जास्त बोलले तर उद्घट
कमी बोललं तर शांत
जास्त हसले तर उनाड
कमी हसले तर संस्कारी
हे सगळं सांभाळून घ्यायचं असतं
मुलगी होणं इतकं सोप्प नसतं…
स्वावलंबी बनले तर गर्विष्ठ
अवलंबून राहिलं तर अबला
स्वतःच्या पायावर उभं राहिलं तर अभिमान
स्वप्न कवटाळून बसले तर बंधन
हे सगळे सांभाळून घ्यायचं असतं
मुलगी होणं इतकं सोप्प नसतं…
मनाप्रमाणे वागलं तर स्वैर
समाज नियमानुसार चाललं तर प्रेरणा
पुरुषप्रधानतेला धक्का लावला तर अहंकारी
खूंटीला बांधून राहिलं तर मर्यादा हे सगळं सांभाळून घ्यायचं असतं
मूलगी होणं इतकं सोप्प नसतं…
लेखकाचे नाव :
sayali pandurang jangale
लेखकाचा ई-मेल :
sayalijangale1108@gmail.com
Leave a Reply