नवीन लेखन...

व्यक्तिमत्व घडविणार्‍या सुट्ट्या आवश्यकच आहेत

शाळा सुटली पाटी फुटली मध्यें  जो आनंद आहे ,तसेच सांग सांग भोलानाथ, शाळेभोवती तळे साचेल काय ,शाळेला सुट्टी मिळेल काय या सगळ्या कल्पना म्हणजे विद्यार्थ्यांच्या आनंदाचे परिमाण आहेत. आई मला पावसात जाऊ देना, श्रावणमासी हर्षमानसी, हिरवे हिरवे गार गालिचे , मामाच्या गावाला जाऊया, पळती झाडे पाहूया मामा मोठा तालेवार,  मामी मोठी सुगरण अनुभवायला सुट्ट्या हव्यातच.सुटटीला,माया, शिस्त यांची साथ मिळाली तर त्यातून आनंदच पेरला जातो. शाळेचे तास थोडे कमी झाले तर काही होत नाही. शाळेपेक्षा, निसर्ग माणसे यात मुले घडतात, शिकतात.

सुट्टीचं सृर्जनात्मक नियोजन व्यक्तिमत्व घडवतं.

मना विरुद्ध कोणी शिकू शकत नाही. प्रत्येकाची शिकण्याची एक गती असतें. ज्यांचा अभ्यास झाला आहे त्यांना परत कशासाठी बोलवायचं?

आमच्या शिक्षणात अध्ययन आहे पण मनन चिंतन कोठे आहे? सुट्टीत शिक्षक कोणत्या प्रकारची पूर्व तयारी करता असा आक्षेप  घेतला जातो. सुट्टीच्या काळात शिक्षक अवांतर वाचनाच्या माध्यमातून, प्रसारमाध्यमांच्या मधून काही  शिकत असेल व त्याचा उपयोग अध्यापनात नक्कीच करत असेल, टीव्ही च्या कार्यक्रमातून सुद्धा जे जे त्यांच्या पाहण्यात येतं त्याचे विश्लेषण करून विद्यार्थ्याला माहिती देण्यात जर भर पडत असेल तर काय  वावगे आहे?

सुट्टीतील विद्यार्थ्यांचे व शिक्षकाचे निरीक्षण हे फायद्याचेच ठरू शकतें. पाठ्यपुस्तक व बंदिस्त शाळा तसेच साचेबद्ध अभ्यासक्रम याच्या व्यतिरिक्त सुट्टीत जेजे शिकलें जाते त्यानेच व्यक्तिमत्व घडते. पूर्वी माणसें शाळे मूळें ओळखली जायची.आता शालाबाह्य गोष्टीमुळे त्यांना ओळख मिळत आहे. सचिन तेंडुलकर ला क्रिकेट मुळे ओळख मिळाली. सुप्त गुण ओळखून त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना घडवलच जात नाही. अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे सोपस्कार पूर्ण करण्यापेक्षा ही व्यक्तिमत्वावर संस्कार करणं महत्वाचं आहे.छंद व सुप्त गुण जोपासण्यासाठी सुट्टी आवश्यकच आहे.

शाळेच्या बाहेर ही मुलं शिकतात. सुटी मध्ये ही मुले शिकतात. शाळेत फक्त अभ्यासक्रम शिकवला जातो. शाळेत फक्त औपचारिक शिक्षणाच मारा केला जातो तो आवश्यकतेपेक्षा जास्त झाला तर मुले कंटाळतात.मुले जेंव्हा कंटाळतात पुन्हा त्यांना शिकायचे म्हणले तर त्यांची मानसिक तयारी नसते. मुलें रोबोट नव्हेत हेलक्षात घ्यायला हवं. त्यांना स्वतःहून शिकण्यासाठी सुट्टी आवश्यकच असतें. सुटीमूळें सहज  शिक्षणाला वाव मिळतों. मुलांना स्वतःहून शिकतांना चुका करण्याची संधी मिळते व चुकातून शिकण्याची हिंमत मिळते. सुट्टी ही एक संधी आहे हे मुलांना वेगवेगळ्या गोष्टी शिकण्यास प्रवृत्त करण्याची. सक्तीने शिकवण्याने पालथ्या घड्यावर पाणी पडण्या प्रमाणे आहे. मुलांनी स्वतःहून शिकत असतिल तर मुलं काही नवीन गोष्टी करत असताना पालकांच्या सहभागाची नव्हे तर सहवासाची गरज आहे. आज पण घरामध्यें लाडां मुळे मुलांना श्रमप्रतिष्ठा  शिकवली जात नाही. तुला हे जमणार नाही या वाक्याने मुलांना काहीच करू दिले जात नाही, मुलांना करू द्या चुकू द्या ,तरच ते शिकतील.

पूर्वी पालकांच्या सेवेत मुले असायची आता मुलांच्या सेवेत पालक हजर असतात तेही२४तास. मुलांना शिक्षा होऊ नये म्हणून त्यांच्या गृहपाठ करणारे  पालक ही आहेत मग मुले शिकतील कशी? अर्थात हे चित्र सार्वत्रिक नाही.

सुट्टीच्या काळात अनौपचारिक अनुभव मिळतात, जे जीवन जगायला मदतच करतात. शाळेत शिकविलेल्या गोष्टीच अनुधावन करण्यासाठी सुट्टी आवश्यक असते. शाळेत फक्त शब्द शिकविले जातात. सुट्टीमध्ये शब्दांच्या पलीकडे मुलें शिकतात.

आमच्या शिक्षण पद्धतीमध्ये फक्त औपचारिक शिक्षणाचे मूल्यमापन होते पण अनोपचारिक शिक्षणाचे,सुप्त गुणांचे मूल्यमापन होतच नाही.

शाळेच्या बाहेर जीवनावश्यक गोष्टी शिकायला मिळतात.

शाळेवर विसंबून राहणं आता कमी करायला हवं.

मुलें स्वतःहून बरेच काही शिकतात. स्वयंअध्ययन ,होम स्कूलींग,सुशिक्षित  पालक घरी लक्ष देतातच, शैक्षणिक तंत्रज्ञानाचे अनेक पर्याय त्यांच्यासमोर  आहेत. तसेच शाळेमध्ये पस्तीस मिनिटाच्या तासांमध्ये मुलांचं अवधान किती असतं ?मुलांचे संबोध स्पष्ट होतात कां? हे

महत्त्वाचं आहे. शाळा म्हणजे कोंडवाडा नव्हें.

नोकरी करणाऱ्या आईवडिलांसाठी ती हक्का ची पाळणाघरें न्हवेत.

शाळेत अध्यापनाची नुसती यांत्रिक क्रिया होत असेल तर त्या विद्यार्थ्याला शाळेत जावं  व रहावं

कसं वाटेल,तसं नसतं तर कोचिंग क्लास बहरलेच नसतें.

सुटीतही अनेक गोष्टी मुले शिकतात जे त्यांची व्यक्तिमत्त्व घडायला कारणीभूत होतात. “Destiny of the nation is being shaped in the four walls of classroom “असें कोठारी आयोगाने म्हंटले असले तरीही वर्गा बाहेरच्या अडचणींना  कसे तोंड द्यायचे हे करोनाने दोन वर्षात शिकविलें. जगायचं असेल तर जीवन शैली कशी बदलावी लागतें, अस्तित्वासाठी संघर्ष कसा करावा लागतों. हे मुलं शिकलीं.

सुटीत जरी मुले अभ्यासक्रम शिकली नसली तरीही जीवनक्रम शिकलीं. शेवटी परीक्षेतल्या प्रश्नांना तोंड देणें यापेक्षा जीवनातल्या प्रश्नांना, प्रसंगांना तोंड देता येणं ज्याला जमलं तोच खरा शिकलां. कागदी गुणवत्तेमुळे व्यक्तीला समाजात स्थान मिळत आहे. समाज घडतो ते व्यक्तिमत्वामुळें,कागदामुळें नाही.

कागदावर शाळा भरवली जाईल पण आशयाचं काय? विचार करण्याची प्रक्रिया आज होतच नाही. अनेक क्लास मध्ये मुलांना गुंतवून ठेवलं जातंय.  एकच गोष्ट सातत्याने माणूस करत असेल तर तो म्हणतोच मला वेड लागायची पाळी येईल.

सुट्टी म्हणजे स्वातंत्र्य आहे स्वैराचार नव्हे हे मुलांना पटवून द्यायला हवं, त्याप्रमाणेच त्यांना गुंतवायला हवं. रिकामं घर सैतानाचं घर असतं हे ही लक्षात घ्यायला हवें.सुट्टीत मुले खेळतात, संवाद करतात, निरीक्षण करतात, पाहुणे आल्यावर शिष्टाचार शिकतात, आजची पिढी अलिप्त कोरडी होत आहे त्यांना लोकांमध्ये मिसळणं, भावभावनांची जाण येणंआवश्यक आहे.

आमचे शिक्षक मुलांना बऱ्याच प्रमाणात चांगलं शिकवत असतातच पण जिथे काहीच घडत नाही  तिथे शिक्षक सद्सद्विवेक बुद्धीने विचार करत नसतील तर वेगळे नियोजन करावेच लागेल.

सगळ्यात जास्त सुट्ट्या असलेला पेशा म्हणून शिक्षण क्षेत्राकडे पाहिलं जातं. सुजन घडतं ते सुट्टी मूळेच. विषयाचे तास मोजू नका आशय मोजा. शाळेत बळजबरी थाबणं महत्त्वाचं नाहीच,शिकणं महत्वाचं आहे. अब्राहम लिंकन ने मुख्याध्यापकाला लिहिलेले पत्र प्रत्यक्षात उतरवायचें असेल

तर शाळेच्या वेळापत्रकात अडकून चालणार नाही.

— डॉ.अनिल कुलकर्णी 

 

डॉ. अनिल कुलकर्णी
About डॉ. अनिल कुलकर्णी 29 Articles
डॉ. अनिल कुलकर्णी हे पुणे येथे स्थायिक असून ते शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांची ३ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..