नवीन लेखन...
डॉ. अनिल कुलकर्णी
About डॉ. अनिल कुलकर्णी
डॉ. अनिल कुलकर्णी हे पुणे येथे स्थायिक असून ते शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांची ३ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

बदलती जीवन शैली व शिक्षण

एका अदृश्य शक्तीने दोन वर्ष शाळा बंद ठेवल्या व भविष्यातही त्याचं अस्तित्व राहणारच आहे, हे लक्षात घेऊनच आता मुल्यमापनाच्या निकषांचा नव्याने विचार करावा लागणारच आहे. अशीच वर्ष वाया गेली तर विद्यार्थ्यांची व्यक्तिमत्त्वें पोकळीत वाढतील व हे व्यक्तिमत्व विकासाला बाधक ठरेल. तातडीने मूल्यमापनाच्या संबंधी खालील काही मार्गदर्शक सूचना पालकांना कळवाव्या लागतील. १) तज्ञांच्या सहाय्याने  मूल्यमापन आराखडा तयार […]

व्हाय वुई  किल्ड गांधी

प्रत्येकानेच गांधीजींना थोडे थोडे मारले आहे, कोणी विचाराने मारले आहे कोणी आचाराने मारले आहे. जगणे आज त्या त्या भूमिकेत शिरणं व त्या त्या संदर्भासहित जगणं हेच अभिप्रेत आहे. विचार व आचार पूर्वी अमलात आणण्यासाठी होते आता ते जाहिराती मध्ये व जाहिरातीसाठी वापरले जातात. […]

प्रसारमाध्यमातून झिरपणारी ‘नग्नता’

उदात्त प्रेम आज का निपजत नाही? पूर्वीची प्रेमगीते ही उदात्त होती, संस्कारक्षम होती, शरीर स्पर्शसुध्दा नव्हता. नग्नता मनाला शिवतही नव्हती. सौंदर्याचे आयाम इतके बदलले की केवळ नग्नतेच सौंदर्य शोधणं सुरु झाले. नग्नतेपलिकडेही काही सात्विक, सुंदर आहे, सत्य आहे, शिवासारखे आहे हे जाणवायला हवं तरच विकृती संस्कृतीवर मात करणार नाही. […]

महात्मा, मुन्नाभाई ते संजू

महात्मा गांधी आज अनेकांना हवे आहेत, अनेकांना नको आहेत. आऊटडेटेड माणसं व तत्वज्ञान आजच्या परिस्थितीत वापरुन तरुणांना काही संदेश देतांना आजच्या परिस्थितीत relevance, त्याचं दाखवता आलं तरी पुरेसं आहे. महात्मा आज बंदिस्त झाले आहेत. नोटात महात्मा, फोटोत महात्मा, मात्र प्रत्यक्ष जीवनात सगळा खोटाच व्यवहार. […]

प्रसारमाध्यमांचे संस्कार व विकार 

प्रसारमाध्यमांतून वास्तूशास्त्रवाले, कोचिंगवाले, भविष्यवाले, संत, महात्म्ये आपले विकार, संस्कार म्हणून बिंबवत आहेत. हीच आजची शोकांतिका आहे. संस्काराच्या टिपकागदाने विकार टिपलेच पाहिजेत, नाही तर रंगाचा बेरंग व्हायला वेळ लागणार नाही.  […]

शिस्तीचा ढासळलेला बुरुज 

शाळा नावाचं मंदिर असो की, परमीटरुम, राजकारण्यांची शिफारस लागते, “अर्थ”  असल्याशिवाय शैक्षणिक संस्था मिळत नाहीत, विनाअनुदान, अनुदानित करण्यासाठी “अर्थ” आवश्यक आहे. विनाअनुदानाचे दुकान उघडण्याचे व त्याला अनुदान मिळवून घ्यायचे. राजकारणातल्या  अस्तित्वासाठी, तिकिट मिळवण्यासाठी, शैक्षणिक संस्था, साखर कारखाना, सहकारी संस्था, परमीटरुम, वर्तमानपत्र, खून, बलात्कार हा स्वतःच्या साम्राज्याचा भाग अनेकांना आवश्यक वाटायला लागला. […]

महात्मा गांधी यांना अनावृत्त पत्र

आदरणीय महात्माजी,  विसाव्या शतकातील एक श्रेष्ठ जगतवंद्य विभूती आपणांस मानले जाते. विलक्षण निर्भयता, नम्रता, कमालीची साधी राहणी, दीन-दलितांविषयी अथांग करुणा आणि शोषितांबद्दल सहानुभूती या गुणांचा संगम आपल्या ठिकाणी होता. तत्वज्ञान ही जीवनाबरोबर विकसीत होणारी गोष्ट आहे, हे आपल्या बाबतीत खरे आहे. नैतिकता हेच संस्कृतीचे अधिष्ठान, संयम व त्याग हाच तिचा आत्मा. सुखोपयोगी साधने वाढविण्याची संस्कृती सध्या निर्माण होत आहे. श्रमप्रतिष्ठेची पीछेहाट होत आहे. […]

जादुटोणाविरोधी कायदा व प्रसार माध्यमें

जादुटोणाविरोधी कायदा होऊनही अंधश्रध्दा कमी न होता वाढतच आहेत. नवीन जादू घेऊन नवीन बाबा अवतार घेतच आहेत.जादूटोणा विरोधी कायद्याने काही प्रमाणात नियंत्रण आले असेल, पण रोज अंधश्रध्देचे तण वाढतच आहे.प्रसारमाध्यमांची जादू ओसरली व वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवला तरच जादूटोणाविरोधी कायदा सक्षम होईल. […]

लक्ष्मणरेषा श्रध्दा – अंधश्रध्देची

कार्यकारणभाव, विज्ञान यांकडे दुर्लक्ष करु नये. एखाद्या कथित ‘चमत्कारामागील कार्यकारणभाव समजला, की तो चमत्कार – “चमत्कार” राहत नाही, ती केवळ घटना ठरते. मात्र, आज हे होताना दिसत नाही… […]

प्रेमकथा : पूर्वीच्या आणि आजच्या 

प्रेमकथेमुळे भारतीय चित्रपट सृष्टीला कधीच मरण नाही. पूर्वीच्या चित्रपटातील प्रेमकथेला दर्दभरा साज होता. असंख्यांना भुरळ घालणार्‍या प्रेमकथांनी सामाजिक जीवनावर अधिपत्य गाजवायला सुरुवात केली आहे. आजच्या चित्रपटातील प्रेमकथा पाहून खर्‍या जीवनात त्यांना प्रत्यक्षात आणणे, एवढेच सामान्य ध्येय उराशी बाळगून जगतायेत आजचे तरुण.   […]

1 2 3
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..