नवीन लेखन...

रानवा

या दीर्घ कथासंग्रहात , रानवा , लेक टॅपिंग आणि चंद्रखुणा अशा तीन दीर्घ कथा आहेत . त्या सर्वांची पार्श्वभूमी कोकणची आहे .

रानवा

प्रत्येक आंदोलन हे राजकीयपक्षाना आपापली किंमत वसूल होई पर्यंत महत्वाचं वाटत असतं. प्रत्येकाची बोली असते.टार्गेट असतं. ते पूर्ण होईपर्यंत आंदोलन ताणलं जातं. गुहागर, लोटेमाळ, जयगड, रत्नागिरी, जैतापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यात येणारा रिफायनरी प्रकल्प…कुठेही जा, प्रत्येक जण आंदोलनाच्या माध्यमातूनओरबाडून खात असतो. आणि यात बळी कुणाचा जातो तर कार्यकर्त्यांचा, गावकऱ्यांच्या जमिनीचा आणि भावनांचा, त्यांच्या अस्तित्वाचा . त्यांच्याबद्दल कुणाच्याही मनात दुःख नाही.इथला निसर्ग, इथली माणसं, इथली संस्कृती, इथला एकोपा ,इथली जलचर, भूचर असणारी प्राणी सृष्टी.. सगळं शोषून घेऊन पुन्हा दुःखावर डागण्या देणाऱ्या आणि शोषलं जाणाऱ्या सर्वांची ही कहाणी .

लेक टॅपिंग

कोयना जलाशयाच्या तळाशी साडेसात मीटर व्यासाचा , सहा मीटर जाडीचा खडक फोडून छिद्र पाडून पाण्याचा अंतर्गत ओघ वळवण्यासाठी साठी करावी लागणारी व्यवस्था म्हणजे लेक टॅपिंग . जलाशयाला खालून छिद्र पाडणे सोपे नाही . वरचा खडक , त्यावर पाण्याचा प्रचंड दाब सहन करत स्फोटाची तयारी करायची .आणि हे काम करताना कौटुंबिक , सामाजिक , राजकीय आणि नैसर्गिक ताणतणावाना तोंड द्यायचं .तेही अत्यंत शांतपणाने . हे सोपं नव्हतं . इंजिनिअर असणारा एम आर , पत्रकार सुशांत , त्यांचे नातेवाईक आणि परिस्थितीचा कठीण खडक . या सर्वांतून मार्ग काढून चिपळूण जवळच्या कोयना भागातील शिवसागर जलाशयाच्या लेक टॅपिंगची हकीगत सांगणारी ही कथा .

चंद्रखुणा

कोकण रेल्वेचं काम सुरू असताना खचलेल्या बोगद्यात अडकलेल्या शंकरला वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या कामगारांची, शंकराच्या बायकोची गौरीची, मुर्दाड कंत्राटदारांची, त्यांना धडा शिकवणाऱ्या गावकऱ्यांची आणि शासनव्यवस्थेतील त्रुटींमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची ही कहाणी .

अखेर सर्वांच्या प्रयत्नांना यश कसे मिळते कोकणच्या विकासाच्या चंद्रखुणा कशा कुठे जाणवतात हे सांगणारी ही कहाणी . या संग्रहाला रानवा हे शीर्षक मुद्दाम ठेवलं . रानवा म्हणजे ज्या भूमीवरच्या निसर्गाला माणसाचा स्पर्श झालेला नाही अशी भूमी.

निसर्गाचं स्वप्न म्हणजे रानवा !

सृष्टीचं चैतन्य रूप म्हणजे रानवा !

अखंड, अविरत चैतन्य म्हणजे रानवा !

…आणि मानवाच्या अस्तित्वाने उद्ध्वस्त झालेलं रूप म्हणजे रानवा !

पर्यावरणीय विकासाचा लेखाजोखा अधोरेखित करणाऱ्या या तीन दीर्घकथा.

स्थित्यंतराच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या घटना, सामाजिक अडसर, अभिव्यक्तीची आणि जगण्याची होणारी मुस्कटदाबी , राजकारण्यांचा , त्यांच्या कार्यकर्त्यांचा , त्यांच्या गुंडांचा वाढता हस्तक्षेप , बोथट होणारी संवेदनशीलता आणि तरीही अशा स्थितीत दुर्दम्य, सकारात्मक आशावाद घेऊन जगणारी माणसं, हा या कथांचा विशेष !

पर्यावरणीय विचार हा सकस आणि समृद्ध होण्यासाठी घातलेली साद म्हणजे हा भाषिक आविष्कार…

राजकारण्यांचं , सामान्य माणसांचं आणि हो , निसर्गाचं सुद्धा मानस समजून घ्यायचं असेल तर रानवातील कथा वाचायला हव्यात . हे पुस्तक , बुकगंगा वर उपलब्ध आहे .
———-
– डॉ. श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी .

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 150 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..