कालभैरवाष्टक – मराठी अर्थासह
श्रीमत् आदि शंकराचार्यांनी रचलेले कालभैरवाष्टक शंकराच्या भगवान कालभैरव या विक्राळ आणि उग्र रूपाचे स्तुतीपर स्तोत्र आहे. रूप रौद्र असले तरी त्याचा स्वभाव अत्यंत सरळ व भक्तांविषयी कणव असणारा आहे. या स्तोत्राचे पठण करण्याने भगवान कालभैरव अत्यंत भयावह भूत प्रेतादिकांना दूर ठेवतो, भीती, दुःख दारिद्र्य, क्लेशांना नष्ट करतो व सर्व संकटे दूर होतात. स्तोत्राचे नियमित पठण केल्याने मनाला शांती मिळते, आपल्या आयुष्यातील सर्व वाईट गोष्टी दूर होतात आणि आपले जीवन निरोगी, श्रीमंत आणि संपन्न बनते, असा भाविकांचा विश्वास व अनुभव आहे. […]