नवीन लेखन...
Avatar
About डॉ.धोंडोपंत मानवतकर
डॉ.धोंडोपंत मानवतकर एम.ए.मराठी, पीएच्.डी.जी.डी.आर्ट, व बॅचलर ऑफ जर्नालिझम. कवी, लेखक, गीतकार, पत्रकार, संपादक, चित्रकार, समीक्षक, प्रकाशक आहेत. त्यांच्या नावे चार कवितासंग्रह व दोन संपादित अशी एकूण सहा पुस्तके प्रकाशित असून ते वृतपत्रासाठी सामाजिक विषयावर प्रासंगिक लेखन तसेच पुस्तक परीक्षण व काव्यलेखन सातत्याने करत असतात. दोन वेळा आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून काव्यवाचन व परिसंवादात सहभाग. अनेक कविसंमेलनात सहभाग. अनेक कविसंमेलनाचे अध्यक्षपदही भूषविले आहे. साहित्य शिरोमणी या त्रैमासिकाचे ते संपादक राहिले आहेत. सध्या आविष्कार साहित्य मंडळाचे ते अध्यक्ष असून औरंगाबाद येथे शब्दभूमी पब्लिकेशन चे प्रकाशक आहेत. ते औरंगाबाद व मंठा येथील समाजभूषण या पुरस्काराने सन्मानित आहेत.

पाऊस दाटलेला डोळी

  देह चिंब-चिंब ओला, पाऊस दाटलेला डोळी भिजलेल्या गौरदेही, आरस्पानी ही काचोळी   पावसाळी ऋतु  जणू ,  मेघ मल्हाराची  ताण माती मुल्खाची सुग्रण,पावसाच्या ओठी गाणं   डोळे  भरले  नभाचे,  धरणीच्या  प्रीतिपोटी खुळ्या पावसाची प्रीत,रानपाखरांच्या ओठी   नदी, नाले  आळविती,  पशु-पक्ष्यांची  तहान वृक्ष वल्लरीच्या देही, पहिल्या पावसाची खूण   अरे, पावसा पावसा, आम्ही गातो तुझी गाणी असा […]

प्रिय, हा कण गॉड पार्टिकल आहे

कवयित्री आशा अशोक डांगे यांचा ” प्रिय, हा कण गॉड पार्टिकल आहे’ हा दुसरा कवितासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. या अगोदरच्या ‘परिघाबाहेर’ या काव्यसंग्रहातील कविता अभ्यासकांच्या व वाचकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. […]

मेघ मल्हाराचे सूर

आसावली काळी माती, ऊरी वैशाख सलतो नभ निथळते खाली, गंध चौखूर फुलतो मृग,रोहिणीच्या गाली, जुन्या श्रावणाच्या खुणा अंग आषाढी नभाचे, ओढ पावसाची पुन्हा चिंब रानाला झोंबली, श्रावणाची सळसळ आज मुरल्या मातीनं, किती सोसलेली कळ निळ्या नभाच्या डोळ्यात, पुन्हा मातीसाठी पाणी रानपाखरांच्या ओठी , खुळ्या पावसाची गाणी मेघ मल्हाराचे सूर, कोण आळवितो ताणे शब्द सुरांनी छेडले, नभ […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..