आयुष्य खूप सुंदर आहे फक्त तुम्हाला ते जगता यायला हवं.
केवळ जगणं महत्त्वाचं नाही तर जगताना आस्वाद घेता यायला हवा. जगायला जनावरं सुद्धा जगतात पण आपल्या जगण्यात एखादी गोष्ट नीट समजून घेतली तर आनंदामध्ये कित्येक पटीने वाढ होते. केवळ गुणांची टक्केवारी करिअर, मोबाईल टास्क असल्या गोष्टीमुळे सगळ्यांचे गुंतणं वाढलं आहे इतकं की स्वतःचे भान त्यांना राहत नाही. होण्यासाठी व आनंद घेण्यासाठी स्वतःचे भान हवंच. स्वतःचं आयुष्य संपवण्या इतपत भान हरवलं तर आयुष्य आनंदी व सुंदर कसं लागेल..
आनंद घेताना स्वतःचे भान ठेवणे आवश्यक असते.बऱ्याच वेळेला आनंदच्या नादात माणसे स्वतःला गमावून बसतात. आनंद व दू:खं वैधानिक इशाराही देत नाहीत.
आयुष्य खूप सुंदर आहे हे तात्विक विधान झालं पण ते आपण आचरणात आणलं तर खरंच आयुष्य आनंदी होतं. केवळ देणगी देणं आनंद नाही तर अश्रू पुसणं आनंद आहे. अनेकांची प्रेरणा आपल्याला तात्विकताच भासू शकते पण जेव्हा आपण त्यावरून मार्गक्रमण करतो त्यावेळेस ती प्रत्यक्षात अमलात येते आणि आपण कोणासाठी तरी पायवाट बनतो.
आयुष्य आनंदी तेंव्हाच वाटेल जेव्हा आपण इतरांच्या आनंदाचा विचार करू व त्यांना आनंद कसा मिळेल यासाठी प्रयत्नशील राहू.दिव्यांग प्रमाणपत्राचा फायदा घेऊन एखाद्याला नवीन उच्च स्थान प्राप्त करतो तोपर्यंत आनंद आहे पण अनेकांना दुःखी करून आनंदी राहण्यात शेवटी कुठेतरी मनात आपल्या खंत वाटत राहते व फसवणूक केल्याचे लक्षात आल्यावर दुःखच दुःख असते.दुसऱ्यांची प्रेरणा ही आपल्या भविष्याचा पाया असते.
अनेकांना आपल्या आई-वडिलांनी जगविले उभा केले.अनेकांना आपल्या शिक्षकांनी उभे केले व जगविले याची जाण उत्तरार्धात त्यांनी ठेवायला हवी.
आम्ही कोणापासूनच प्रेरणा नाही घेतली तर आयुष्य सुंदर कसं होईल. आम्हाला निसर्गाकडून सतत बोलतं राहण्याची प्रेरणा घ्यायला हवी. फुलां कडून सतत सौंदर्याची प्रेरणा घ्यायला हवी पानाकडून सळसळण्याची प्रेरणा घ्यायला हवी. कोणापासून काहीच घेतलें नाही घेतले तर आम्ही दगड होऊन जाऊ. प्रेरणा शोधता यायला हवी. प्रेरणा स्वतःमध्ये सुद्धा शोधता यायला हवी. मी हे करू शकतो.
पूर्वी पोवाडे म्हणल्यानंतर तरुणांमध्ये एक प्रकारची जागृती व्हायची व त्यापासून अनेकांनी प्रेरणा घेतली. शूरवीरांचे कर्तुत्व सांगणारे पोवाडे ऐकल्यानंतर तरुणांना सफुरण चढायचं. पूर्वी भजन,कीर्तन,अभंग याच्या माध्यमातून लोकांमध्ये एक प्रकारचा आध्यात्मिक संस्कार नकळत व्हायचा. निसर्ग, पाऊस चाफा तुमच्याकडून कविता वदवून घेतो ही प्रेरणाचअसतें. अवघा रंग एकची तेव्हाच होतो जेव्हा तुम्ही या गोष्टीत समरस होता. नृत्य गाणं येत नसलें तरीही तुम्ही त्यात जसं जसे सामावून जाता तसे तसे तुम्ही त्याचे होता. दवाबिंदू होता आलं पाहिजे पण व दवबिंदूचा अलिप्तपणा घ्यायचा नाही. आयुष्य सुंदर आहे आज आणि आत्ता या क्षणाला. आनंदी क्षणांचा सडा पारिजातका प्रमाणे असतो क्षणिक पण सुखावणारा. आनंदी राहायला पाहिजे हे तत्त्वज्ञान झालं. चांदण्यात फिरताना माझा धरलास हात ही अनुभूती आहे आनंदाची. कोणाला पाऊस आठवतो तो प्रेयसी मुळेच. कविता होते ती पावसामुळेच. पाऊस नुसताच पडत नाही तर इतिहास घडववतो, प्रेमाचा, पुराचा.
एका गोष्टीवर आनंदाचे असंख्य धबधब्यातून वाहणारे तुषार असतात. लांबून पाहायचं असलं तरी कळत न कळत तुषार आपल्या अंगावर घेताना जो आनंद आहे तोच आयुष्य जगताना अशा असंख्य आनंदचे तुषार स्वतःवर घेऊन त्यात चिंब होण्यात आहे.
आयुष्य सुंदर तेव्हाच होऊ शकतं जेव्हां तुम्ही एखाद्या पठडीमध्ये किंवा पॅटर्नमध्ये स्वतःला झोकून देता.
लहानपणी चांगले संस्कार झाले तर पुढील आयुष्य आनंदातच जातं, पण लहानपणी केवळ सोपस्कार झाले तर मनाची जडणघडण व्हायला वेळ लागतो.
कुटुंब ही संस्कारा साठी असतात. शाळा ही अभ्यासक्रमाचे सोपस्कार पाडणारी असली तरीही काही शाळा संस्काराची रुजवणूक सुद्धा करतात त्याच्यामुळे चांगले विद्यार्थी घडतात. माझी आई माझे वडील, माझे शिक्षक माझी शाळा माझा समाज,माझा देश याबद्दल आत्मीयता वाटलीच पाहिजे तरच आयुष्य सुंदर वाटेल.
अलिप्त राहाणं म्हणजे आयुष्याचा आनंद गमावणंच होय. तुम्ही अलिप्त एकलकोंडे राहाल तर लोक सुद्धा तुमच्याजवळ येणार नाहीत संवाद करणार नाहीत व तुम्हाला भयाण एकटेपणा जाणवेल.
भौतिक गोष्टीचा साठा करणारे माणसं आनंदाचा साठा करायचा विसरून जातात. आनंदाचा साठा आठवणीत ओतप्रोत भरलेला असतो. आम्हाला कुणाला आठवायचेच नाही, कुणाला पत्र लिहायचं नाही ,कोणाशी संबंध साधायचा नाही तर आनंद कसा मिळणार?
तत्त्वज्ञान अनेकांना माहीत असतं, पण जगणं माहित नसतं आनंद घेणं माहीत नसतात. आनंदा मुळे अनेकांनी आयुष्य फुलवलं आहे फुलवत ठेवलं आहे.
आनंद आम्ही घेत नाही सहजासहजी कारण आम्ही आनंद वाटत नाही. पैसे वाटल्याने बँक बॅलन्स कमी होतो पण आनंद वाटल्याने बँक बॅलन्स वाढतो. मृगजळा मागे धावल्याप्रमाणे माणसे आनंदा मागे धावतात. आनंद तुमच्यातच आहे. तो वाटला तरच लोक तुमच्या आनंदात सहभागी होतील व आनंद द्विगुणित होईल.
लहान मुलाकडे पाहून आनंदाने मान हरवली तर ते हस्त पण रागावून त्याच्याकडे पाहिलं की ते रडायला लागतं तसेच आनंदाचं आहे. हसरं मुल कोणाला आवडत नाही. तुम्ही जसा साद द्याल तसा प्रतिसाद मिळतो. चाफा बोलेना म्हणून
निर्विकार राहायचं नाही. चाफा बोलेना याची जेव्हा कविता होते याचं जेव्हा गाणं होतं तेच जीवन गाणं होतं. दगडातून जसं शिल्प कोरता आलं पाहिजे तसं रूक्ष आयुष्यातून आनंद शोधता आला पाहिजे. आयुष्य सुंदर आहे मान्य आहे अटी व लागू आहेत पण त्याची पूर्तता केली की आयुष्य सुंदरच आहे.
डॉ. अनिल कुलकर्णी
Leave a Reply