नवीन लेखन...

यश हेच चलनी नाणे (मनोगत)

‘यश हेच चलनी नाणे’ ह्या पुस्तकातील दिलीप ठाकूर ह्यांनी लिहिलेले मनोगत


चित्रपटाच्या जगात यशासारखे महत्वाचे आणि सुंदर अथवा मोलाचे असे काहीही नाही. तो ‘सेन्ट्रल पॉईंट’ (लक्षवेधक गोष्ट) आहे. अर्थात, सगळेच चित्रपट, सगळेच कलाकार यशस्वी ठरतात असे अजिबात नाही. फ्लॉप होणारे चित्रपट, तसेच चित्रपट यशस्वी न ठरल्याने अथवा नशिबाची म्हणावी तशी साथ न मिळाल्याने अपयशाचा सामना करावे लागलेले अनेक चेहरे यांच्या गोष्टी/ कथा/ किस्से/ आठवणी/ दंतकथा खूप आहेत. काही तर चकीत करतात. त्यातून काही शिकता येते.

पण आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीला कोणत्याही क्षेत्रातील यशोगाथा ( सक्सेस स्टोरी) अधिकाधिक प्रमाणात जाणून घेण्यात विशेष रस असतो. आपण आपल्या क्षेत्रात यशस्वी वाटचाल करावी असे त्यांचे ध्येय असते, ‘एकच लक्ष्य’ असते आणि म्हणून ते इतर यशोगाथांपासून काही शिकता येईल, काही टिप्स मिळतील, माहिती मिळेल अशा आशेवर असतात. आणि ते मग यशस्वी चित्रपट, बड़े स्टार यांच्या यशोगाथांमधूनही कळत नकळतपणे काही ना काही गोष्टी शिकू शकतात. बरेच काही जाणून घेऊ शकतात. हे जाणून घेऊनच हे माझं नवीन पुस्तक ‘यश हेच चलनी नाणे’ आपल्या समोर घेऊन आलो आहे. यात काही मोठ्या स्टार्सच्या वयाची पंचाहत्तरी, काही स्टार्सच्या कारकिर्दीची पन्नास वर्षे, काही चित्रपटांना पन्नास अथवा पंचवीस वर्षे पूर्ण अशा निमित्तानेचे लेख आहेत. अर्थात, हे पुस्तक आपल्या हाती येईपर्यंत त्यात एक दोन वर्षांची वाढ झाली असली तरी मूळ वाटचाल कायम आहे आणि विशेष कौतुकाची आहे.

अगदी साकी नाकाजवळील चांदिवली स्टुडिओला ऐंशी वर्षे पूर्ण झाल्यानिमित्तानेही लेख आहे आणि दक्षिण मध्य मुंबईतील अप्सरा, मिनर्व्हा या चित्रपटगृहांवरही लेख आहे. तसे करताना विषयांत विविधता यावी असाच सकारात्मक दृष्टिकोन आहे. या सगळ्याची तयारी होत असतानाच दिलीप कुमारचे दुःखद निधन झाले. त्यांच्या दीर्घकालीन कारकिर्दीवर फोकस टाकणारा लेखही या पुस्तकात आहे. हे सगळे लेख मी मागील दोन वर्षात विविध ठिकाणी लिहिले आहेत. त्याचाच हा संग्रह आहे. पण ते करताना या लेख आणि माहितीला सर्वकालीन मूल्य आणि वाचनीयता आहे अथवा असावी याची विशेष काळजी घेतली आहे.

माझी आजपर्यंत छोटी मोठी मिळून बरी वाईट अशी चाळीसपेक्षा जास्त पुस्तके प्रकाशित झाली असली तरी आजही मला माझ्या प्रत्येक नवीन पुस्तकाच्या वेळी थोडीशी धाकधूक, थोडीशी उत्सुकता, थोडेसे कुतूहल नक्कीच असते.

माझ्या सिनेपत्रकारीतेचा सगळा भर मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीच्या विश्वात विविध कारणास्तव भटकंती करणे ( नवीन चित्रपटाचा मुहूर्त, शूटिंग रिपोर्टीग, प्रीमियर, पार्टी यातून वावरणे), लहान मोठ्या भेटीगाठी ( लहान मोठे स्टार तर झालेच पण या माध्यमातील सर्वच प्रकारचे तंत्रज्ञ तसेच वितरक, प्रदर्शक यांना भेटत राहणं, कमी अधिक प्रमाणात संवाद साधणे) आणि निरीक्षण यावर माझा सगळा भर आणि फोकस असल्याने पुस्तकांबाहेरचे, आजच्या युगात गुगलबाहेरचे जग आणि माहिती मला आहे. त्याचा प्रत्यय माझ्या पुस्तकातून येतोच.

माझ्या यादेखील पुस्तकाचे वाचकांकडून मनापासून स्वागत होईल, दाद मिळेल याचा पूर्ण विश्वास आहे.

दिलीप ठाकूर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..