मैत्री : एका दिवसाची नाही, अखंड प्रवासाची नाती
मोबाईलच्या स्क्रीनमधून व्यक्त होणाऱ्या भावना खऱ्या असतात, पण त्यात स्पर्शाचा उबदारपणा, नजरेतून व्यक्त होणारी आपुलकी, आणि प्रत्यक्ष उपस्थितीचा आधार कमी पडतो. […]
मराठी संस्कृती विषयक लेख
मोबाईलच्या स्क्रीनमधून व्यक्त होणाऱ्या भावना खऱ्या असतात, पण त्यात स्पर्शाचा उबदारपणा, नजरेतून व्यक्त होणारी आपुलकी, आणि प्रत्यक्ष उपस्थितीचा आधार कमी पडतो. […]
चहाला सोडा लागत नाही.. Tonic water लागत नाही.. प्रिंगल्स , खारवलेले काजू , शेजवान , चकल्या लागत नाहीत… साध्या चिनीमातीच्या कपात काम होतं ! crystal glass चे फालतु खर्च नाहीत.. गरमच प्यावा लागतो त्यामुळे सर्दी, घसादुखी होत नाही…आबालवृद्धांसमोर बसून आबालवृद्ध पिऊ शकतात.. […]
सिंह गर्जतच राहिले, आणि लांडग्यांनी जंगलावर कब्जा करून बसले! Hindu, a dying race इ.स. 1914 मध्ये यू. एन. मुखर्जी यांनी एक छोटीशी पुस्तिका लिहिली. तिचं नाव होतं— “हिंदू — एक लोप पावत असलेली जात” विचार करा—१०८ वर्षांपूर्वीच त्यांना हे स्पष्ट दिसत होतं! […]
ज्ञानाला विवेकाची जोड असेल तरच त्यातून प्रज्ञा निर्माण होऊ शकते. आणि जोपर्यंत प्रज्ञा ही व्यक्तीच्या व्यावहारिक आणि सामाजिक सुरक्षा आणि विकास यात रूपांतरित होत नाही तोवर ती कोळशामधील आग आहे एवढेच. केवळ कोळसा खाली ठेवून अन्न शिजणार नाही. […]
हिंदू धर्मशास्त्रानुसार अधिकमास, ज्याला ‘पुरुषोत्तम मास’ असेही म्हटले जाते, हा अत्यंत पवित्र आणि पुण्यप्रद काळ मानला जातो. या महिन्यात विशेष व्रते, दानधर्म, उपवास आणि नामस्मरण यांना मोठे महत्त्व असते. सामान्यतः शुभमंगल कार्ये टाळून आत्मशुद्धी आणि आध्यात्मिक साधनेवर भर दिला जातो. […]
अक्षय तृतीया — समग्र माहिती अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील अत्यंत शुभ आणि पवित्र दिवस मानला जातो. “अक्षय” या शब्दाचा अर्थ कधीही न संपणारा, नाश न होणारा असा आहे. या दिवशी केलेले पुण्य, दान, जप, तप हे अक्षय (अखंड) फळ देतात, अशी श्रद्धा आहे. तो वैशाख शुक्ल तृतीयेला साजरा केला जातो. हिंदू पंचागा प्रमाणे खालील साडेतीन […]
विश्वकर्मा समाजाच्या सांस्कृतिक अध्ययनात सर्वप्रथम शिल्पकारांच्या अस्तित्वाचा शोध घेतल्या गेला आणि नंतर अन्य पैलुवर विचार करण्यात आला आहे. विश्वकर्मा शिल्पकारांनी आपल्या कला कौशल्याने धर्म, रुढी, परंपरा, श्रद्धा, दैवते, कुलाचार, नैतीकता, शिष्ठाचार, या सर्व मनो व्यापाराना शाश्वत रुप दिले आणि एका पिढीने जतन केलेली सांस्कृतिक ठेव पुढच्या अनेक पिढींपर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले. त्यांनी राष्ट्रीय जीवनच समृद्ध करुन नवोन्मेषाने जगण्याची प्रेरणा दिली. पाषाणात प्रेम, शौर्य, हास्य, करुणा किंवा कोणताही भाव मूर्तीमंत (जसाच्या तसा) कोरणे मोठे अबघड काम आहे. पुराण ग्रंथातील प्रसंगाना सुद्धा मूर्त रुप देऊन पाषाणातून सजीव केल्या गेले, त्यामुळे वाचा नसलेले दगडही बोलते झाले; प्रेक्षकांशी संबाद साधू लागले. […]
गुप्त साम्राज्याचा काळ हा अनेक अर्थाने संपन्नतेचा कालखंड समजल्या जातो. या काळात धार्मिक जीवनात तर मोठाच बदल घडून येऊ लागला होता. धर्माच्या अनेक पंथ-उपपंथाची वाढ होऊ लागली होती. जुन्या वैदिक धमाचे स्वरुप पालटत होते. जुन्या वैदिक देवता व यज्ञ-याग हळुहळु लोप पावू लागल्या होत्या. धार्मिक जीवन अव्यक्ताकडून व्यक्ताकडे, अमूर्ताकडून मूर्ताकडे वळू लागले होते. […]
बुद्ध धर्माचा बुद्ध आणि महावीर यांच्या तत्व विचाराचा अत्यांतिक प्रभाव ज्या कालखंडावर जाणवतो तो कालखंड म्हणजे बुद्ध जन्म शतक इ. स. पूर्व ६०० ते गुप्त राजवटीचे आधी म्हणजे इ. स. ३०० पर्यंत होय. यालाच आरंभिक इतिहास कालखंड म्हटले आहे. या कालखंडात विश्वकर्मा समाजाच्या कला कौशल्यात जे बदल घडले, ते त्यांच्या कला कौशल्यातूनच स्पष्ट करणे महत्वाचे आहे. बुद्धाच्या आणि महावीरांच्या तत्व प्रभावाने समाजात वेगळी सामाजिक जाण निर्माण झाली. त्यांचा परिणाम धर्म विचार, कला कारागीरी व भाषा या मूलभूत सांस्कृतिक मुल्यांवर पडला तरी परंतु परंपरेने चालत आलेले वैदिक मत, वैष्णव मत, शैव मत, शाक्त मत, सौरमत आणि मंखलिपुत्त गोसालाचे आजीविकमत आपापल्या परीने राज्यकर्त्यावर व समाजावर प्रभाव गाजवितच होते. सम्राट अशोकाने अंगीकार केल्यानंतर धर्म प्रचारासाठी स्तूप, विहार, स्तंभ निर्माण करविले, व त्यावर बुद्ध धर्माचे सिद्धांत, सदाचार, नैतिकता व धार्मिक गोष्टी कोरल्या. मौर्याचे उत्तराधिकारी शुंग वैदिक धर्माचे उपासक होते तरी ते बौद्ध धर्माप्रति सहिष्णु असल्याचे दिसून येते. कारण त्यांच्या शासन काळात भारहुत, मथुरा, बौधगया, सांची येथे अनेक बौद्ध स्तूपांची निर्मिती झाली. […]
ज्या कालखंडात रामायण व महाभारत प्रथम लिहिल्या गेले त्या कालखंडातील विश्वकर्मा समाजाचा विचार या प्रकरणात केला आहे. हा कालखंड नक्कीच वैदिक काळाच्या नंतरचा पण बुध्दपूर्व आहे यात शंका नाही. कांही इतिहास तंज्ज्ञांनी इ.स. पूर्व १५०० नंतरचा काळ उत्तर वैदिक काळ मानला आहे. परंतु याच कालखंडात घडलेले रामायण आणि महाभारत नेमके कोणत्या वर्षात घडले या विषयी एक वाक्यता नाही. तसेच ही दोन्ही महाकाव्ये कधी लिहिल्या गेलीत या विषयी सुद्धा एकमत दिसत नाही. तरी या अध्यायात उपलब्ध ग्रांथिक पुराव्यावरुन इ. स. पूर्व १५०० ते इ. स. पूर्व ६०० या ९०० वर्षाच्या प्रदीर्घ कालखंडातील विश्वकर्मा समाजाच्या अस्तित्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions