नवीन लेखन...

पहिल्या पानावरुन तसेच इतरही विभागातून प्रमोट करण्यासारखे काही खास लेख

विदर्भातील अष्टविनायक

‘विदर्भातील अष्टविनायक’ प्रेक्षणीय आहेत. त्यांच्याशी विविध दंतकथाहि जोडल्या गेल्या आहेत. विदर्भातील अष्टविनायकांमध्ये वैविधता आढळते. […]

गाणारी बोटे.. गोविंदराव पटवर्धन

गोविंदराव पटवर्धन यांचा जन्म २१ सप्टेंबर १९२५ रोजी गुहागर जवळ असलेल्या अडूर या कोकणातल्या गावी , त्यांच्या आजोळी झाला. ते १९३० च्या सुमारास मुंबईला आले . त्यांचे शिक्षण मुबईतील आर्यन एज्युकेशन स्कुलमध्ये झाले. १९४२ साली मॅट्रिक झाल्यानंतर ते १९४७ साली पोलीस खात्यात नोकरीला लागले. उपजिवेकेसाठी त्यांनी पोलीस खात्यात नोकरी केली परंतु त्यांची खरी निष्ठा संगीतावरच होती. […]

बालाकोट सर्जिकल स्ट्राईकची पाच वर्ष

२६ फेब्रुवारी २०१९ पहाटेचे ३.३० वाजले होते. स्थळ होतं पाकिस्तानातील दहशतवादी तळ, पाकिस्तानी हवाई हद्दीत अचानक लढाऊ विमानांचे जोरदार आवाज ऐकू येऊ लागले. सर्व शांत झोपेत होते, एकानंतर एक स्फोटाने हडकंप माजला. पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय वायूसेनेने बदला घेण्यासाठी ऑपरेशन बंदर अंतर्गत सर्जिकल स्ट्राईक २ केलं. जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. […]

हवामान पूर्वानुमान

हवामान खात्याने “आज कडकडीत ऊन पडणार” म्हटले असेल तर बाहेर पडताना नक्की छत्री बरोबर ठेवावी असे एकेकाळी उपहासात्मक बोलले जायचे. परंतू त्याच हवामान खात्याचे अंदाज आता हमखास बरोबर ठरू लागले आहेत. हवामानाची माहिती मिळविण्यासाठी आधुनिक प्रगत साधने आणि हवामान प्रारूपांमधील अचूकता यामुळेच ही नेत्रदीपक प्रगती हवामान विभागाने साधली आहे. याचीच साद्यंत माहिती देणारा हा लेख… […]

श्रीमद्भगवद्गीता मराठीत श्लोकबध्द – अध्याय अठरावा – मोक्षसंन्यासयोग

इथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी मोक्षसंन्यासयोग नावाचा अठरावा अध्याय… […]

आकाशवाणी या नावाचे जनक पं. नरेंद्र शर्मा

आज जे आपण ‘आकाशवाणी’ नाव ऐकतो ते १९५७ मध्ये नरेंद्र शर्मा यांनी ‘आकाशवाणी’ हे नवे आकर्षक नाव ऑल इंडिया रेडीओला सुचविले. या नावामुळे भारतीय जनता, रसिक श्रोत्यांमध्ये एक आपुलकीची भावना निर्माण झाली, व लोक रेडिओ ऐकू लागले. […]

मराठी राजभाषा दिवस – संकल्प

कविवर्य  कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस हा महाराष्ट्रात दिवस मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा करतात. हा दिवस होऊ लागला त्याला आता बरीच वर्षे झाली. आपण वर्षांतून एकदा मराठी भाषा दिवस साजरा करून जगाला हे सांगतो की, ‘मराठीचा आम्हाला विसर पडला आहे, भाषा दिवस साजरा करणे, केंद्राकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळवणे या प्रतीकात्मक असल्या तरी आमच्या आवाक्यातील ज्या गोष्टी आहेत. […]

मराठी भाषा गौरव दिन

मराठी भाषा ही आपल्यासाठी फक्त एक भाषा नसून ममतेचे वासल्याचे बोल आहेत. कुठल्याही शस्त्राची गरज मराठी शब्दांना लागत नाही . कारण मार्दव, ममत्व हे या मराठी भाषेच्या ठाई कायमच वसलेले असते. दरवर्षी २७ फेब्रुवारी हा दिवस ” मराठी भाषागौरव दिन” म्हणून साजरा केला जातो. […]

देखभाल आणि आपत्कालीन यंत्रसामग्री

रेल्वेसेवा व्यवस्थित सुरू राहण्यासाठी तिची देखभाल ही अत्यंत महत्त्वाची ठरते. त्यासाठी विशेष प्रकारची यंत्रे वापरावी लागतात. तसेच, अपघातासारख्या संकटकालीन परिस्थितीतसुद्धा विशेष प्रकारच्या सामग्रीचा वापर करावा लागतो. देखभालीसाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत वापरल्या जाणाऱ्या यंत्रसामग्रीची ही ओळख… […]

1 2 3 4 221
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..