नवीन लेखन...

कोण जिंकलं…..!

युद्ध संपलं…
शत्रूवर विजय मिळाला…
सगळीकडे फटाके… जल्लोष…
चार दिवस सगळेच ‘विजयोत्सव’ साजरा करतील…
नेताजी मंचावर उभे राहून घोषणा देतील –
“हे आपल्या पराक्रमी सैन्याचं यश आहे!”
…आणि त्या यशाचं भांडवल करून
निवडणुकीची रणधुमाळीही जिंकतील!
आणि डिप्लोमॅटीक जगात रमतीलही……!

पण…
तिकडे, एखाद्या दूर, दुर्लक्षित गावात…
वृद्ध आई वडील–
डोळ्यांत आसवं, हातात फोटो घेऊन….
विरपुत्राच्या आठवणीत हरवलेली
दुचीत बसलेली आई……
अन् सोललेल्या खावंदावर शहादत मलम लेपुन,
शून्यात नजर लावून बसलेले वडील…….!

एक अनाथ मुलगा –
बाबांच्या कुशीत खेळण्यासाठी रडतोय,
तळमळतोय…..
आईला वारंवार विचारतोय….
“बाबा कधी घरी येणार …!”
“मला त्यांच्या कुशीत खेळायचं” म्हणतोय…..
पण ती कुशी तर आता फक्त आठवणीतच उरली आहे…

…आणि ती,
ती वीरपत्नी –
जिचं कुंकू उजडलंय…
भकास जिनगीचे चटके अंगावर सहन करत….
ती जिवंत मरण जगते आहे,
कधीही न भरावं असं दुःख घेऊन…

आपण?
आपणही चार दिवसात त्यांना विसरून जाऊ,
फेसबुकवर “जय जवान” लिहून पुढची पोस्ट पाहू…!

पण एक प्रश्न तसाच उरतोच…
हो, त्यांनी मातृभूमी वाचवली…
ते लढले आपल्यासाठी….
त्यांनी शौर्यही गाजवलं…
…पण
” कोण जिंकलं हो ?”

©गोडाती बबनराव काळे, लातूर
9405807079

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..