ओठाकडे लक्ष द्यायला मला अभ्यासातून ना वेळ मिळाला न मिळणार आहे मला आयआयटी करायचे आहे, त्यांना जे वाटते ते त्यांनी लिहिले मला त्यांच्या बोलण्याची काहीच वाटत नाही ते तितके महत्त्वाचे नाही सुद्धा. 55 लाख विद्यार्थ्यांमधून यु.पी.बोर्डातून प्रथम येणारी प्राची निगम वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आली. अस्तित्वाचा स्विकार करतांना वैगुण्यावर व वैगुण्यासह सत्वता:वर प्रेम करता आलं की लोकांना अस्तित्वाच्या चांगल्या अंगाची दखल घ्यावीच लागते. बाह्य सौंदर्यापेक्षा अंतरिक सौंदर्य शेवटी मनुष्याला घडवतं.मनुष्य हा परिपूर्ण कधीच नसतो. प्रत्येकामध्ये गुण आणि वैगुण्य असतातच. आपल्यातलं एखादं वैगुण्य विसरून स्वतः स्वतःवर प्रेम करत ध्येयाकडे वाटचाल केली की यश आपलच असतं. धडधाकट लोकच इतिहास घडवितात असं नव्हें, तर अंध, अपंग,लुळेपांगळे, वाळीत टाकलेले यांनी सुद्धा इतिहास घडविला आहे, प्रेरणेची पायवाट निर्माण केली आहे. शेक्सपियरने म्हटल्याप्रमाणे नावात काय आहे तसंच दिसण्यात काय आहे हे प्राची ने दाखवून दिले आहे. ब्रेन अंध असूनही त्याने ब्रेल लीपी तयार करून अंधासाठी प्रेरणेची पायवाट निर्माण केली. समाज माध्यमातील स्वैराचारा मुळे आज कुणालाही टारगेट केले जात आहे.
कुणाला नांव ठेवण्यावरून, कुणाला व्यंगावरून, कोणाला बोलण्यावरून, कोणाला लिहण्यावरून. पायवाट निर्माण करण्यासाठी फक्त जिद्द लागते. तन-मन-धन अर्पण करून प्रयत्न केले की यशाची पायवाट निर्माण होते. यशाकडे जाताना असंख्य अडथळे, खाचखळगे, धोके, फसवणूक होणारच पण आपल्या ध्येयाकडे जाण्याची जिद्द असेल काय होऊ शकते याचं प्राची हे उदाहरण आहे. उत्तर प्रदेशात दहावी बोर्ड परीक्षेत पहिला क्रमांक पटकावणारी प्राची निगम हिच्या यशाचं कौतुक करण्यापेक्षा, दिसण्यावरुन जास्त ट्रोल करण्यात आलं. चेहऱ्यावर केस असल्याने असल्याने ती मुलगा असल्याचं अनेकजण उपहासात्मकपणे म्हणत होते.उत्तर प्रदेशात दहावी बोर्ड परीक्षेत पहिला क्रमांक पटकावणारी प्राची निगम आपल्या कामगिरीपेक्षा दिसण्यामुळे जास्त ट्रोल झाली.यादरम्यान दहावीत 98.5 टक्के गुण मिळवणाऱ्या प्राची निगमने या सर्व टीकाकारांना उत्तर दिलं आहे. माझं दिसणं नव्हे तर गुण जास्त महत्वाचे आहेत असं प्राची निगमने म्हटलं आह”लोक मला ट्रोल करत असल्याचं पाहिलं तेव्हा मला जास्त फरक पडला नाही. माझे गुण महत्वाचे आहेत, चेहऱ्यावरचे केस नाही,” असं उत्तर प्राची निगमने ट्रोल करणाऱ्यांना दिलं आहे. प्राचीने यावेळी आपल्याला पाठिंबा देणाऱ्यांचेही आभार मानले आहेत. “उत्तर प्रदेश बोर्ड परीक्षेत मी टॉप केल्यानंतर जेव्हा माझा फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला तेव्हा काही लोकांनी मला ट्रोल करण्यास सुरुवात केली.
पण त्याचवेळी काही लोकांनी मला पाठिंबा दिला. मला त्या सर्वांचे आभार मानायचे आहेत”.ज्यांना माझ्या चेहऱ्यावर केस असणं विचित्र वाटत आहे, ते मला ट्रोल करणं सुरु ठेवू शकतात. याच्याने मला काही फरक पडत नाही असंही प्राचीने म्हटलं आहे. पुढे ती म्हणाली की, “चाणक्य यांनाही त्यांच्या दिसण्यावरुन ट्रोल करण्यात आलं होतं. पण त्यांना त्यांचा काही फरक पडला नाही”.ट्रोलिंगमुळे थोडं वाईट वाटलं अशी कबुलीही तिने दिली. “नक्कीच तुम्हाला थोडं वाईट वाटतं. पण सोशल मीडियावर लोक हवं ते लिहित असतात आणि आपण त्याबद्दल काही करु शकत नाही. जर मला थोडे कमी मार्क मिळाले असते तर कदाचित सोशल मीडियावर इतकी प्रसिद्ध झाली नसती. मला कदाचित चेहऱ्यावरील केसांमुळे ट्रोलिंग सहन करावं लागलं नसतं,” असंही प्राचीने म्हटलं आहे. दरम्यान प्राचीने मोठं होऊन इंजिनिअर होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. युपी बोर्ड परीक्षेत टॉप केल्यानंतर प्राचीचे सोशल मीडियावरील ट्रोलिंग मर्यादेपलीकडे जाऊ लागल्यानंतर ऑनलाइन कम्युनिटीने याविरोधात लढा उभारला होता. प्राचीवर अशा कमेंट्समुळे होणाऱ्या भावनिक परिणामावरही चर्चा करण्यात आली. काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनीही प्राचीशी संवाद साधला आणि आपलं स्वप्न पूर्ण कऱण्यासाठी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला. बोर्ड परीक्षेतील तिच्या यशाचं कौतुक करताना त्यांनी अशा ट्रोलिंगमुळे फरक पडू देऊ नकोस असा सल्लाही दिला. आपल्या चांगल्या अस्तित्वाची दखल घ्यायला लावणे ही प्रेरणाच असते.
डॉ. अनिल कुलकर्णी
Leave a Reply