नवीन लेखन...

रात्र

रात्र म्हणजे रात्र असते
तुमची आमची सेम नसते.
रात्र असते विश्रांतीचा थांबा.

रात्र असते हिमनगाच टोक,त्याच्याखाली असंख्य विचार सुस्त पहुडलेले असतात. रात्र कुणाला प्रणयाचा अध्याय सुरू करणारी असतें,कुणाला नकोशीअसतें. विवाहा नंतर एकमेकांच्या स्वभावावर शिक्कामोर्तब करणारं रात्र हे नक्षत्रांचे देणं असतं. रात्र म्हणजे शरीर व मनाच्या समाधानाचं परिमाण. जेवढं समाधान अधिक तेवढा परिणाम चांगला. भयाण वास्तव, दुःख दारिद्र्य, यातना यांना दूर लोटणारी रात्रच असते.
रंगल्या अशा रात्री यामध्ये मग्न असतानाच तारुण्य सुलभ भावना म्हणते मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावें मोकळ्या केसात तू मनाला गुंतवावें. फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश ही भावना रात्रीचा आंधार दूर झाल्यावर मनात घर करते.

जळमटे कोणालाच नको असतात पण ती दूर करणं हे होत नाही व ते राहून जातं. मनात सुद्धा खूप काही दाटलेलं असतं ते मोकळं होण्याची संधीच मिळत नाही. रात्र हे असं उबदार पांघरूणआहे जे सगळं विसरायला लावतं, काही काळापुरतं तरी.

रात्रीला उगीच बदनाम केलं गेलं आहे नक्षत्रांचा देणं आम्हाला जाणवतं ते रात्रीच्या पार्श्वभूमीवरच. अनेक प्रेमीयुगुलांच्या सुलभ भावना रात्रीने जागा केल्या आहेत.

फिर छिडी रात बात फुलोंकी दमभर
तो उधर मु फेरे ओ चंदा मै उनसे प्यार कर लुंगी
ये रात ये चांदनी फिर कहा सुन जा दिल की दास्तां
रात्रीच्या पार्श्वभूमी शिवाय हे शक्य झाले असते का?

रात्र सरली की अनेक विचार स्वैरभर घोडे उधळल्याप्रमाणे धावायला लागतात. संयमित मनानं त्यांना थोपवून दिवसाची सुरुवात करावी लागते.

रूक जा रात ठहर जा रे चंदा
बिते ना मिलन की रैना
ही रात्रीला विनवणी असते.

ये रातें ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा अशी रात्र प्रत्येकाला अनुभवावी वाटते.
रात्र सगळं कधी कधी बदलून टाकते व होत्याचे नव्हतं करते तेव्हा आपण तिला काळ रात्र म्हणतो.
एखाद्याला ती यशाच्या शिखरावर पोहोचवते तेव्हा एका रात्रीतून तो यशाच्या शिखरावर पोहोचला असे म्हटले जाते.

उषा:काल होता होता काळरात्र आली की ती नकोशी वाटते.

रात और दिन दिया जले
मेरे मन मे फिरभी क्यूं अधेरा
हे मनाला पडलेलं कोडं आहे.

अनेक स्वप्नांना रात्र साक्ष असते. सकाळी जागं झालं की ती तुम्हाला पुन्हा तुमच्या राज्यात सोडते.
एखादी रात्र माणसाचं आयुष्य संपवते, कुणाला झोपेतच मृत्यू येतो केवळ रात्री या घटना झाल्यामुळे आपल्या दृष्टीने ती काळरात्र ठरते.

रात के हमसफर थक के घर को चलें
झुमती आ रही सुबह प्यार की
हा आशावाद आपल्याला जागवतो.

रात्री मेंदूची मशागत होत असावी आणि म्हणून दिवसाची सुरुवात विचारांनी होते. विचारांची सुनामी कधी कधी झोप उडवून देते,आपण रात्रीला दोष देतो, रात्रीला झोपेचे खोबरे झाले म्हणून दोष देतो.
अविरत यशाच्या मागे धावणाऱ्या माणसासाठी रात्र हा समाधानाचा थांबा आहे. केवळ दिवसाची रात्र करून यशाच्या मागे धावणाऱ्यांनी रात्रीला न्याय दिला पाहिजे.

रात्र ही नववधू सारखी असते तिला गोंजारायला हवं, फुलवायला हवं, हळुवार भावनांचं खत घालायला हवं बघा मग ती कशी तुमच्यावर सदाफुली सारखं प्रेम करते, मोगरा फुललां ची जाणीव तुम्हाला देते, रातराणी सारखा सुगंध घेऊन दरवळते ती तुमच्या आयुष्यात.

रात्र ठरवते तुमचं कर्तुत्व, तुमचा उषःकाल. रात्र हळुवार प्रेमाची पावती असते. मनें जुळायला रात्री सारखी वेळ नाही. रात्रीच्या चांदण्यात हातात हात घालून फिरणं हा प्रेमिकासाठी रम्य ही स्वर्गाहून लंकाचा प्रत्यय देते. रात्र शिक्कामोर्तब करते तुमच्या येणारऱ्या दिवसांवर. रात्रीतून सगळं बदलावायचं असेल तर तुम्हाला बदलावं लागेल. रात्रीचा समाय सरूनी येत उष:काल हा या आशेवरच जगायला हवं.

डॉ.अनिल कुलकर्णी

डॉ. अनिल कुलकर्णी
About डॉ. अनिल कुलकर्णी 64 Articles
डॉ. अनिल कुलकर्णी हे पुणे येथे स्थायिक असून ते शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांची ३ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..