नवीन लेखन...

मी विजेता होणारच

नशीबावर अवलंबून अनेक जण आयुष्य व्यतीत करतात. माझ्या नशिबात नाही, मी करूच शकत नाही, मी होऊच शकत नाही. पण मनानं ठरवलं आणि अंमलबजावणी केली की यश आपलंच असतं.मनानं ठरवणारे अनेक असतात,उद्या पासून करु म्हणणारे तिथेच राहतात.

प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मकपणे पाहण्याची सवय मनाला केवळ असून चालत नाही. शरीराला सुद्धा मनाची साथ द्यावी लागते. मी विजेता होणारच या पुस्तकाची शंभरावी आवृत्ती केवळ निघाली नाही तर अनेकांना यशाची पायवाट दाखवणारे उमेश कणकवलीकर यांनी अनेकांच्या जीवनात अमुलाग्रह बदलही केला आहे. रक्तदान करण्यातही त्यांनी शतक गाठले आहे. १७ वर्ष युनियन बँकेत नोकरी करणारे, नोकरीचा राजीनामा देतात व मी प्रत्येक क्षेत्रात यश मिळवणारच हा पण करून ते थांबले नाहीत,त्यांच्या प्रतिज्ञामध्ये मी आणि शेवटचं अक्षर च आहे. आम्ही अनेक प्रतिज्ञा करतो पण शेवटी ‘च’ याकडे दुर्लक्ष करतो.लक्षात ठेवा, विजेता कधीच पराभव स्वीकारत नाही.

विजेता दृष्टीकोन नक्की काय आहे? जीवनातल्या विजेत्यांपेक्षा इतरांपेक्षा वेगळेपणाचे ते काय आहे? जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात यशस्वी होण्याच्या दृष्टीकोनातून एखादी व्यक्ती कधी सुरुवात करतो? युद्धाच्या क्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वी एखाद्या योद्धाची काही विशिष्ट पार्श्वभूमी आहे का?

“मी एक विजेता होणारच” असा एखाद्याचा खरोखर कसा विश्वास असेल? प्रख्यात लाइफ कोच आणि जोश टॉक्सचे स्पीकर डॉ. उमेश कणकवलीकर सतत अपयश आणि अपमान सहन करूनही आयुष्याचा विजेता होण्यासाठी मास्टरकी सामायिक करतात. आयुष्यात अनेक समस्या आल्या. बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेत नापास झाल्यावर वडिलांनी त्यांना शिकून कमावण्यासाठी सांगितले, त्याच्या काळ्या त्वचेसाठी त्यांना अपमान सहन करावा लागला, आर्थिक आणि भावनिक अपयशाला सामोरे जावे लागले, अक्षरशः चोरीदेखील करावी लागली! परंतु, वास्तविक विजेता अशा दुर्दैवाने कधीच दबून जात नाही, उलट त्या प्रतिकूल परिस्थितीतून प्रेरित होतो. महाराष्ट्रभर असंख्य विजेते तयार करण्याच्या प्रवासात विजेता म्हणून आपले अस्तित्व दाखवले. आपल्या शून्याच्या हिरोच्या प्रवासात, त्यांचा जीवन प्रवास आणि विजेता माइंडसेट आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात आपले मार्गदर्शन करणारा आहे. तसेच, त्यांनी आपल्या आयुष्यात राबवलेल्या यशाची खास मास्टरकी तुम्हाला आपल्या जीवनाची, संभाव्यतेची आणि आपल्या वैयक्तिक स्वप्नांची पूर्तता करण्याच्या पद्धतीमध्ये वास्तविक बदल करण्यात उपयुक्त ठरेल.

शिरुर च्या जवळ त्यांनी माळरानावर नंदनवन फुलवले आहे. तिथे तीस-पस्तीस हजारांची बेस्ट सेलर पुस्तकें वाचण्यासाठी आहेत.

मुंबई सारख्या शहरात सगळं व्यवस्थित चाललेलं असताना गांधीजींनी म्हटल्याप्रमाणे खेड्याकडे चला हे त्यांनी प्रत्यक्षात अमलात आणलं.

रातराणी जसं आसमंत उजळून टाकते तसंच आत्मविश्वासही अनेकांची मनं उजळून टाकतो. Jack of all, master of none हे त्यांनी खोटं ठरवलं आहे.

मी प्रभावी वक्ता होणारच, मी यशस्वी उद्योजक होणारच, मी विजेता होणारच, मी नेटवर्किंग होणारच, मी मानवी संबंध जोपासणारच असे अनेक पण पणाला लावून विजयश्री खेचणारे उमेश कणकवलीकर यांनी प्रेरणेच्याअनेक पायवाटा निर्माण करून ठेवल्या आहेत. हे सर्व कसे केले यावर वरील पुस्तकं लिहिली.

एक प्रभावी प्रेरणादायी वक्ता म्हणूनही उमेश कणकवलीकर यांची ओळख आहे.

जिद्द आणि प्रयत्न यांची सांगड असेल तर पैसा आणि प्रसिद्धी पायाखाली लोळण घेतात. माणसे एका शब्दानेही प्रेरित होतात. अब्दुल कलाम यांचं भाषण ऐकल्यानंतर त्यांच्यामध्ये बदलाची प्रक्रिया सुरू झाली.

“राष्ट्र तुम्हाला काय देते यापेक्षा तुम्ही राष्ट्राला तूम्ही काय देता हे महत्त्वाचे आहे”. वामनराव पै, विवेकानंद यांच्या विचाराने ते भाराऊन गेले. मुलांना नेहमी तुला ते जमणार नाही म्हणून परागृत्त करू नका. मुलांना स्वप्न पाहुद्या आणि ती साकार करण्यासाठी त्यांना मदत करा.

मुलांच्या मनाविरुद्ध गोष्टी त्यांच्यावर लादू नका,असे ते म्हणतात. विवेकानंदांना लहानपणी तू पुढे कोण होणार असे विचारले असता त्यांनी टांगेवाला असे सांगितले. कलकत्त्यात त्यावेळी टांग्यांची संख्या खूप असे. कोणत्याही कामात कमीपणा नसतो. टांगेवाला गर्दीतून मार्ग काढतो तर विवेकानंदांनी जगाला मार्ग दाखवला.

एक सामान्य बारावी नापास मुलगा जिद्दीने कोट्याधीश होतो, चार-पाच गाड्या बाळगतो स्वतःच्या मुलालाही कोट्याधीश करतो. स्वतःच्या कुटुंबात, समाजामध्ये अनेकांच्या हृदयात प्रेरणेची बीजे पेरून सृजनात्मक बदल करून भौतिक आणि नैतिक बदल घडवून आणतो. बुवाबाजी, चमत्कार याला फाटा देऊन मीच माझ्या जीवनाचा शिल्पकार आहे हे अनेकांच्या मनात त्यांनी रुचवलं व रूजवलं.सामान्य माणसे असामान्य माणसांचं अनुकरण करतात हे ऐकलं होतं पण अनेक सामान्य माणसं असामान्य करणं हे एका माणसांनी केलं आहे.

प्रतिभा आणि सुप्त गुण प्रत्येक माणसांमध्ये असतात पण प्रेरणा असल्याशिवाय माणसे सामान्यांची असामान्य होत नाहीत. उदात्त ध्येय बाळगणारी वेडी माणसेच इतरावर राज्य करतात. अफाट लिखाण, अफाट वक्तृत्व अफाट समाजसेवा, अफाट रक्तदान जे जे करायचे ते उदात्तच. यशाला कोळून पिणारी काही माणसे असतात त्यापैकी उमेश कणकवलीकर आहेत. त्यांची पत्नी निशिगंधा व मुलगा डॉ.राजेश याची साथ त्यांना असतेच.

दैदिप्यमान इतिहास पाठीशी नसतांना दैदिप्यमान इतिहास घडविणे ही आपल्या यशाची पावती असतें.

डॉ. अनिल कुलकर्णी

डॉ. अनिल कुलकर्णी
About डॉ. अनिल कुलकर्णी 58 Articles
डॉ. अनिल कुलकर्णी हे पुणे येथे स्थायिक असून ते शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांची ३ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..