असतानाची ही कथा. […]

आई ती आईच – भाग एक

सर्व पिल्ले बाहेर येताच त्यांच्या आईने भर दुपार असून,सर्व प्रथम आपले पंख पसरले. सारी पिल्ले पंखाखाली दाटीवाटीने शिरली. आईने त्यांना पंखात घेतले. जमिनीवर खाली बसून आपली उब देऊन “मी आहे बाळांनो, मी आहे” असा विश्वास दिला. दोन चार मिनिटे तशीच राहून नंतर उठली आणि पिल्लांचा चिवचिवाट आपल्याभोवती वागवत चरायला निघाली. […]

रि युनियन

संध्याकाळी एका हॉलमधे जमून, आमच्यातील वयाने सर्वात ज्येष्ठ आणि सर्वात लहान अशांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमास सुरुवात झाली. सर्वप्रथम दिवंगताना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर आमच्या बॅचमधील एकूण तिघांपैकी, जे PSI झाल्यावरही पुढे स्पर्धा परीक्षा देऊन, आय पी एस होऊन Additional Director General of Police या अतिउच्च पदावरून निवृत्त झाले, त्यापैकी उपस्थित दोन, त्याचप्रमाणे बॅचमधील पदक विजेते अधिकारी, यांचा छोटेखानी सत्कार करण्यात आला. त्यानंतर हॉटेलच्या lawn वर टेबल्स लाऊन snacks, Karaoke, गप्पा, थट्टामस्करी, रात्रीचे जेवण इ. ११.३० पर्यंत चालले. […]

अपना इंडिया

सन २००५ आणि २००६ या कालावधीत ठाण्यातील नौपाडा पोलिस ठाण्याचा प्रभारी अधिकारी म्हणून नेमणुकीस असताना या शहराचा गाभा माझ्या अधिकार क्षेत्रात मोडत होता. रेल्वे स्टेशन ला लागून असलेला बी केबिनचा भाग, ब्राह्मण सोसायटी, भास्कर कॉलनी, गोखले रोड, राम मारुती रोड, तलावपाळी,पाच पाखडी, चंदन वाडी, खोपट, चरई, उथळसर, कोलबाड इ. इ. […]

1 2 3 4
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..