नवीन लेखन...
डॉ. अनिल कुलकर्णी
About डॉ. अनिल कुलकर्णी
डॉ. अनिल कुलकर्णी हे पुणे येथे स्थायिक असून ते शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांची ३ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

गुरुजी सांगा कोणाचे?

प्रश्न पडण्याचे कारण की शिक्षकांना अशैक्षणिक कामे इतकी आहेत की गुरुजी आयोगाचे, कां शाळेचे, कां विद्यार्थ्यांचे, कां सरकारचें, का संस्था चालकांचे ? शिक्षकांची भूमिका करणं व शिक्षकांची भूमिका जगणं वेगळं यात फारकत झाल्यामुळें गुरुजी कोणाचे? हा संभ्रम आहे. क्लासमध्ये काही मुलांना जवळ करण्याचा नादात गेस पेपर सांगणारे गुरुजी लोकप्रिय तर त्यामुळे काही असंख्य मुलांच्या गुणवत्ते वर परिणाम झाल्यामुळे काही गुरुजी नकोसे झाले आहेत. मुलींशी गैरवर्तन करणारे अनेक गुरुजी मुलींना आवडत नाहीत. […]

फिर सें ओ सावन अब क्यूँ ना आयें

गेले ते दिन वैभवाचे, समाधानाचे, आनंदाचे भूतकाळाची वर्तमानाशी तुलना करत माणसें जगतात. भूतकाळाच्या एका पारड्यात आनंद असेल तर दुसऱ्या पारड्यात आनंदच हवा तरच पारडं समान होईल. तुलना म्हणजे तराजूच. आनंदाच्या आठवणीवरच माणसें जगतात. आपने कभी थे अब है परायें ही जाणीव बेचैन करतें. […]

फितूर दिवसांचे संदर्भ

ज्या संदर्भात माणसं जगलेली, असतात, ती जेव्हा बदलतात , फितुर होतात, तेव्हा एकाकी होण्याची संभावनाची, नैराश्याची भावना जास्त असतें.सभोवताली पसरलेल्या उजाड वस्त्या, फितूर झालेले हंगाम, डाटा जीबी वरचे जग, व्यवस्थेच्या टाचाखाली जगणारी हतबल माणसं पाहून येणारी हतबलता या सर्व बाबींचा धांडोळा कवी स्वप्नील मेश्राम यांनी घेतला आहे. […]

शिक्षण प्रक्रियेला दिशा देणारे “अभ्यासाचे तंत्र आणि मार्कांचा मंत्र”

सध्याच्या शिक्षण पद्धतीमधील नेमके मर्म ओळखून डॉ. चंद्रकांत कणसे यांनी अभ्यासाचे तंत्र आणि मार्काचे मंत्र हे विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्यासाठीचे उपयुक्त असे मौलिक मार्गदर्शन या पुस्तकाद्वारे केले आहे. बालकापासून पालकापर्यंत शिक्षणा बाबत अनेक संभ्रम आहेत, अनेकांचे शिक्षणा मधील संकल्पनेचे संबोध स्पष्ट नाहीत. […]

रिवर्सल मंत्र

ज्यांनी मधुमेहाचे जीवघेणे अनुभव सोसले, वडिलांच्या मधुमेहाचा दीर्घ लढा पाहिला असे गोल्ड मेडलिस्ट डॉ. चंद्रकांत कणसे यांनी अनुभवातून जाणले की मधुमेह हा केवळ औषध व इंजेक्शन घेऊन बरा करता येत नाही, तो जीवन शैलीशी निगडित आहे. युट्युब वरील त्यांच्या अनेक व्याख्यानामधून व इतरत्र झालेल्या अनेक व्याख्यानांमधून ते सडेतोडपणे काय करायला पाहिजे ते सांगतात. सगळं संपलं आहे असं वाटणाऱ्यांना व नैराश्य आलेल्यांना हे पुस्तक मधुमेहातून नक्कीच बाहेर काढेल. […]

करपलेल्या बालपणाचा व्याकुळपट – अरसड

या कादंबरीतील काही पात्राच्या माध्यमातून उदाहरणार्थ चक्रम, यादव, गंगा,सूर्याजी,मारुती ही पात्रे व्यंकटेश सोळंके आपल्यासमोर व्यक्तीचित्रणाची फळी उभी करतात.अनेक नातेसंबंध हे दिखाऊ असतात त्यातलं पोकळ असणं काय असतं हे आपल्याला अस्वस्थ करून जातं. श्रद्धा, अंधश्रद्धा याबाबत समाजात असलेली धारणा, पूर्वपार चालत आलेल्या प्रथा, परंपरा, विविध चालीरीतीतून साकारलेलं समाजमन सर्वसामान्या […]

गाण्यातून उमगणारी लता

लता मंगेशकर यांच्या गाण्यांचा आत्मा म्हणजे भावनांची नाजूक छटा—प्रेम, विरह, भक्ती, आनंद किंवा देशप्रेम.प्रत्येक भावना त्यांच्या सुरेल आवाजातून श्रोत्यांच्या मनाला भिडते. लता मंगेशकर यांचं गाणं हे फक्त सुरावटींचं नव्हे तर भावविश्व उलगडणारं एक अविस्मरणीय अनुभवविश्व आहे. […]

कुंभमेळा की अंधश्रद्धा मेळावा

नुकतेच टीव्हीवर पाण्यावरचा तरंगता दगड कुंभमेळा दरम्यान दाखवला होता. अनेक जण त्याला पाया पडताना दाखवले जात होते. कोणीही वैज्ञानिक दृष्टिकोन जाणून घेऊन थांबत नव्हतें, थांबणार नाहीत.अध्यात्मासमोर कधीकधी विज्ञानही हतबल होतं. कोणताच हेतू नसलेले, कोणता तरी हेतू असलेले तर काही जण केवळ बघे म्हणून यात सामील होतात. […]

रात्र

रात्र असते हिमनगाच टोक,त्याच्याखाली असंख्य विचार सुस्त पहुडलेले असतात. रात्र कुणाला प्रणयाचा अध्याय सुरू करणारी असतें,कुणाला नकोशीअसतें. विवाहा नंतर एकमेकांच्या स्वभावावर शिक्कामोर्तब करणारं रात्र हे नक्षत्रांचे देणं असतं. रात्र म्हणजे शरीर व मनाच्या समाधानाचं परिमाण. जेवढं समाधान अधिक तेवढा परिणाम चांगला. […]

निक वुजिसिक

माणसाला अवयव नाही चालवत तर मन त्याला चालवतं.अवयव शरीरांचे असतात पण मन त्यांना नियंत्रित करतं. शरीराचे अवयव तक्तात पण मनाचे अवयव ज्याचे मजबूत असतात तो थकत नाही इतिहास घडवतो. जीवनात अनेक निराशेचे प्रसंग तुम्हाला निराश करतात, थांबवतात, पुढे जाण्यापासून परावृत्त करतात. […]

1 2 3 7
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..