नवीन लेखन...

पहिल्या पानावरुन तसेच इतरही विभागातून प्रमोट करण्यासारखे काही खास लेख

विनोदी अभिनेते व निर्माते जसपाल भट्टी

बोचऱ्या पण विखारी नसलेल्या, सहजसाध्या पण सामान्य पातळीवर न घसरलेल्या प्रसन्न विनोदाच्या माध्यमातून सामान्य माणसाला भेडसावणाऱ्या प्रश्नांना वाचा फोडणारे आणि आधुनिक काळात दूरचित्रवाणीद्वारे विनोदाला देशव्यापी लोकमान्यता मिळवून देणारे जसपाल भट्टी हे इलेक्ट्रिकल इंजिनीयर होते. […]

विश्वाची उत्पत्ति सांगणारा सिद्धांत

1] Big-bang Theory_ (विश्वाची उत्पत्ति सांगणारा सिद्धांत): हे विश्व एका महा स्फोटातून निर्माण झाले .हे सांगणारा हा सिद्धांत आहे. हजार /लाखो वर्षांपूर्वी एक भयंकर स्फोट झाला त्यातून जी काही energy व particles बाहेर पडले त्यातून हे विश्व निर्माण झाले . ते कसे हे सिद्ध करण्यासाठी Dark matter, String theory आणि काही Dimensional concept पूर्ण व्हायला हव्या. […]

जन्मदाता – पडद्यामागचा कलाकार

वडील, या शब्दात सगळ काही सामावलेले असते. ते कसे बघुया. वडील म्हणजे आधार. प्रत्येक व्यक्तीला जीवनात आधाराची गरज असतेच आणि जर त्या वेळेस त्या व्यक्तीला त्याच्या वडिलांचा आधार भेटला तर तो पूर्ण जग जिंकू शकतो. बाप हा त्याचा मुलाला जन्म देण्या पासून ते त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्याला यश कस प्राप्त होईल ते बघत असतो. मुलं पण जर स्वतःच्या बापाचे कष्ट समजून घेणारे असतील तर बाप नक्कीच यशस्वी होतो. […]

विदर्भातील अष्टविनायक

‘विदर्भातील अष्टविनायक’ प्रेक्षणीय आहेत. त्यांच्याशी विविध दंतकथाहि जोडल्या गेल्या आहेत. विदर्भातील अष्टविनायकांमध्ये वैविधता आढळते. […]

गाणारी बोटे.. गोविंदराव पटवर्धन

गोविंदराव पटवर्धन यांचा जन्म २१ सप्टेंबर १९२५ रोजी गुहागर जवळ असलेल्या अडूर या कोकणातल्या गावी , त्यांच्या आजोळी झाला. ते १९३० च्या सुमारास मुंबईला आले . त्यांचे शिक्षण मुबईतील आर्यन एज्युकेशन स्कुलमध्ये झाले. १९४२ साली मॅट्रिक झाल्यानंतर ते १९४७ साली पोलीस खात्यात नोकरीला लागले. उपजिवेकेसाठी त्यांनी पोलीस खात्यात नोकरी केली परंतु त्यांची खरी निष्ठा संगीतावरच होती. […]

बालाकोट सर्जिकल स्ट्राईकची पाच वर्ष

२६ फेब्रुवारी २०१९ पहाटेचे ३.३० वाजले होते. स्थळ होतं पाकिस्तानातील दहशतवादी तळ, पाकिस्तानी हवाई हद्दीत अचानक लढाऊ विमानांचे जोरदार आवाज ऐकू येऊ लागले. सर्व शांत झोपेत होते, एकानंतर एक स्फोटाने हडकंप माजला. पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय वायूसेनेने बदला घेण्यासाठी ऑपरेशन बंदर अंतर्गत सर्जिकल स्ट्राईक २ केलं. जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. […]

हवामान पूर्वानुमान

हवामान खात्याने “आज कडकडीत ऊन पडणार” म्हटले असेल तर बाहेर पडताना नक्की छत्री बरोबर ठेवावी असे एकेकाळी उपहासात्मक बोलले जायचे. परंतू त्याच हवामान खात्याचे अंदाज आता हमखास बरोबर ठरू लागले आहेत. हवामानाची माहिती मिळविण्यासाठी आधुनिक प्रगत साधने आणि हवामान प्रारूपांमधील अचूकता यामुळेच ही नेत्रदीपक प्रगती हवामान विभागाने साधली आहे. याचीच साद्यंत माहिती देणारा हा लेख… […]

श्रीमद्भगवद्गीता मराठीत श्लोकबध्द – अध्याय अठरावा – मोक्षसंन्यासयोग

इथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी मोक्षसंन्यासयोग नावाचा अठरावा अध्याय… […]

आकाशवाणी या नावाचे जनक पं. नरेंद्र शर्मा

आज जे आपण ‘आकाशवाणी’ नाव ऐकतो ते १९५७ मध्ये नरेंद्र शर्मा यांनी ‘आकाशवाणी’ हे नवे आकर्षक नाव ऑल इंडिया रेडीओला सुचविले. या नावामुळे भारतीय जनता, रसिक श्रोत्यांमध्ये एक आपुलकीची भावना निर्माण झाली, व लोक रेडिओ ऐकू लागले. […]

1 2 3 221
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..