आज फिर जीने की तमन्ना है
“आज फिर जीने की तमन्ना हैं, आज फिर मरने का इरादा हैं.” बाल्कनीतल्या झोपाळ्यावर बसून पावसाला बघत कॉफी पिताना ती गुणगुणत होती. चाळीशी गाठली होती तिने गेल्याच आठवड्यात; पण तसं कोणतंच लक्षण तिच्या अंगभर कुठेही दिसत नव्हतं. […]
विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…
“आज फिर जीने की तमन्ना हैं, आज फिर मरने का इरादा हैं.” बाल्कनीतल्या झोपाळ्यावर बसून पावसाला बघत कॉफी पिताना ती गुणगुणत होती. चाळीशी गाठली होती तिने गेल्याच आठवड्यात; पण तसं कोणतंच लक्षण तिच्या अंगभर कुठेही दिसत नव्हतं. […]
महाराष्ट्राचे जे चार काल्पनिक भाग मानले जातात, त्यात पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भ या भागांचा समावेश केला जातो. या चारीही विभागांत अनेक मान्यवर कवी, साहित्यिक, वाङ्मयकार, वक्ते यांची फार मोठी मांदियाळी आहे. आज सुरेश भट या मान्यवर वैदर्भीय कवि-गझलकार यांच्या कामगिरीचा ताळेबंद मांडताना त्याच विदर्भातल्या कवी अनिल, (आर. रा. देशपांडे), कुसुमताई देशपांडे, ग. ल्यं. माडखोलकर, प्राचार्य राम शेवाळकर, मधुकर केंचे, पु. भा. भावे अशा किती तरी नामवंत साहित्यिक वाङ्मयकारांची नावं नजरेसमोर येतात. या नावांमध्ये ठसठशीतपणानं दिसणारं एक नाव म्हणजे सुरेश भट. […]
थंडी खूपच पडली होती. संध्याकाळच्या वेळेस तर बाहेर पडणे शक्यच नव्हते. घरांतील बाहेरची कामे सकाळीच उरकून टाकण्याची आता सवयच झाली होती. गेले दोन महिने थंडीने कहरच केला होता. भाजी आणण्यासाठी सुद्धा उन्हाच्या वेळेत जाणे भाग पडत होते. एकतर अशा कडाक्याच्या थंडीत उन्हात चालायला मजा येते. दुपारच्या वेळेस तर रहदारीही कमी असते. त्यामुळे जरा आजूबाजूला नजर ही टाकता येते. […]
‘जिंदगी’ एक रेस है रफ्तार के सिवा कुछ नही. आपल्या सगळ्यांची जगण्याची ही एक पध्दतीच झाली आहे. आयुष्यभर या रेस बरोबर आपण धावतच असतो. आला दिवस गेला दिवस रुटीनच्या नावाने फक्त जगतच असतो. काही कारणांनी या रुटीनमध्ये जेव्हा खंड पडतो किंवा बदल होतो तेव्हा लक्षात येते की अरे त्या रेस बरोबर आपण धावत पळत कुठपर्यंत पुढे निघून आलो. […]
12/12/12/12/12 बारा हा जुन्या लोकांचा प्रिय अंक… मोजण्यासाठी द्वादशमान पध्दती… १२ ची फूट म्हणजे १२ इंच एक डझन म्हणजे १२ नग. वर्षाचे महिने १२, नवग्रहांच्या राशी १२ गुरू, शनी, मंगळ हानिकारक समजले जातात… १२ वे तप… १२ वर्षाचे, गुरुगृही अध्ययन… १२ वर्षे घड्याळात आकडे… १२, दिवसाचे तास… १२, रात्रीचे तास… १२, मध्यरात्र म्हणजे रात्रीचे… १२ मध्यान्ह […]
नुकताच आमच्या अहोंच्या ‘बायपास’ नंतर हा चालू झाला. आमच्या दोघांच्याही मनावर भयंकर भीतीचे दडपण होते. ऐन उन्हाळ्याचे दिवस सकाळी उठून देवाचे नाव घेऊन आम्ही आपले निघालो. पहिल्याच दिवशी सोसायटीच्या गल्लीतले कुत्रे ‘भसाभसा’ भुंकत अंगावर आले. ते ही बिचारे काय करणार? रात्रभर गल्लीचा पहारा देऊन थकले असावे किंवा कायम गाडीतून जाणारी माणसं त्याच्या रस्त्यावर अतिक्रमण करायला आली असे बहुतेक त्याला वाटले असावे. […]
पंतांच्या निग्रही चालण्याकडे पाहणारे इन्स्पेक्टर शर्मा एकदम दचकले . त्यांना पंतांचे शब्द आठवले . ” ब्रेन रॉटची शिकार …” […]
ब्रेन रॉट पासून समाजातल्या सर्वांना वाचवायचं असेल तर ही कथा मालिका सर्वांनी वाचायला हवी आणि नावासह सर्वत्र पाठवायला हवी . आपल्याला एका भयंकराशी सामना करायचा आहे , याची जाणीव असो द्यावी . […]
सदैवी आनंदी, शेवटी दुखण्यातही आपल्या वेदना, दुःख काळजी कधीही तीने दाखविली नाही. मला आठवते तीच्या पहिल्या किमोच्या वेळेस मी आणि शुभा दवाखान्यात गेलो होतो. माधुरी आमच्याशी इतकी हसून गप्पा मारीत होती की आम्ही तर विसरूनच गेलो की आपण कशाला इथे आलो ते. प्रीतीने तर कमालच केली होती भरपूर चहा बिस्किटस् खाकरे घेवून चार वाजता kitty पार्टीसारखी हजर होती. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions