नवीन लेखन...

तेथे पाहिजे जातीचे

१७ व्या मजल्या वरील गच्चीच्या अठरा फूट उंचीच्या वीस वर्ष जुन्या ग्रीलच्या गंजलेल्या शिगा घासून साफ करणे , जास्त गंजलेले आडवे पाइप कापून काढणे , नवीन पाईप वेल्डिंग करून बसवणे आणि सगळ्याच ग्रील्स प्रथम प्रायमर मारून नंतर रंगवणे इत्यादी अत्यावश्यक कामे पावसाळ्यापूर्वी करून घेण्यासाठी अनेक स्थानिक फॅब्रिकेटर्सना मी संपर्क केला होता .

इतक्या उंचीवर चढण्यासाठी आधी शिडी किंवा बाबूंच्या परांची बनवून घ्याव्या लागेल असे जवळ जवळ प्रत्येकाने सांगीतले. म्हणजे मूळ कामाच्या खर्चा पेक्षा त्याच्या तयारीचा खर्च जास्त. एका फॅब्रिकेटर कडे पूर्वी काम केलेले दोन बिहारी तरुण छुट्टन आणि अफरोज योगायोगाने एका हार्डवेअर स्टोअर मधे भेटले. त्यांनी एकदाच येऊन काम समजाऊन घेतले , मापे घेतली , लागणाऱ्या नवीन सामानासाठी मोजकीच आगाऊ रक्कम घेतली आणि अनेक महिने प्रलंबित काम त्यांनी लिलया करून दिले.

जेवणाच्या वेळेव्यतिरिक्त जराही उसंत न घेता त्या दोघांनी इतके व्यवस्थित काम केले की त्यांचे कौतुक वाटले.

खरोखर , आत्मविश्वास आणि कष्ट करण्याची तयारी हीच यशाची गुरकिल्ली. मला उगीचच माझ्या बागेत गेल्या महिन्यात एका रविवारी मजुरी करण्यासाठी आलेल्या स्थानिक वयस्क जोडप्याचा काहीही न करणारा तरुण मुलगा , एका स्थानिक राजकीय नेत्याने स्पॉन्सर केलेल्या क्रिकेट मॅचमधे खेळायला जाण्यासाठी मित्राच्या मोटर सायकल वर येऊन आईकडून पेट्रोल साठी पैसे घेऊन गेला , ते आठवलं…..

अजित देशमुख
(नि) अप्पर पोलीस उपायुक्त,
9892944007
ajitdeshmukh70@yahoo.in

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..